तिकडंन आला, स्टेशनरी दुकानपुढं गाडी लावला आणि पानपट्टीत गेला. 
...................................................
हिवाळ्यात काही गोष्टी आकुंचन पावतात. निर्जीवसुद्धा.
.....................................................
रताळ किंवा मक्याची कनसं, शिजवून खाण्यापेक्षा भाजून खाव्यात. चांगलं लागतंय.
..................................................
देवावर अतिश्रद्धा असल्याचं जी व्यक्ती तुमच्यापुढे दाखवते. तिच्यापासून लांब राहा.
....................................................
डिसेंबर आणि जानेवारीत जास्त लोक मरतात. नैसर्गीकपणे.
.........................................................
हा म्हणटला, दूनिया झुठ है ! पैसा प्यार है !
....................................................
मुंबईपुण्याला असणार्या लोकांना गावाकडंच लै लै भारी सगळं सांगतो. तो जाताना नाराज होवूनच जातो. मी खूश होतो.
..........................................................
मी मुंगी असतो तर विमानातंन फुकटात हिंडलो असतो.
......................................................
अतिथंडी पडल्यावर नारळातंल पाणी गोठत असेल काय ?
.........................................................
मोदींच्या मोबाईलवर कोणतर मिस्काॅल देत असेल का ?
.........................................................
कोल्हापूरात यंदा आप्पाची शिट्टी वाजणार नाही. बंटी पाटील निवडुण येणार.
........................................................
कविता वाचणारा कवीच असतो.
......................................................
तागाच्या पोत्यात (gunny bags) थंडी कमी लागते.
.....................................................
पांढर्या स्कुटीवरच्या मुली छान दिसतात.
......................................................
गावात पारायण आणि विधान असे दोन कार्यक्रम आहेत. दोन्हीची पट्टी दिल्या घरच्यानी. खरतरं पट्टी दिवून पण महाप्रसाद घेतलं नाही तर मला प्रसन्न वाटत नाही.
..................................................
नवीन वर्षात कायतर करायचं आहे ? काय करू ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं