भारीच वाटल बघा.

रविवारला दूपारी म्हणायच काय सकाळला काय कळना, म्हणजे आकरा वाजल्यावर गूड आफ्टरनून म्हणटलं जातं. त्यामूळ संभ्रामवस्था हूते. असू दे तिकडं. तर त्यादिवशी कोल्हापूरला गेलो. सोनाली नवांगुळ मॅडमांच्याकडं. साडेबाराला त्यांच घर गावलं. शिवाजी पेठेत आहे. दारावर थाप हाणलो तर खूद्द सोनाली मॅडमांनी आमचं स्वागत केलं. तिथनं जे एकटाक आम्ही बोलत बसलो ते संध्याकाळंच सहा वाजल्यावर माझ्या ध्यानात आलं. प्रसन्न काय वाटाव तर तेच. कुठतर एकाठिकाणी असं लिवलेलं असेल आधी
|| सोनाली नवांगूळ प्रसन्न || 
तर अशी एकदम उत्साह नावाची दांडगी गोष्ट तिथं हाय. मूगाच्या डाळीच भात हा प्रकार इथ पयल्यांदा खायला मिळाला आणि मला नवांगूळ हे नाव दूसरंच कायतर वाटलं. 
तिथंन आलो. घरात आल्यावर इंद्रजीत खांबे दादांचा फोन आला. ते म्हणटले सौरभनं बोलवलंय उद्याला तू पण ये. हे इंद्रजीतदादा इथं कोल्हापूरला आठवड्यात एकदा असतात. पण आजतका भेट झाली नव्हती, फोनवर बोललोतो नुस्तं. सोमवारी इंद्रजीतदादा जयसिंगपूरला आले. सौरभ पाटलाकडं जायचं हूतं. डिजिटल दिवाळीला 'झाले मोकळे आकाश' लिहलं होतं. ते माझ्या काही मित्रांना दाखवलंत. ते देखिल भेटायला उत्सुक होते. एकटा गणेश गावला त्याला भेटवलो. म्हणजे माझ्याआगूदर तो भेटला. मी गेलो तर इंद्रजीत खांबे बघिटलं म्हणटलं असं कसं ? टोटल आधीचा फोटो जर बघितला तर हा माणूस त्याचा बारका भवू वाटावा असा. उशीरतका हे बोलून दाखवलो. मग त्यांच्या गाडीत बसून मी सांगलीला गेलो. मी आणि दादा. 
शिवाजी स्टेडियम वर गेलो. पाटील तिथ असतो. आम्हाला दोघास्नी तिथ बसायला लै आवडतंय. सचिनदादा सारख वरडतोय. तिथं का बसता तिथं का बसता ? 
पाटील तूझं तू सांग सचिनदादाला. मग आम्ही तिथ बसलो तिघं इंद्रजीतदादा, सचिनदादा, पाटील आणि मी. बराच वेळ बोलत बोलत बसलो. मग आंधार झाला. मग मागं एकदा कनफ्यूजन झालतं. हे उदय समजून त्या उदय ला गेलतो. खरं ह्या दमाला नवीन उदय झाला. उदय कळाला. 
त्याच्यानंतर आम्ही हाॅटेलात गेलो. जेवलो तळघरात. 
सांगलीतल्या भिंती रात्री ओळखत नाही. म्हणजे केडब्लूसीची भिंत सिव्हीलची वाटू शकते. असं वाटलं मला. 
मग तिथंन सौरभ पाटील यांचे निवास्थानी पोहचलो. तिथे एक रात्र मुक्काम केला. पाटलाने त्याचा टीशर्ट मला दिला. माझा अगूदर एक तसला टीशर्ट हूता. लक्ष्मन सूतारच्या मळणीमशिनीतलं तेल ऊडून बाद झालतं ते. शर्ट मला मोठ्ठा झाला. पाटील मोठा.
त्यांच्या हाटेलातल पूरी बी मोठं. 
इंद्रजीत दादांचे मित्र जालण्याचे राजकूमार तांगडे हे जयसिंगपूरात होते. शिवाजी अंडरग्रांऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक काल रात्री जयसिंगपूरात होतं. त्यांची टीम होती. आम्ही तिघे परत जयसिंगपूरात आलो. राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे ही मंडळी आमच्याशी लै लै म्हणजे लै भारी बोलली. इंद्रजितदादांच पुढ काम होतं मग आम्ही तिथून एकमेकांचा निरोप घेतलो. इंद्रजीतदादाकड बघून शिकण्यासारख भरपूर मिळतं. ते मिळल मला. 
रात्री नाटकाला गेलो. तूडूंब गर्दी. जयसिंगपूरात नाटकाला गर्दी इतकी कधी नव्हती बघिटली. एकदोन किरकोळ साऊंडसिस्टीमचे प्राॅब्लेम वजा जाता. एकदम भारी झालं. इथ हे होणं गरजेचं होतं. आणि त्याला प्रतिसाद मिळाला ही गोष्ट दांडगी. नाटक म्हणटलं तर लै भारी लोकं अजिबात पकड ढिल्ली न होऊ देता कारंज्या. राजकूमार आणि संभाजी तांगडेना नाटक झाल्यावर भेटलो. संभाजीदादा ऊशिरभर बोलत बसले माझ्याबरोबर. फूल्ल ताकत काय म्हणटलं जातंय ते ह्या माणसाला भेटल्यावर कळतंय. चेहरा तर लै समाधानी. राजकुमारांचा आवाज मूरूब्बी. वाघमारेदादाचा आवाज फर्डा. अशी माणसं असल्यावर नाटक हिट हूणारंच ! 
आता हे जेवढे वरील माणसं आहेत ती एकमेकांच्या वळखीची. क्षेत्र वेगळं असलं तरी. 
भारीच वाटल बघा. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं