तुला लागल्या म्हणजे लै चांगली ! :D :P

एका लांबच्या पावण्यांकडे जवळच्या पावण्याबरोबर आलोय. तिथं लग्न ठरलंय, जवळचा पावणा पण माझ्याच वयाचा हाय. सकाळी जेवून खावून बसलो तर नंतरन एक पोरगी दिसली तिथं. कट्ट हूती दिसायला, मला आवडली आणि माझ्या अगोदर पावण्याला. ह्यो गडी म्हणटला हे माझा विषेय हाय तू हात घालायच नही. 
मी बर म्हणटलो. पावणंपै जरा जास्त असल्यानं काय हालचालपण करायला यिना. त्यात ह्यो गडी डाव टाकायला जाताना एॅपलच फोन फिरवत चाललाता. जावून विचारला नाव काय ? 
ती काय बोल्ली नही. हे मला यिवून म्हणटलं, बोलत नही ती. बसून कंटाळलतं ते, आणि त्यांचं जरा जवळच पावणं असल्यानं ह्यो तिथंच लोळत झोपला.
मी पण त्यांच्याच टेबलावरचं पेपर फाडलो नंबर लिवलो आणि तिच्याकडं टाकलो. चिठ्ठी ऊचलली आणि दूसर्या मिनटाला व्हाटसप चालू झालं. 
पुढची बोंब असं झाली की ती कर्नाटकातली. पहीली दोन मेसेज वाचून काय कळंना झालं. मराठी इंग्लीश मध्ये टाईपलेलं ओळखतंय, खरं कन्नड ईंग्लीशमधे कळत नही. मग नंतर डोस्कं लागलं हे कन्नडी हाय. मग असंच असंच चॅटींग करत बसलो. ह्यो ऊठला आत्याला चहा कराय लावला.
चहा घिवून तीच पोरगी आली. मला लाईन देत गेली. ह्यो म्हणटला घाणा घाटलास ?
चिडलंय जबरदस्त. मग तिथंनं आम्ही दोघं यायला निघालो. मामा म्हणटला, या आणि कधीतर.
रस्त्याला गाडी लागली हे मला बेक्कार शिव्या देत विचारला कसं लावलास सांग ?
मग थांबवून त्यला चॅटींग दाखवलो. ते म्हणटलं एवढं डोस्कं आभ्यासात लावला असतास तर कल्याण झालं असतं, ह्या असल्या स्किमा करून बोंबलत बसलाय बघा.
मला लई हासायला आलं. यिवूपर्यंत त्यला एकच गोष्ट सारखं म्हणटलो, पोरगी मनानं लै चांगली हाय रे !
हे म्हणटलं, तुला लागल्या म्हणजे लै चांगली !
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं