दिसत तस नसतं

घराकडं येत हुतो. रहदारीच्या रस्त्यावर अलिकडच्या गावाजवळ आलतो. एक विजारवालं रस्त्यावर पडलं हूतं. म्हणजे वाकून एका हातानं जोर मारतंय अशा अॅक्शन मध्ये दिसलं, मी गाडी पुढं घेवून थांबवल आणि बघिटल तर हे खोकत होतं आणि रक्त ठिबकत होतं. रक्ताच्या उलट्या होतायेत असं पहिल्यांदा वाटलं. पुढं गेलो तर डोळ्याच्यावरची भुवयी फाटलीती. त्यातन एकटाक रक्त गळालतं तेवढ्यात गाड्या दोनीकडनं यायलत्या अनेकटा हुता म्हणटलं हात करून गाड्या थांबव, आज्जाला विचारलो काय झालंय ? म्हणजे हे विचारणं भाग हुतं असं वाटलं. कारण ह्यच्या दारूचा वास सगळीकडं दरवाळलता. आज्जा म्हणटलं हायायाया आलं रांडचं आणि उडवून गेलं आरारारा ! थांबलं नाय आरारारा. ह्येला विचारल तर ह्यो फरांडेबाबा टायीप भाकणूक सांगायला चालू केला. तेवढ्यात गर्दी जमली हुती. बरोबर अनेकटं हूतं ते बरं झालं नहीतर माझ्यावरच बेणी नाव घातली असती. दोनचारजण म्हणटले दवाखाण्याला न्या. मी नेणारच हुतो तर ते म्हणटलं, घरात सोड बाबा घरात सोड.
चल बाबा म्हणटलं. रट्ट्याला धरून न्यायलतो तर ह्या गड्यान तीनचारदा मला भेलकाडत भकलत भकलत उकीरड्यावर नेलं. तेवढ्यात एक बई त्यच्याच गल्लीतली हुती ती म्हणटली, कशाला दारूड्याच्या नादाला लागलंयस बाळ ? मी म्हणटलो मी पेलो नही. मग टेकाड चढून त्यच्या घराजवळ गेलो तर गल्ली गोळा झाली. मग परत कथा सांगणे झाले. गल्लीतली म्हणटली तु जा नहीतर तुझ्यावर नाव घालायची. मी सटकलो.
...............................................
गेल्यावर्षी तोडणी आलती, जालण्याची लोक हुती. दरवर्षी चहा, नाष्टा वगैरे करणे आपली जबाबदारी. ते दिलं होतं. सप्पय गणित हाय ते खुष होतात आणि चांगलं तोडतात, म्हणजे वाड्यात कांड्या घेत नाहीत किंवा लै वरनं ऊस मारत नहीत. मुकादम तरणं पोरगं सकाळपास्न मला बागायतदार बागायतदार म्हणून खूष केलतं. मी पण फुगलोतो. टोळी लांब कुरड्याच्या कोडीला उतरलती. ते ठिकाण गावापास्न चार किलोमीटर लांब. मुकादम म्हणटलं बागायतदार जरा गावातंन जावून येवूना. बागायतदार म्हणटला चल.
एक तिथं ही दोघं आली. मला म्हणटला जरा आस घ्या तसं घ्या म्हणत दारूअड्यावर नेला. म्हणटला बागायतदार जरा आमी स्येट हून येतुय. मी म्हणटलं कमी प्या !
तिथं अड्ड्याला थांबलो तर गावातली येणारी लै. वाळल्याबरोबर वल्लं बी जाळायच म्हणटलो आणि दहा पंधरा मिनट हिंडून आलो.
तर ही स्येट व्हायला गेलेली शेठ हून आली. बागा य तदा रऽऽऽऽऽऽऽ घ्या दुकानला म्हणटला, दूकानला नेलो, बाजार घेतलीत, तिथनं गिरणीला घेतलो दळाप घेतलीत. मग गाडी घिवून बारिकमध्ये लागलो, मधी दळपाच्या पिशव्या होत्या, त्यामागं दोनजण त्यात ही बाकिच्या लोकांना शिव्या द्यायलती. आमच्याकडं रस्तं बेकार. दोनचार गचकं लागल्यावर पाठीला कायतर वल्लं लागालंय असं जाणवलं तर ह्या गड्यान अंडी पेपरच्या कागदात धरून हातात धरून बसलाता त्याचा कार्यक्रम झालता.
कायतर करून नेवून सोडलो.
त्यातल्या मुकादम सोडून दूसरा होता त्यानं रात्री बायकूला मारलं. सकाळी ती बयी बिचारी आली हिकडं. दूपारला गायप. तिला हूडकायला लागली सगळी. विहीर चेक करणे याला प्राधान्य देण्यात येतय अशावेळी त्यानुसार गेलो आमच्याच विहीरीकडं तर ही कळशी घेवून हिरीत उतरलती. बोंबलंल शंकेला वाव नव्हता. नवरा तळतळत हूतं. लेकरू झाडाखाली झोपलंत. विचारायच तर कसं ??
तरीपण विचारलो काय बई दोन घागरी ठेवलोय तर हिकडं कशाला झक मारलीस ?
ती म्हणटली ते पाणी पैपाच चव लागत नही. हिच्या चवपायी सगळी बोंबलत हिंडली.
........................................
एकंदरीत सगळ दिसत तस नसतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं