डाक्टराच्यात आणि रेड्यात काय फरक राह्यला ?

एका गावात एक जनावराचं डाक्टर आलं, नवीन शिकलेलं हुतं, हुशारबी हूतं. हाळूहाळू जम बसाय लागलं. डाक्टरंच गुण यायला लागलं, म्हसरं पटापट गाब धराय लागली. डाक्टराची किर्ती झाली. 
त्या गावातला एक भाग हूता, तिथली माणसं लै कडू, म्हस ओपला यायच्या आगूदरंच गाब घालवायची. आसं एक म्हस गाब आलेली नही म्हणून डाक्टरंन प्रामाणिकपणानं सांगिटलं, तर त्यो गडी म्हणटला घाला लस त्या नादानं का हूईना लवकर ओपला यील. डाक्टरला पण पैशाशी मतलब डाक्टर बी गाब घालवायचा. 
आसंच दिवस चालली, एखादं जनावर दोन टप्प्यात गाब गेलं नही की त्या भागातली लोकं डाक्टरला शिव्या द्यायची. मग डाक्टर ते भाग सोडून दिला.
त्या भागातल्या एका मस्तवाल माणसाची म्हस आजारी पडली, ह्यो डाक्टर तर जायचंच बंद केलता, बाकीची तर आगूदरपास्नंच जात नव्हती. मग परत ती ह्या डाक्टराला पिडाली. ह्यानं गावातल्या एका म्हातार्या डाक्टरचा नंबर त्यला दिला.
त्यो म्हातारा डाक्टर कुणाच्या पण गोठ्याला जायचं झालं तर न्यायला सोडायला गाडी लागायची. तश्या अटी त्यानं सांगिटलं. रोज सकाळी म्हशीचा मालक आल्यावरंच डाक्टर अंघूळीला जायचा, मग त्याला तासभर तिथंच ताटकळत बसावं लागायच. नंतरनं गोठ्याकडं नेल्यावर डाक्टर म्हणटला म्हस लै आजारी हाय, धा दिवस बघायला पायजे, माझी रोज्ची फी सातशे रूपयं. म्हसराच्या मालकापुढं पर्याय नव्हतं. झक मारत सात हाजाराला वाकला.
नंतर एकदा तरणा डाक्टर ह्या म्हातार्या डाक्टरला विचारला ह्या गावात एवढं दिवस कसं काय तळ हाणलाय तुमी ?
म्हातारा डाक्टर म्हणटला, बोलविलं त्या वेळला रोजरोज गेलं तर डाक्टराच्यात आणि रेड्यात काय फरक राह्यला ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं