तिनं डोक्यावरंचा पदर नाकापर्यंत खाली केला.

आज त्यची बायकू माहेरास्नं आली होती. लग्नानंतर पाच दिवस इकडं राहून परत माहेराला जावून पंधरा दिवस झालते. त्यानंतर पहिल्यांदाच तिला तो पाहत होता. ती सकाळी दहा वाजता आली. लाडूचिवडा फराळ आणि आह्यारमाह्यार घेवून. त्यानंतर दोन तास इकडेतिकडे असेच गेले. मग घरचे दोनचारजण आणि हे दोघे नवराबायको मिळून देवदर्शनाला गेले. कुलदैवत वगैरे जवळ होतं तासाच्या अंतरावर. असं दोनतीन तास गेले. कुठल्या देवाला जाईल तिथंला पुजारी उपरण्याला आणि साडीला गाठ मारायचा आणि प्रदक्षिणा माराय लावायचा. तश्या प्रदक्षिणा झाल्या. परत सगळी घरी आली. संध्याकाळंच शेजारपाजारी लोकं घरी येवू लागली. ते येतातच. प्रत्येकजणाला फराळ देत देत हासुद्धा खात होता.
गावातल्या दोस्तास्नी कळलं. हा देवाला जावून आलाय, म्हणजे आज पह्यलि रात्र.
हा कलंदर कुणाचीही पह्यली रात्र सूखासूखी जावू द्यायचा नाही. फटाकड्या लावायचा, कुत्र्याचं बारकं पिल्लू निवून त्यांच्या दाराला बांधून यायचा. आज सगळी ती लोक बदला घेणार होतीच.
रात्र झाली. साडेदहा वाजले. फटाकड्याची लड लागली, बायकू अजून आली नव्हती.
ह्याला फोन आलीत. विचारले, काय ? आत्ता कसं वाटतंय ?
हा म्हणटला, अजून कशात काय नही.
तिकडंन परत रिप्लाय गंडव.
फटाकड्याच्या माळामागंन माळा ऊडाल्या. मग अर्ध्या तासानं सगळं शांत झालं.
बायको डोस्क्यावर पदर घेवून हातात दूधाचं ग्लास घिवून आली.
ह्याला बारिक गुदगूल्या व्हायलत्या.
तिनं दूधाचा ग्लास ह्याच्या हवाली केला. हा रोज घटागट दूध पेणारा गडी. आज ग्लास हालवत हालवत एकेक घोट शिस्तीत हाणतं होता. बायको मंद हसत हूती.
कधीतर मंद धुंद होवून तिची दातं दिसायची. मग हा हॅ हॅ हॅ करून हसायचा.
मग ती पण जोरात हासली.
ग्लासातलं दूध संपलं. तरीबी दोनदा ग्लासातंल चिटकलेलं दूध वढायचा प्रयत्न केला. सुर्र सुर्र च्याक च्याक असा आवाज झाला. आवाजानं बायको परत जोरात हासली.
ह्यानं ग्लास टेबलावर ठेवला. परत बेडकडं आला. खाली वाकून बेडखाली हात घातला. खणखण असा आवाज झाला. तलवार हातात घेवून बायकूपुढं ऊभा राहीला. म्हणटला, 'हास की आत्ता'.
बायकू घाबरली बेडवर कोपर्यात जावून बसली. हा तलवार हातात नाकापुढं धरत म्हणटला. तुला कायतर सांगायच आहे. ती फक्त हं म्हणटली. पदर तोंडात पदर धरून.
हा म्हणटला, मला ह्या हं च स्पेलिंग h पाहिजे hmmm नको. म्हणजे व्हाटसप टोटली बॅन. त्याला कारण आहेत. मागल्यावर्षी एक लगीन झालं, ती पोरगी व्हाटसप वरं प्रेम केली आणि दूसर्याबरोबर लफडं चालू केली. ते गावात सगळीकडं कळलं. वाट लागलं. सोडचिठ्ठी झाली.
ती परत हं म्हणटली.
हा म्हणटला, साडी नेसायची आणि पदर डोश्कीवरंन खाली पडता कामाचं नही. खायम पदर डोश्कीवर पायजे.
तिनं पदर सावरलं.
हा परत म्हणटला, मी प्रेमळ आहे. मला समजून घे. पण माझ्याएवढं वाईटही कोण नाही या जगात !
सूचना संपल्या.
तलवार खाटाखाली ढकलला. आणि बायकोजवळ गेला.
तिनं डोक्यावरंचा पदर नाकापर्यंत खाली केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं