डोकं मेन काम करतंय. डोक्यावरची केसं ही झाडं वाटत्यात. झाडात दोन मुख्य प्रकार flowering plants आणि non flowering plants म्हणजेच सपुष्प आणि अपूष्प. सूरवातीला वाटायचं की अपूष्प झाडं हायीत केस. म्हणूनंच काय पोरी बायका केसात गजरा फूल घालत्यात. त्यावेळी वाटलं सपूष्प हायीत केसं. केस गवतासारखं असतात, किंवा स्पाईक केलं की देवदारच्या झाडागत ऊंचच ऊंच. कधी वेलीसारखं पसरलेलं. तर कधी झाडात झाड गूंतलेल (वेनी). नंतरनं विश्वास बसला ही झाडंच. ते ह्यामूळं. 
डोक्यात आपल्या पाणी मूरतंय. झाडं हायीत म्हणजे सच्छिद्र डोकं असतंय आपलं. त्यात आपन केसांची प्रचंड काळजी घेतोय. रोज डोक्यावरून अंघोळ, शांपू, कंडीशनर ने केसं धूतो. त्यावर रोग येतोयचं उवा (वा) वाढत असत्यात आपल्या केसांच्या जीवावर. जसं ऊसावर लोकरी मावा पडतोय. ह्या किडीला ऊपाय म्हणून आपन आपन अँटीडँडरफ (अँटी आपल्याला अलिकडं खूप आवडतंय) लावतो किंवा स्प्रे करतो. ते काही केसांना सहन होतंय काहीना नाही. मग डोक्यात तांबेरा पडल्यागत, मॅगनेशीम कमी पडल्यावर ऊसं कुठं कुठं फटफटीत दिसत्यात तसं केसं पण दिसू लागत्यात. मग एक उपसून काढलं की दहा तयार अशी भानगड. 
केसं झाडंच हायीत. झाडांच्या मूळाशी पाणी असतंच. ते कुठनं येतय ? 
आपन पाणी पितोय, बिसलंरीच चिल्ड चिल्ड मागून पितो. तरी आपल्याला गरमागरम चहा, कांदाभजी लागतंय. ते आपन खाल्लं की पिलेल्या पाण्याचं वाफ होवून नरड्याथ्रु-नाकाथ्रु जावून डोक्याला बडवतं. डोक्यात वरच्या झाडांची मूळं गारवा पकडून असतात. तिथं जावून हे वाफ बडवलं की परत त्याचं पाणी हूतंय. तूम्ही डोक्याचं स्केलटन बघितलं तर ते ढगासारखं दिसतंय. त्या ढगात हे वाफेचं पाणी साठतंय. माणूस विचार डोक्यानं करतोय. कधी तर आपन सगळे कुठल्यातर भावनेत गूतलेलो असतो. अनेक विचार झाली की ढगाला ढग बडवून तेच पाणी आपल्या डोळ्यातंन येतंय. हाच तो चिंब भिजवणारा पाऊस. अअअअअअअअअ असं कंटीन्यू रडतो त्यावेळी ते रडू गळून येवून तोंडात गेलं असेल त्याची चव तुमी घेतली असेल. आणि पावसाचं पाणीही पेलेलं असंल तर तीच चव. तीच चव. असते. 
अवकाळी पाऊस हा शिंक असतो. गारा ही सर्दी असते. गारपिट सारखं गारा आपन भिंतीवर आदळतो. 
खरंच ती वाफ असते, असंच होतंय. कधीतर बघा हिवाळ्यात काचंवर फूंकून. 
आता पावूस पडत नाही. वृक्षतोड झालीय. 
कधीकधी वाटतंय आपल्या जगाच्यावर एक जग असेल. तिथं लै झाडं असतील. 
अश्रु आणि पाऊस किमती. कृत्रीम अश्रु गाळायला प्रचंड भावनीक खर्च आणि कृत्रीम पाऊस पाडायला प्रचंड आर्थिक खर्च येतोय. तरी अश्रु गळतील काय ? पाऊस पडेल काय ? 
सांगता येत नाही. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं