'यिकडे नोडर्य'

सकाळी इचलकरंजीला बाजारला गेलतो. माझं सगळं माल ईकून चहाच्या गाड्यावर तिथंच चहा प्यायलतो. तेवढ्यात दोन बारकी पोरं दिसली. दोघांच्या हातात पिशव्या. मला कळंना झालं एवढ्या बारक्या पोरास्नी ईचलकरंजीवाले बाजारला लावून देत असतील का ? गाड्यावरंन त्यंच्या जवळ गेलो. तर ती दोघं कन्नड बोलत होते. मग मी पण कन्नड बोलत बोलत त्यांच्यात सहभागी झालो. दोघांच्या पिशव्या बघितलो तर माल गच्च भरलेला. किमान दीडशे रूपयेच माल. नंतर मला सांगितली 'तूडगं माड्य व्हडीतंव यल्ला' म्हणजे चोरीचा माल. मला वळखल होतं. मी म्हणटलं 'नंग बी कलस्रल्या' मला बी शिकवा. 
'यिकडे नोडर्य' बघा म्हणटले. बघितलो तर त्यातला एकटा पुढच्या बाजून एका व्यापार्याजवळ गेला आणि रेट चवकशी करायला लागला. मागंन एकटा गेला आणि फ्लावरंची चार गड्डं ऊचलून पिशवीत घातला. पूढचा म्हणटला परवडत नाही आणि सूटला. नंतर आम्ही तिघं चहाच्या गाड्यावर गेलो. दोघानां चहा पाजवलो. खूश झाली पोरं. सातवीला हायीत दोघं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं