उनातला गारवा

एप्रिलचा महिना होता. मी तिची वाट बघत बसलोतो आंब्याच्या झाडाखाली, झाडाला आंबं ढिगानं हूती, खरं माझ्या हाताला ते येत नव्हतं. दगडं मारलं की आज्जी कावायची. शिरमा आज्जी मिशरी घिवून घासत बसायची असं वाटायचं खरं तिची दातं कायमचं काळीकुट्ट दिसायची. मग एकदा प्रज्ञा ला मी विचारलो ही म्हातारी तोंड धुत्या काय नही ? 
मग प्रज्ञा म्हणटली शिरमी ज्याचुली लावते. शिरमाला ही शिरमी म्हणटली की मला सहावीत शिकवलेलं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आठवायचं. शिरमा मी म्हणटलो मी पुल्लिंगी आणि ती शिरमी म्हणटली की स्त्रीलिंगी. म्हणजे पूरषानी पुलिंगी आणि मुलीनी स्त्रीलिंगीमधे बोलावं असं वाटायचं. ही मामाच्या गावातली झाडं मला लै आवडायची. नव्वीची उनाळसुट्टी पंधराचं दिवस होती. मी लगेच मामाबरोबर कोकणात आलतो. प्रज्ञा येऊन दोन दिवस झालतीत. काल संध्याकाळी बुद्धीबळ खेळत होतो आम्ही दोघं. ती दोनदा जिंकली. एक प्यादं वजीर केली. शाळेत जिल्ह्यापातळीवर जावून आलती. मला कॅसलीन म्हणजे काय ते माहितंच नव्हतं. ती कायतर नवीन शिकवायला लागली की मॅडमच व्हायची. अरे तुका कळतंच नाही. असं कायतर समजून सांगायची. कोकणातल्या पोरी सगळ्या फेंदर्याच वाटायच्या. त्यातल्या त्यात ही एकटीच मऊ वाटायची. काल मला म्हणटली दूपारला तीन वाजता भेटू, शिरमीच्या घरापुढल्या आंब्याच्या झाडाखाली. 
मी सकाळपासून परशु, सोमा आणि व्यंक्या बरोबर खेळालतो. आमच्याकडंच आंगाभोंगा आणि दगड फळवायचं डाव त्यांनला शिकवलो. दिवसभर दगड फळवत बसलो. व्यंक्या लै तंगलं. मला म्हणटला बस आता. दूपारी एकदा मामा बाराला बोलवून गेलता. आता एक वाजलंतं.माझ्याकडं एक घड्याळ हूतं, भैरोबाच्या जत्रेतंन घेतलोतो. 
घरात गेलो मामा झोपलाता मामी आज्जी तांदूळ नीट करत बसलीती. आज्जी म्हणटली झालं का हिंडून ? 
झालं. मला जेवायला वाढ . 
आज्जी जेवायला वाढली. कोकणातला भात आवडायचा खरं आज्जी फळफळीत भात करायची. कसतर जेवण आटपलं. आणि आज्जीला म्हणटलो मी जातो संध्याकाळला मामाबरोबर मी हाटेलला जाणार सांग त्यला. गडबडीनं सटकलो. आज्जी कायतर बोलली. मामा झोपलाताच. दीड पावणेदोन वाजलं प्रज्ञा कधी येत्या असं वाटालंत. अजून दीड तास. करायच तर काय ? तिच्या शिरमी कडं जावून बसलो. कायतर विचारत होती म्हातारी. पिकपाणी काय म्हणतंय ? मी रानात जातो खरं मला पिकं काय म्हणटलेललं आठवतंअंच नव्हतं. फुलावरचा गड्डा कवाच म्हणटला नही मी आलोय मला काढा. तरीबी थापा हाणत बसलो. म्हातारीनं काजू दिलं. खात बसलो. काजूच्या फाकळ्या करताना भारी वाटायचं. असंच बराच वेळ गेला. पावणेतीन वाजले. आज्जे येतो गं म्हणून पाया पडून निघलो. 
काजू जीन पँटच्या खिशात घातलो. आंब्याच्या झाडाखाली वाट बघत बसलो. साडेतीन वाजलं तरी प्रज्ञा आली नव्हती. प्रज्ञा ला प्रज्ञी म्हणाव वाटलं. टाईमपासला माझ्याकडंची असलेली काजू पण संपली चार वाजून साडेचार झालं. राग यायलता. घड्याळ हातातंन फेडलो आणि स्टापवाॅच लावून सेकंदं मोजलो. यात पंधरा मिनटं गेली. तरी ती काय यायचं नाव घेत नव्हती. परत बुद्धी सूचली, घड्याळात तारीख होतं. जर एकतीस डिसेंबरला रात्री बारावर वेळ सेट केली तर घड्याळ आपल्याला हॅप्पी न्यु इयर म्हणटल तर ? असा विचार करून वेळ बदलणार एवढ्यात ती तिकडंन ती पळत येताना दिसली. घड्याळ दूमडलो आणि खिशात घालून तिच्याकडं बघत राह्यलो. ती शंभभर मीटरच्या स्पर्धेत पळताना जेवढं जोरात पळत्यात तेवढं पळू लागली. मलापण हात उडवत खूनवली. मी पण पळायला लागलो. वस्ती संपलीती परत एक आंब्याच्या झाडाखाली जावून थांबलो. ती धापालती आणि मीपण. आत्ता कुठं जायाचं ? 
हा जायाचं ! 
ती अजून धापालती. मला घड्याळ आठवल परत खिशातंन घड्याळ काढून हातात बांधलो. ती म्हणटली इथनं खाली उतरल्यावर आमची आंब्याची कलमं आहेत तिथं जावू. उताराला हसत हसत हसत उतरालती. 
काय झालं का हसाल्यास ? 
ती म्हणटली तुला फसवलं मी ! झोपलीती मी. 
मला खरतर वैट वाटलंत काय हे ? मी दिवसभर हिचा विचार करालतो आणि ह झोपली हूती, रात्रीला काय मेंढरं राखायला जाणार हुती ? म्हणून विचारलं. 
मेंढर हिकडं नसत्यातंच खरं. आंब्याच्या झाडाला मेंढराच्या लेंडक्या कुठं लागायच्या ? 
उतार संपल्यावर एक पायवाट हूती त्यापुढं च्वकची ची कुंपन हूती. दोघं चाललो तिथंन आत गेल्यावर हिची वाट बघितलो. सशासारखं उडी मारून ही आत आली. एक लांबडा दगड हूता त्यावर बसलो. ती जवळ येवून बसली. मला सारखं तिइचा हात हातात धरून बसावंस वाटालंत. ती वेतोबाच्या गोष्टी सांगालती. ऊगचच तीच बोलनं शिरमागत वाटायला लागलं. मधंनच फ्राॅकच्या खिशातंन काजू काढली आणि दिली. मी तिच्या जवळ सरकून बसलो. तिला म्हणटलो तू गिड्डी हायीस माझ्यापेक्षा. 
गिड्डी ? काय घाणेड्रं बोलतोस रे ! 
घाणेड्रं नव्ह गं, घाणेरडं. 
तेच ते. 
खर तू ऊंचीनं लहान आहेस.. 
खोटाड्रया. 
जवळ ये सांगतो म्हणटलो. 
ती बघबघ म्हणत जवळ आली. 
मी तिच्या खांद्यावर हात टाकला. बघ ऊंच मीच. 
ती म्हणटली, मुर्ती लहान किर्ती महान ! 
मी तिचा हात हातात घेतलो. ती कायच म्हणटली नही. 
चल फिरूया कलमात म्हणटली. कलम म्हणटलं की मला हासू येतंय. 
बराचवेळ तिचं हात हातात घघेवून हिंडलो. हि उगचच जून्या आठवणी उकरून काढत हूती. दूसरीच्या पूस्तकात हे ते ते..... 
मला तीच ऐकून घ्याव वाटलं. नंतर म्हणटली आता तू बोल. 
मला ऊगचच हसायला येत होतं. ती आं आं आं म्हणटली की मला लाल झाल्यागत वाटायचं. तिच्या खांद्यावर हात टाकून तिला म्हणटलो मला तू आवडतीस. तूला सांगताना भारी वाटालंय. 
हं हं हं. 
माझी गाडी थांबवत ती बोलली. मी ब्रेक लावलं. म्हणटल आता काय व्हायच ते अॅक्सीडेंट हू दे. 
ती म्हणटली. तू पण मला लै लै आवडतोस. 
ती लै लै हे मला नाव पाडलीती. खरं तिच्या तोंडनं ऐकताना कानं गरम झाली. ढवशा वार्यात तीचं हे बोलनं ऐकून उधळून घ्याव वाटलं. मग आम्ही ऊशिरभर काय पायजे ते बोलत राहीलो. व्यंक्याला ही आवडायची. व्यंक्या तिला आवडत नव्हता. हे ती बोलली. मला मग ताव आला. मी नैनी काळी हाय मस्तवाल हाय हे सांगत राहीलो. 
साडेसहा वाजले. मला मामाबरोबर हाटेलात जायच हूतं. तीची मावशी येणार हूती. आम्ही दोघं गेलो. शिरमाच्या घराजवळ गेल्यावर ती पुढं गेली. मी मागं राहिलो. तिनंच तसं सांगितलं. जाताना हात हलवत टाटा केली. मी ही हात हलवला. 
ती गेल्यावर मी घरात गेलो. 
मामा म्हणटला, चल जावूया. मामी म्हणटली चैनी आहे आज. आज्जी म्हणटली रात्रं करू नका यायला. 
मामा मी जनार्दन हाॅटेलात जेवलो. मामापुढं प्रज्ञाबद्दल बोललो. तर मामाचं आणि प्रज्ञीच्या मावशीच हूतं लफडं. प्रज्ञीच्या आजाला गावल्याप्यटाला तिच लग्न लावलंत मुंबईच्या पावण्याबरोबर. मामाला म्हणटलो तूझा डाव उद्या येणार हाय. मामा हारकला. मी फूल्ल जेवलो. 
घरला येवून झोपलो. 
मला उद्याचा दिवसाचं व्हारं लागलंत. प्रज्ञा एक आणि प्रज्ञाची नंदामावशी. माहणजे मामाचं झंगाट. 
सकाळी ऊठलो , आवरलो. व्यंक्या, परश्या दोघंच आलती. दगडं फळवून खेळूया. व्हष्टर दाखवला व्यंक्यानं. खेळ चालू झाला. व्यंक्या बदला घेत हूता. तीन बार लंगडी घातलो. मला कालंच बर वाटलंत प्रज्ञा म्हणटली व्यंक्या आवडत नही तवा. 
परत कचायला आलो तवा प्रज्ञा आणि द पाचसहा जण जाताना दिसले. त्यात तीन बायका दोन मुलं होती. ती एकदाच बघून हसली आणि गेली. मी म्हणटललो डाव बास घरला जातो. तसं ती दोघंपण गेलीत. मी घरात गेलो गाडग्यातलं पाणी पेलो. आणि परत काल संध्याकाळच्या कलमात ती गेली असलं म्हणणून पळतंच गेलो. 
च्वकची दाटून गेल्यावर ती दगडावर त्यातल्या एका पोराबरोबर बसली हूती. नंतर दोघं एकमेकाबरोबर लईच बोलण्यात गुंतलेले दिसलं. मला राग आणि रडू आलं. घरात पळत आलो. हातपाय धूतलो. बिनजेवता झोपलो. आज्जी म्हणटली काय झालंय. मला बररं वाटना, मी गावाला जातो आमच्याआमच्या. आज जाणार बघ. मामाला सांग. सोडून यायला. 
आज्जी उगचच हात फिरवत राह्यली अंगावरनं. 
मामा दूपारी आला. मामाला म्हणटलो गावाला जायला पायजे. 
खोटखोटं बोललो. आज्जीनं काजू नारळाआच्या वाट्या सूपारर्या करंबुळं दिली पिशवीभरून. मामा बावड्यापर्यंत येवून यष्टीत बसवून शंभर रूपय दिवून गेला. 
वझ्या पिशव्या घिवून घरला आलो. मम्मी म्हणटली सुट्टी बोंगाळली काय ? 
कशाला खरं सांगू. नंतर मामाच्या गावाला मी चारवर्ष गेलोच नही. 
बारावी झाली आणि आज्जी गेली तवा गेलो. व्यंक्या भेटला. त्याला मोबाईल नंबर दिला. व्यंक्याजवळ प्रज्ञाबद्दल विचारू वाटत होतं. पण गप्प बसलो. खरं सारखं ती आठवायची बेवफा सनम. 
माझी बीएस्सी झाली. अधूनमधून मी व्यंक्या परश्या बोलायचो फोनवरंन. आता त्यादिवसापासून सात वर्षं उलटलीती. व्यंक्याचं लग्न ठरलं. व्यंक्याला आई नव्हती म्हणून लवकर लग्न करत होते. त्यानं बोलवलं. चारदिवसाच्या तयारीनं ये म्हणटला. खरं मला जमलं नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी पोचलो. 
व्यंक्या शिव्या घालायला लागला. मजेचं वातावरण होतं म्हणून विचारलं प्रज्ञा ला सांगितलायस का ? 
तो हसला. हसत राह्यला उशिरभर. सांगितलोय रे म्हणटला. दूसर्या दिवशी लग्न कार्यक्रम चालू झाला. अक्षता पडल्या. मी तिला शोधत होतो. 
नवरी मुलीतल्या सगळ्या करवल्या दांडारलेल्या वाटत हुत्या. त्यामागं एक चेहरा हूता. मी वळकलं हिच ती. तिच्याकडं गेलो. जात असताना परत तेएव्हासारखाच हात उडवली. मी तिच्या कलमाचा रस्ता धरला मागून ती. शिरमाचं घर आल. तिथ थांबलो. तरर ती म्हणटली अजून पूढं. मग उतरतीला लागल्यावर ती आली. कुठंहोता इतकं दिवस. मी किती शोधल तुला. 
मग मी तिला खरं जे बघितलंत ते सांगितलो. ती जोरात हसायली. म्हणटली तो माझा मावसभाऊ होता. मग परत दगडावर जावून बसलो. माझी ऊंची जास्त आहे म्हणटलो. तीनं हातात हात घेतला. 
इतक्यात व्यंक्याचा फोन आला. दोघ बरोबर निघालो. शिरमा म्हातारी घराबाहेर तोंड धुवत होती. ती म्हणटली आत्ता परत असं करू नको. इकडं व्यंक्यापर्यंत आलो तर मामा हिच्या नंदामावशी बरोबर हसत खिदळत होता. जाताना नंबर घेतला आणि जाताना वळून बघत टाटा करत होती मी पण हात उचलायचा प्रयत्न करत होतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं