फुल्ल तेजी

बाजारला आलोय. गवारी विकायला, फुल्ल तेजी आहे. वीस रूपये, पंधरा रूपये पावशेर ने घालायलोय.
गाडीवरनं पोतं उतरवायच्या आतंच पाचशेला एकटी बई खंडीत मागितली. सातशेवर गेली. नही म्हणटलो. 
उजव्या आणि डाव्या बाजूला आज कोणंच नाहीत. दरवेळी बसत होतो त्या विरूद्ध बाजूला मिस्त्रीच्या गॅरेजजवळ बसलोतो, सुरवातीला एक चक्कर टाकून आलो मग पोतं सोडलो. पैसे घालायला आज पिशवी आणली नाही आणि टीशर्ट घातलोय. मिस्त्रीला म्हणटलो, मेणकागद द्या, तो म्हणटला कशाला ? पैशे घालायला. मिस्त्री म्हणटला कागद कशाला मीच येतो कि मोजायला !
मग नंतर लै गिर्हाईक आली. मी पैसे तसंच पुढं ठेवून बसलोतो. ताकडीची साखळी जरा अडकलीती त्यामुळं एक पारडं वाकडं झालतं जरा, एकटी काकू आली ती सरळ करायला गेली आणि जास्तंच वाकडी करून गेली.
तेवढ्यात दिवाणजी आला मिनटाच्या आत पारडं सरळ केला. मला म्हणटला, हे सरळ करायचं इथल्या बायका शान्या नसतात, जास्त शिकलेल्या असतात. मग मी दिवाणजीला पंधरा ला पावशेर दिलो, ते मला पाचची मळकी नोट दिलेत.
एकटी बाई आली पोरगीला घेवून, दा चं दाभार द्या म्हणटली. मी विचारलं एवढंच ?
तर आम्ही दोगचं आहे. नवरा बायको. मुलगी कुणाची आहे ? ती पण आमचीच आहे म्हणटली आणि हसली.
एक काकू आहे, त्यांचं दूकान आहे. दहाची दोन पिवळे क्वाईन दिली, त्या नेहमी देतात आणि जातानं चार गवार्या एकश्ट्रा घेत्यात. ती नाणी वरंच ठेवलीती, एक जोडपं आणि लहान मुलगी चालले होते त्या पोरीनं त्या दोघांना वढून आणलं त्यांनी अर्धा किलो घेतलं, पन्नास दिलं दहा परत देत होतो तर तो म्हणटला ते गोल्डन क्वाईन द्या. मी दिलो पोरीच्या हातात ती हरकली, मग अनेक दहाची नोट घेवून दूसरं पण नाणं देवून टाकलं पोरगी हारकली.
बर्यापैकी माल खपलाता. पलिकडच्या एकट्याचा बाजार आवरला. मग पलिकडचे नेहमीचे काका म्हणटले, पावणं या की हिकडं. मग मी सगळं बारदान ऊचलून काकाजवळ आलो. निबार गवारीच एक गठळ होतं ते लास्टला काढलो. मागं मी एकदा वाचलं होतं की कमी वेळेत जास्त विकायचं असलं की गिर्हाईकाला कमपॅरीजन करायचे चान्स देवू नका. तसं केलो. मग लैच निबार गवारीही दहा रूपये पावशेर नं संपत आहेत. एकटी बई आली साधारण पंचाव्वनची असावी. केस लाल आहेत म्हणजे केलेत. तिच्या साडीवर अॅपलचे चित्र आहे.
बाजार संपत आल्यावर मिस्त्री आला मेणकागद घेवून. बापू घाल पैशे ह्यात म्हणटला. हा मला बापू प्रेमाणे म्हणटला असेल का ? असला तर मी गांधी हुईन का ? असा विचार करत मी गांधीचे फोटो असलेल्या नोटा मेणकागदात घातलो आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं