मी पूरोगामी आहे.

मी पूरोगामी आहे. यमपीयस्सीचा आभ्यास करताना ठरविलो. पूरोगामी व्हायचं. मला आगूदर पूरोगामी मंजे वेगळे वाटायचे. आता वेगळे वाटते. पूरोगामीपण चेक करावे वाटले. घरात म्हणटलो पूरोगामी आहे मी. घरातले म्हणटले हे काय ? कुठली पोश्ट काढलीस ? हाहा पुरोगामी पोश्ट. लहान असताना मी पूरोगामी नव्हतो. आता आहे. कसं ? 
लहान आसताना मी कंडा बांधायचो हातात. आता बांधत नही. 
शाहू फूले आंबेडकर. मी पुरोगामी. पूरोगामी संगीतातले स्वर परगम. सारेगमपधनीसा. देवळात जात नाही. देव नसतो. म्हणजे ती संकल्पना आहे. तुम्ही म्हणशीला देव नसतो म्हणजे हा देवाचं अस्तित्व मान्य करतो. 
मी पोश्ट काढली. मंत्रालय सहाय्यक. घरात कळलं. बारक्या भावानं फटाके लावले. आईनं लक्षुमीला निवद दाखवलं. वडलांनी पेढे आणले. मला आनंदात कळलंच नही. पूरोगामीपण गेले असं वाटलं. नाही. माझा अभ्यास आहे. पुण्यात दोन वर्षं काढली मी. पुण्यात लोक हूशार आहेत. मला पुणे आवडतं. गावातली पोरं आयट्या करून कंपनीत कामाला. ईकडे त्यांचे आईवडील सांगतात आमचं पोरगं पुण्याला. गंमत वाटायची. पोश्ट काढल्यावर पुढे युपीएस्सी द्यायची होती. पण नको म्हणटलं. आता पूरोगामी पद्धतीने लग्न करावं असं ठरवलो. मी आदर्श आहे. माझा समाजाने आदर्श घेतला पाहीजे. यासाठी मी आता लग्न पूरोगामी पद्धतीने करावे लागणार. दूसर्या जातीतली करून घ्यावी. मी सिंगलच होतो. जातीबाहेरचे लग्न म्हणजे प्रेम करावे लागते त्यासाठी. त्याशिवय होत नही. जातिव्यवस्था नष्ट होणार. मुंबईत बीचवर फिरायचो. मंत्रालयात नोकरी म्हणजे गावाकडे भारी वाटते. मला नाही. वर्षा मराठवाड्यातली ऊस्मानाबाद जिल्हा. मी पश्चिम महाराष्ट्रातला. एमपीयस्सीच्या भाषेत सांगतो. औरंगाबाद विभाग आणि पुणे विभाग. वर्षासूद्धा मंत्रालय सहाय्यक. आम्ही बोलत असतानाच कळले. काय ? जात. 
तीच विचारली. मग मी सांगिटलं. मूली खूपच कमी समाजसूधारक आहेत. मला माहीत आहे. यमपीयस्सीत जवळजवळ समाजसूधारक पूरूष जादा. मी समजून घेतलं. माझा अभ्यास आहे. मग आमचे प्रेम जूळले. कसं काय बोलताबोलताच. मी म्हणटलं लग्न करूया ? ती लाडात येवून म्हणटली हाव ना करूया. मराठवाडी भाषा. ती ही शूद्ध बोलते. पण मध्येमध्ये लाडात आली की ग्रामीन होते. क्युट आहे, मी पण स्मार्ट आहे. 
हाव ना. 
मग मी म्हणटलो, घरी विचारतो तुही विचारून घे. 
परत हाव ना. स्माईल आहा. 
घरी आलो. आईला सांगिटलं. माझं जमलंय. आईनं जात विचारली. मी म्हणटल बाहेरची आहे. 
आई म्हणटली करून घे बाळ, शिकलेली समदी असंच करत्यात माझ्या पोरानं केलंतर कुठं बीघडलं ? आई पूरोगामी आहे असे वाटले.
वडीलही म्हणटले करून घे दोघं मिळवती हायसा. 
मी वर्षाला फोन केला. लागला नाही. सकाळी लागला कळवलं. तिकडंही तसंच. सासरेबुवांनी भेटायला बोलवल. 
एसटीने गेलो. सासरे म्हणटले तुम्ही मोठ्या घरातले. संभाळून घ्या पोरीला. 
लग्न झाले. कोर्टात. रिसेप्शन ठेवले. कोणताही विधी झाला नाही पूरोगामी लग्न झाले. 
ती देव मानते. गणपती बसवला. मी घंटी वाजवली तीने आरती म्हणटली. कुणाच्या भावना कशाला दूखवा ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं