हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

राजु शेट्टींविरोधात कोण ?

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रमुख लढाई होईल असे चित्र आहे.



 तरी आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू आहे मात्र या सर्व आरोप प्रत्यारोपात कुठेही शेतकरी ,कामगार, वाढती महागाई, वाढत्या खतांच्या किमती, इंधन दरवाढ, गॅस दरवाढ आदी गोष्टींची चर्चा होताना दिसत नाही.

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना इथे लढत दुरंगी होईल की तिरंगी होईल याबद्दल अजून चित्र स्पष्ट व्हायला अवधी आहे.

 दोन टर्मचे खासदार असणाऱ्या राजू शेट्टी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एक लाखाने पराभूत व्हावे लागले होते.




तिथेच दहा ते पंधरा दिवसात शिवसेनेत धैर्यशील माने यांचा प्रवेश झाला आणि त्यांना लोकसभेची लॉटरी लागली या लॉटरी नंतर ते खासदार म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कुठेही फिरताना किंवा काही विशेष काम करताना नजरेस येत नाहीत. त्यामुळे लोकांत त्यांच्याबद्दल नाराजी दिसून येत आहे.

राजू शेट्टी खासदार असताना त्यांचा जनसंपर्क होता आत्ताही तो आहे मात्र या लोकसभेला धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत होईल अशी लढत होईल असे चित्र सध्यातरी दिसत असले तरी ज्योतिरादित्य सिंधिया (केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री) यांचे वारंवार दौरे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहेत.




 परवा हातकणंगले मतदारसंघात सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.

 तसेच भाजप सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी सक्रिय झाली आहे‌.

 त्यामुळे धैर्यशील माने हे भाजपकडून उमेदवारी करतील की शिवसेनेकडून हा प्रश्न आहे.

किंवा ही जागा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासाठी सोडण्यात येईल का ?  अशीही चर्चा लोकांत आहे




राजू शेट्टी ज्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तेथील त्यांचे जुने सहकारी आणि आत्ताचे ठाकरे गटाचे नेते उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच बाहेर पडून आमदार झाले‌.

आता राजू शेट्टी यांनी कोणाशीही युती अथवा आघाडी करणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे इथून महाविकास आघाडी कडून माजी आमदार उल्हास पाटील यांचेही नाव लोकसभेसाठी आघाडीवर आहे.



 शिरोळ तालुक्यात माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरुद्ध गणपतराव पाटील हे उमेदवारी करणार असल्याने उल्हास पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात काँग्रेसकडून कसलीही आडकाठी येणार नाही असे चित्र आहे.




 दुसऱ्या बाजूला जयंतराव पाटील यांचे सुपुत्र प्रतीक जयंत पाटील यांचेही नावाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस कडून होताना दिसत आहे. यामुळे सध्या तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कोणाला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची चित्र स्पष्ट होताना दिसत नाही.



मी लोकसभा लढवणारच या दृष्टीने एकाही लोकप्रतिनिधीची सध्या तयारी दिसत नाही मात्र पडद्याआडून हालचालींना जोर आलेला आहे‌.

 इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनाही भाजप लोकसभेसाठी मैदानात उतरवेल असा काहींचा अंदाज आहे मात्र ते काही शक्य होईल असे दिसत नाही.



 सध्या तरी राजू शेट्टी हे कोणत्याही बाजूचा पाठिंबा न घेता आपण अपक्ष लढू या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे राजू शेट्टी यांच्या विरुद्ध कोण ? हा खरा प्रश्न आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं