दहावी बारावीच्या ( दिवट्या) पोरापोरींसाठी...

दहावी बारावीच्या ( दिवट्या) पोरापोरींसाठी...
यादीत कुणी दहावी बारावीचं आहे असं वाटत नाही, तरीपण.
आत्ता परिक्षेला खच्चून महिना किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहीला आहे. वर्षभर तुमची बोंबाबोंब असते त्याची माहिती मला आहे. शेवटाला येवून आपलं कायचं अभ्यास झालं नही असं वाटल्यानं नैराश्य येतं. त्यातून पुढच्या वर्षी परत बसून परत लै जोरात अभ्यास करू असं नको ते डोस्कं आपन या काळात चालवत असता. विशेषतः बारावीचे विद्यार्थी. तर ते सगळं झ्युट आहे हे पहिल्याझूट सांगतो. कारण तुमी किती केलं तर सुधरत नाहीसा हे मला माहित आहे. बापाचा पैसा वेष्ट जातो आणि वरनं चारचौघात त्यांना जायला वाईट वाटतं.
तर करायचं काय आहे ?
हे फक्त लक्षात घ्या. आणि कृतीत आणा.
वर्षाच्या सुरवातीला मास्तरांनी सिलॅबस लिहून देताना कुठल्या धड्याला किती मार्क आहेत ते लिहून दिलेलं असतं. तुमच्याकडे ते नसतं. हे सुद्धा माहितंय मला. वर्गातल्या एका हुशार पोराकडंन ते घ्या. लिहून काढत बसू नका झेराॅक्स मारा.
यानंतर एका विषयला पास होण्यासाठी किती गुण लागतात ते बघा. म्हणजे जास्तीत जास्त चाळीस लागतात. आत्ता जे तुमच्या हातात आहेत त्या दिवसात फक्त एवढंच करायचं. जास्त मार्क असणारे चॅप्टर निवडायचे. म्हणजे 10 मार्काचे 15 मार्काचे. पास व्हायला जर चाळीस गुण लागत असतील तर असे मोठे चॅप्टर ज्याला मार्क जास्त असतात ते 40 ला 60 मार्कांची तयारी करायची. म्हणजे 15मार्काचे फक्त 4 धडे. एवढंच. खरं मन लावून करा. म्हणजे प्रत्येक गोष्टी आता समजावून घेत बसायच नाही रट्टा मारायचं. हे एवढं परफेक्ट केला कि बास हूतं. त्यातूनही वेळ मिळाला तर इतरही धडे फक्त वाचून काढा. प्रॅक्टीकल परीक्षेला पेपर भरा. शिक्षकांशी गोड वागा.
रिकाम्या जागा किंवा mcq यासाठी शेवटाची पाच मिनटं द्या. एखाद्या हूशार पोराला नाष्टा वगैरे द्या. त्याच्याकडून फक्त MCQ ची जुळणा करा.
पेपरमध्ये येत नसलेला प्रश्नही सोडू नका काहीतरी लिहा. न लिहण्यापेक्षा लिहनं महत्वाचं. फक्त एवढेच दिवस म्हणजे पंधरा दिवस महिना कड काढा. तिथून सुट्टी आपलीच आहे. आत्ताचे गुरूजी लोक हे फारसे लक्ष देत नाहीत वरल्या दोन ओळी तर व्यवस्थित राहू द्या. बाकिच खाली फाफट फसारा लिवा. तुम्ही निश्चीत आणि निश्चिंत पास व्हाल. फक्त मी सांगितलेली प्रोसेस फाॅलो करा.
दहावी आणि बारावी पास होणं खूप आनंदाचं असतं. आणि काठावर पास होवून सुटनं तरी त्याहून आनंदाचं असतं.
कारण बेरजेच्या राजकारणातंच खरी गंमत असते. wink emoticon
(आपल्या संपर्कात जर असे कोण असतील दहावी बारावीचे तर त्यांच्यापर्यंत हे पोचवावी ही एक विनंती.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं