भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

राहूल गांधीची काल फ्रान्स मध्ये एका विद्यापीठात मुलाखत झाली. त्यात तो थेट चायनावर निशाणा साधतो आहे. त्यांच्याकडे असणारी हुकूमशाही आणि म्हणून असणारी कामगारांची पिळवणूक हे मुद्दे त्याने मांडले.



चायना को लाल आँखे दिखाना चाहीए वाले मोदीजी चीन भारतावर अतिक्रमण करत असताना चुपचाप बसले आहेत हे अख्खा देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तिथं राहूलने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मुद्दे मांडले आहेत.

जगभरातील पत्रकार जी २० परिषदेसाठी आले आहेत. देशात घेत नाहीत ते ठीक पण इतर देशांच्या पत्रकारांशी मोदींना बोलता आलं असतं पण तिथंही त्यांनी ५६ इंची छाती दाखवली नाही ती पत्रकार परिषद टाळली. 

हे झालं मोदी राहूलचं. आता देशातलं वातावरण पाहीलं तर जवान चित्रपट जोरदार हिट होत आहे. त्यात शाहरूख खानने कुणाविरूद्ध काय आवाज उठवला आहे हे चांगलंच सर्वांना माहीत आहे. शाहरुख खानची जवान वरून वाहवा होत आहे.

देशभरात सिनेमा हाऊस फुल्ल आहे. पण त्यातील संदेश ही तरूण वर्ग गांभीर्याने घेत आहे हे महत्त्वाचं. शाहरुख खान ने मतदानाविषयी केलेलं भाष्य लोकांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहणारं आहे. 

देशभरात भाजपाविरोधी लाट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जी २० परिषद ही रोटेशन पद्धतीने आपल्याकडे आली आहे. त्यात विश्वगुरूचे काही खास कौशल्य नाही हेही लोकांपर्यंत तळागाळात पोचलं आहे. 

संसदेचं खास अधिवेशन बोलावून काही तरी भाजप करू पाहत असली तरी लोकांच्यात त्याबद्दल उत्सुकता कमी आणि भिती जास्त आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे काय करतील हे सांगता येत नाही.

पोटनिवडणुकीत भाजप उत्तर प्रदेशमध्ये सपाटून मार खाल्ली आहे तिथेच देशभरात इंडिया आघाडीला पाठिंबा मिळाला आहे. हे वातावरण पाहून मोदींनी ईंडियाचा भारत करण्याचा कोडगेपणा केला. तोही लोकांच्या पचनी पडला नाही.

येणारा काळ काय असेल याबाबत या वरील सर्व घटनांकडे पाहता लक्षात येतं. लोक वाट पाहत आहेत ती निवडणुकीची. ज्याला भाजप घाबरली आहे म्हणून झेडपी पासून मनपा निवडणूक पुढं ढकलत आहेत. एवढंच काय महाराष्ट्रातील २लोकसभेच्या पोटनिवडणूका रद्द केल्या. 

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे. 
देश निवडणुकीची वाट पाहत आहे एवढाच याचा अर्थ आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

पावसाचं आवाज कसा येतं