वय वर्षे बावीस आहे. भारत देशात 21 वय असलं की लग्नाला परवानगी आहे. वय बावीस वर्षे आणि काही महिने आहे. एक वर्ष आणि काही महिने फूकटात गेलेले आहे. 
मुलींचे वय लग्नासाठी 18 आहे. माझ्या बॅचच्या मुलींनी 4 वर्षे आणि काही महिने वाया घालवलेलं आहे. 
लग्न केलं पाहिजे. लग्नात प्रकार आहेत. म्हणजे प्रेमविवाह आणि आरेन्ज मॅरेज. प्रेमविवाहाचे परत प्रकार पडतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय, स्वजातधर्मीय इइ. 
तसेच आरेन्ज मॅरेज देखील आंतरधर्मीय जातीय होवू शकतात. म्हणजे झाले आहेत. ते एक बरे झाले. जगातले सगळेजण सगळ्यांचे लांबून का होईना पै पावणे झाले.
एका मामाने लग्न केले आंतरधर्मीय. परवा आला होता. त्याची बायको काहीही सक्ती न करता उड्या मारत मामाचा धर्म पाळत आहे. मामाच्या डब्बल. मलाही चारदोन गोष्टी मामीनं सांगिटल्या. हुं हुं म्हणटलो.
आता लग्न केलं पायजे असे माणसाला कधी वाटलं असेल ? किंवा वाटत असेल. ?
परवा करण्या ला म्हणटलो गड्या तु आंतरजातीय लग्न करून जातव्यवस्था मोडून काढायचं काम केलायसं.
तर तो म्हणटला अजून साताठ लग्नं करून सगळच मोडून टाकू काय सांग ?
एकंदरीत फेसबुकवरल्या लोकांचं ऐकून मी कौतुक करायला गेलो तर आंगलट आलं.
नेपोलियन नं एकदा एका विधवा बाईला लग्नासाठी विचारलं होतं, तिच्याकडे बक्कळ पैसा होता.
कुणाच तर लग्न झालं असेल तर मी विचारत असतो लग्न झाल्यावर कसं वाटतं ?
काहिजण उत्तर देतात तर काहिजण नुस्ता हसतात.
कसे वाटते हे बघण्यासाठी लग्न केले पाहिजे. तरच कळेल.
एकटीला प्रपोज केलो ती म्हणटली तुझं कास्ट कुठली आहे ?
मी म्हणटलो माणूसकी. असं माणूसकी वगैरे फेसबुकवर लिहलं तर शेसव्वाशे लाईक्स मिळतात. प्रत्यक्षात सगळे जात हूडकून काढतातंच. तसं ही म्हणटली मला तू मराठ्यांचा वाटतोस खरं तू नाहीस. तू बिर्याणी खाणार नाहीस तूझा काय उपयोग नाही. मग तिच्याबरोबर दोनवेळेला सांगलीत इणि कोल्हापूरात बिर्याणी खाल्लो. ती म्हणटली वा रे वाघा...! मग जर खालूलो नसतो तर बैल म्हणटलो असती का असं कधीतर वाटतं.
अनेकटी म्हणटली तु आवडतोस खरं तुमच काय खरं नाही.
कोणतर सांगितलं पाहीजे आधी पण आंतरजातीय लग्न झालेत, त्यामुळे सगळेजण जगातले हे एकमेकांचे पाव्हणे आहेत.
हे एकदा पटलं की बर्याच गोष्टी सोप्या होतील असे वाटते.
परवा एक आंतरजातीय लग्न केलेला भेटला आणि लग्न आंतरजातीय केलोय हे चोवीस वेळा सांगितला. त्याचं ऐकून घेतलं.
सगळं आव्वाच्या सव्वा असतंय. नवीन वर्षात एखादं प्रेम केलं पाहिजे. आणि शेवट पर्यंत नेलं पायजे.
प्रेम यष्टीत होतं, माॅलमध्ये होतं वर्गात होतं, रस्त्यावर होतं, पळून जावून होतं, टेम्पररी होतं, परमनंट होतं.
पोलिस कसे प्रेम करत असतील ?
डाॅक्टर कसे प्रेम करत असतील ?
नटनट्या कसे करत असतील ?
कधी कधी प्रेम पोलिस स्टेशनात जातं. कधी कधी चावडीवर. कधी देवळात.
अशा सगळ्या प्रेमस्टोर्या लिहल्या पाहीजेत.
हा म्हणटला ती एकटी आहे बापाला तिच्यावर प्रेम कर आणि आर्थिक विषमता संपवून टाक....!
आर्थिक,धार्मिक, भावनिक असे बरेच पॅरेमीटर असतेत. आणि वरून कुंडली.
मंगळाबरोबर लग्न करू का ? यान पोहचले असेल तर मंगळावरच जावून लग्न केल तर ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं