ईचलकरंजीला बाजारला जावून आलो. थोरात चौकात मोठ्ठा बाजार असतंय दर शुक्रवारी. सण २००८ ला मिरज दंगल झाली होती पाठोपाठ ईचलकरंजीतपण दंगल झाली. त्यावरून तिथली संवेदनशीलता ध्यानात येत्या. 
तर ह्या थोरात चौकात डझनभर गायी मोकाट हिंडत असतात. बाजारात पण हिंडतात. शिंग मारतात. भाजीपाला नासधूस करतात. 
आत्ता महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी लागु झालीय. त्यात ईचलकरंजी सारख्या संवेदनशील भागात अशा मोकाट गायी हिंडत असतात. कुणाची मानसिक स्थिती काय सांगता येत नही. आज ना उद्या जर कुणी स्वसंरक्षणार्थ ह्या गायींवर हात उगारला तर कुणाच्याही भावना दुखावल्या तर परत त्याच पर्यावसन धार्मिक भांडणात व्हायची शक्यता नाकारता येत नही. त्याप्रसंगी अशा गायी ज्या भागात हिंडतात त्या गायींना गोशाळेत दाखल करावं. किंवा त्यांची काहीतरी सोय लावून बंदोबस्त सरकारने करावं. अन्यथा भावना दुखवायला निमित्तच लागतंय लोकांना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं