गोष्ट पावनेतीन हजार वर्षानंतरची

ही गोष्ट सुमारे पावनेतीन हजार वर्षानंतरची आहे. म्हणजे आपलं हे सगळं जग परत एकदा गूडूप होवून. नव्यानं आणि जीवसृष्टी वरती तयार झालेली असलं. मग ती लोकंही प्रगती करतील. त्यांनाही ईतिहास वगैरे गोष्टींचा शोध घ्यावा वाटला. मग त्यांनी उत्खनन केलं. उत्खन करत करत असताना ते कनफ्युज झाले. मानवाचे सांगाडे काही ठिकानी गावले. काही देह हे प्लॅस्टीक सर्जरी केलेले सापडले. ते बघून ते परत गोंधळले. त्यांना कळंनासं झालं की हाडं प्लॅस्टीकची असतात की काय अशा प्रश्नात ते पडले. त्यावरून त्यांच्यात मतभेद झाले. 
बर्याच सांगाड्यांच्या हाती आयताकृती प्लॅस्टीक सामान गावलं. ते खरतर मोबाईल होते. काहीजण सेल्फी काढतानाच गाडले गेले होते. त्यावरून अनेक कथा त्या काळात तयार झाल्या. एका खेडेगावात उत्खनन झालं तिथं, टमरेल, पॅरेशुटच डबा, कंगवा, बुट प्लॅस्टीकंच बारडी इ सामान आढळलं. 
त्यानंतर पावणेतीनहजार वर्षानंतरचे लोक आपल्या युगाला प्लॅस्टीक युग म्हणू लागले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं