डियर, डाक्टर कब्र्या शिंग ,

डियर,
डाक्टर कब्र्या शिंग ,



कबीर सिंग या शनिमाचे तिकीट माझा दोस्त हानमाने काढलेलं असल्यानं नाईलाजानं बघावं लागलं.
  अत्यंत होपलेस शनिमा असून डायरेक्टर वगैरे मंडळीही चार तुंब्या हाणूनच शनिमा तयार केल्याचे पावलोपावली आम्हास जाणवले.

माणसाची एक मर्यादा असते, खोटं सहन करायची. थोडंबहोत चालत असतं म्हणजे ढगामुळं रडारावर आपली विमानं नाहीत येत वगैरे.
  हे पटू शकतंय ओ.
पण, कबीर हा हलकट डाक्टर अख्ख्या शनिमात एकदाही जेवताना-खाताना दाखवला नही. निस्ता एक झालं कि एक दारूची बाटली लावीत असतो, ते बी मान्य. पण त्या दारूबरोबर सुद्धा खारीडाळ, खारेशेंगदाणे,लस्सूनफ्राय, मुगडाळ, कुरडंपापड, केळीचिप्स, भडंग, पापडी, चकली, वल्लीचटणी, चिकनसिक्सटी फाईव, चिकन लॉलीपॉप असलं काहीही खाताना अख्ख्या शनिमात एकदाही दिसत नही. तरी ह्या डॉक्टराची बॉडी एकदम फिट. हिथं लोकं सायकलिंग करतेत, वॉक करतेत, निंबसाची बुट घालून रनिंग करते, दीक्षीत-दिवेकर डायटं करतेत, जीम करतेत,मसाज करून घेतेत. तरी त्यांच बाहेर आलेलं पॉट आत नसतं रे जात. आणि तु नालायका
निस्ता पित असतो, सिग्रेटी फुकीत असतो. असं करून बॉडी होत असते का नालायका ?

  ह्यो गडी कबीर बाहेरनं जातोय दिल्लीत, याचा बाप तिथला झेडपी सदस्य असल्यागत राडा करत असतो. आरे भावा आमच्या हिथं कॉलेजात बिनाकॉलरीचं टीशर्ट जरी घालून आलं तरी आमचा गांधी सर बडीवबडीव बडवतोय आणि तु पाक बॉईज हॉस्टेलात तिला आणून संसार थाटतोस, तिथनं रोजचं तुमचं बिजागरींना तेलपाणी घालणं चालू असतंय असं असतंय का कुठं ?
  ती गेल्यावर तु प्रमाणापेक्षा जास्त पित असतोस हे मान्य आहे. पिलं पायजे, टेंशनात दुनयेची आयभन केली पायजे हे बी मान्य पण तु त्यातबी सक्सेसफुल अॉपरेशन करतोस.
  आरे इथं पाईंट बियर हाणली कि नीट नाकाम्होरं चालता येत नसतं आणि तु अख्खीच्या अख्खी कॉटरी लावून शिवणटिपण व्यवस्थित करीत असतो.
  असं असतं का ल्यका कुठं ?

ती नटी बिचारी गरीब असते. तिला काय बोललं नही पायजे. दे म्हणटलं कि देत असते. तिला काहीही बोलणे पाप असते.

एवढं सगळं होऊन पण पोटातलं लेकरू बी कबीरचच असतं.

दारु पिऊन अॉपरेशन सक्सेसफुल होतं.

शिग्रेट फुकून बॉडी व्यवस्थित होते.

लगीन दूसऱ्याशी होऊनही छावीच्या पोटातलं लेकरू ह्याच गड्याच असतं.

आरे माणूस हायीस का काय हायीस ? इथं बोंबलतं पोरांची लगीनं हुईना म्हणून चोरून शिग्रेट पितेत, एखाद्या पोरगीनं द्यायच तर लांबचं लागायची पंचाईत हाय, अशा ह्या काळात तुझ्या नशिबाचं कौतुक वाटतंया कब्र्या.

आता सगळं व्यवस्थित काशी झाल्या,बायकूची बाळंतपणात काळजी घे,  चांगलं नीट बायकूला नांदवून घे, पोटापाण्याला कायतर खात जा. दारू रविवार शनवारी घेत जा, नोकरीधंदा नीट कर, लगीन झाल्यावर , लेकरेही झाल्यावर माणूस सुधारतो तू नक्कीच सुधारशील अशा अपेक्षा हायीत.
   तु ४५० नाईट तिच्याबरोबर काढलेत असा बारीक डॉयलाग टाकल्यावर , ४५०÷३० आणि कायतर...
अशी गणितं मांडणारे लोकंच हा शनिमा २०० कोटीचा करतील त्याबद्दल मेरे मन मे कोई संदेह नही है !

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
४५९ रात्री होत्या भावा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं