प्रेम सेलीब्रेट केलं पिंट्यानं !

ती दिसायला भारीच होती. पिंट्याला ती आवडायची. पण पिंट्या कधी बोलला नव्हता तिला. म्हणजे धाडस झालं नाही किंवा आणखीही काय काय. तिचा फोन नंबर होता सगळ सगळ बोलनं चालणं होतं. 
थोड्या दिवसानं तिची लक्षनं काय मापात बसना झाली. म्हणजे कुणाबरोबर तर हिचं चालू झालं. मग पिंट्या बैचेन झाला, रात्र बेकार चालली, डोस्कं फिरलं. कधीकधी रडू लागला तिच्यासाठी. आधी ह्याला ब्रेकप पार्टी गाणं आवडायचं. आता ते पण आवडना. कशातंच मन रमंना. काय करायचं ? 
दोनचार दिवस आठवडा असा भिकार गेला. काय इचारू नये एवढा. काॅलेजला दांडका लावला. रोज मित्रं पिडवायला लागली फोन लावून लावून. 
सोमवारी गेला. दोन लेक्चर अटेंड केला. पोरास्नी भेटला, काय नही रे ऊसाच्या कांडक्या गोळा करालतो असं गंडवलं आणि काॅलेजातंन पसार. येता येता मह्यशा ला सूचना दिलता कुणाबरोबर लफडं हाय ते बघ. 
शेतात जावून दूपारी ऊनाकडं तोंड करून बसला. हे गेलं आठदिवस चालूच होतं. सव्वाचारला फोन आला मह्यशाचा. ती सच्याला चिकटल्या म्हणून. 
सचिन बादगड गडी. पिंट्या तो हसून खेळून एक होते. पण जास्त संपर्क नाही. सच्याचा काटा गेला पाहीजे तरच ही आपली नाहीतर आपन कट्ट्यावर. असं पण आणि तसंपण वाटच लागणार हाय. गम बास आत्ता. 
दूसर्या दिवशी काॅलेजला गेला. सच्या तोर्यात होताच. ह्यच्याआयला एक पोरगी भाळली तर एवढं. असू दे माझं तेवढं पण नाही. सच्याचा द्वेष करून उपयोग नाही. फक्त त्याला संपवलं पाहिजे. मग सच्च्याला काय गड्या जीन्स काय कट्टंच आणलायस की ! 
कट कुठ मारला रे ? डोस्कं बेश्टच दिसालंय ! असे कमेंट देवू लागला. 
सच्याला भारी वाटणं साहजिकच होतं. असं करत करत मैत्री घच्च झाली. नाही केली. मग सच्याची भानगड पण हळूहळू सगळ्याना कळालतीचं. एखाद्याला पोरगी लागली की अख्खा वर्ग दुष्मन होतो. तसंच झालं, फक्त पिंट्या दोस्त झाला होता खास. दिवसामागून दिवस चालले. सच्या फुल्ल काॅन्फीडन्ट झाला होता. पिंट्यापण हवा भरायचं काम पद्धशीर करायला लागला. दोस्ती व्हाटसपच्या मैत्रीसारखी झाली. मग पिंट्यानं एकदा असंच त्याची नजर तेजी वर वळवली. तेजल ही तिच्यापेक्षा भारी. तेजी ऑलरेडी यंगेज्ड होती हे पिंट्याला माहिती होतंच. तरीबी सच्याला ते दाखवलंच, नहीतर मैत्रीवर थुकला वगैरे बोलायला रिकामं असं पद्धशीर पाचार पिंट्यानं मारलं. 
सच्या ऑलरेडी फूल्ल काॅन्फीडन्ट त्यातंच पहिलं प्रेम आयतं मिळालं की माणूस बेमाप काॅन्फीडन्ट होतो. झालं पाच पन्नास चा गुलाब एक कॅडबेरी सेलीब्रेशन घिवून सच्या मैदानात उतरला. जिन्यावरन ती यायलती. केसावरंन हात फिरवत गाणं गात हा गेला आणि प्रपोज केला. ती रिप्लाय दिली. तुला लाज वाटत नाही का ? सेलीब्रेशन भिरकाडंल. आणि रागारागात निघून गेली. ती गेल्यावर पिंट्यानं सेलीब्रेशन उचलून घेतलं. आणि सच्याला समजावून घेवू लागला. हि काय दिसायला भारी असून काय उपयोग ? वगैरे. तेजी गेली ते गेली आणि छाव्याला फोन करून सांगितली. छावा गडी वांड होता. दूसर्या दिवशी पाचसा बुलेट काॅलेजवर घिवून येवून दहापंधराजणानी सच्च्याला बडतंबडवलं, सच्या काळानिळा झाला. अखंड काॅलेजभर वार्ता पसरली. तिलाही कळालं. ती पण भडकली. सगळीकडून ब्लाॅक केली. आयुष्यातून डिलीट केली सच्च्याला. सच्च्या काॅलेजला आलाच नाही. पिंट्याच दोनतीनवेळा जावून त्याला भेटून आला. तेवढ्यापूरतं तेवढं विचारपूस केला. मग नंतरनं सच्च्या पिंट्याला म्हणटला माझी अगुदरंच एकटी होती, म्हणून तिच्याबरोबर नुकतंच चालू झालेलं सांगितलं. पिंट्या म्हणटला तुला लाज वाटायला पाहिजे होती लेकाच्या. एक असताना दूसरीकडं कशाला काशी केलीस ? 
सच्च्या म्हणटला तु सांगितलास म्हणून ! 
आरे मला काय सपान पडलंतं काय तुझं तिच्याबरोबर किंवा तेजीचं त्या छाव्याबरोबर चालु हाय म्हणून ? असं पावशेर ठिवून तिथून पिंट्या चालता झाला. 
हिकडं सच्च्या बसला बोंबलंत. 
दोनचार दिवस गेले. तिचा परत पिंट्याला मेसेज आला. परत पुर्वीसारखं ती वागू लागली. एका संध्याकाळी तीनंच ह्याला प्रपोज केला ! 
Oh really ?वगैरे थट्टा मस्करी करून तिला रिप्लाय दिला. सगळं जगातलं सुख याचंच होतं. त्या दिवशी तेजीनं भिरकवलेल्या सच्याच्या पैशाचं कॅडबेरी सेलीब्रेशन सॅकमधंन काढून तोंडात टाकत प्रेम सेलीब्रेट केलं पिंट्यानं ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं