आणि.

लग्नानंतर पहिला पावसाळा. माझं लग्न एप्रिलमध्ये झालं. म्हणजे 15 तारखेला झालं. बायको शहरातली, मी खेड्यातला. खरं मी निम्मं शहरात निम्मं गावात. म्हणजे माझी ड्युटी साॅरी जाॅब शहरात, राहायला खेड्यात. इथं आल्यावर मी शुद्ध बोलालो, गावात गावठी बोलतो. बायकूला घेवून मी ईकडं सेट झालोय. गावात नकोच वाटालतं. यावर्षी पाऊस नही, रिमझिम आहे. मे पर्यंत रविवारी गावाकडं जायाचो मी बायको दोघंपण. रविवार भैरोबाचा वार, बायकू मी देवाला जायाचो, बायकूचं आणि माझं दोघांचं देवावर ईश्वास हाय, तिचा गणपती वर आहे, माझा भैरोबावर हाय. तरीबी आम्ही एकमेकांच्या देवाचा आदर करतोय. गावात भैरोबाला मी आणि ही. हीच नाव रूपाली. मी रूपाली दोघं जायचो. दर्शन करायचो. आता जायला नको वाटतंय. म्हणजे मलाच नको वाटतंय. गावातली लोकं चांगली नहीत. म्हणायची ही आली आणि पवूस गेलं. म्हणून जात नही.
रूपालीवर माझं प्रेम आहे नही हाय. हाय जवळच वाटतंय. आहे म्हणटलं की ऊगच बरमूड्यात बनेल इन केल्यागत वाटते. रूपालीवर माझे प्रेम आहे. आरेंज लगीन असल्यानं प्रेमपण आरेंज.
लग्नावेळी ही एकटी नही आली, बरोबर मांजर पण घिवून आली. डिंपी नाव मांजरीच. झक मारत हिकडं पण आणलं. माझं मांजरावर प्थेम नही तिच हाय. रूपीला काय अक्कल नही, म्हणजे जेवण ते म्हणावं असं जमत नही. आईची आठवन येत्या त्यामुळं.
हिला पण कुठतर चिकटव म्हणून बाबा म्हणटला. सासरा नही, मेलाय सासरा. मला वईट वाटतंय. असू दे.
हिला पुस्तक वाचायला आवडतंय. न्युमरालाॅजी येत्या. माझं जल्मतारीक 26 शुभांक आठ. शनीचा आकडा. ही माझं भविष्य बघत्या. मला काय कळत नव्हतं सुरवातीला आत्ता कळालय. मी सहज बघिटलो कुणाची जल्मतारिक काय ? मोदी मनमोवन दोघं आठ वाली. शनी वांड. ही म्हणटली हनुमान परफेक्ट देव हाय तुझ्यासाठी. हानुमान मला पण आवडतो. हनुमान चालीसा, आरती, स्तोत्र सगळं तोंडपाठ हाय.
आरतीत वानर कटका चटका लावुनिया गेला असं ऐकलं की मला रडायला येतंय. हानुमान चांगला. हानुमानला लाल फुलं आवडतात. मी गुलाब आणलोतो, रूपी म्हणटली तुझं डोकं ठिकाणावर आहे काय ?
ऑ ? हीच सगळं म्हणटली ते बरं केली.
मग जास्वंद घेवून गेलो. पुजार्याला म्हणटलो काय काय आवडतंय ते सांगा ?
ऊडीद, मोठ्ठं मीठ, तेल, साखर.
फुलं लाल. जास्वंदचं.
गूलाब नही.
त्यादिवशी ते गुलाब तिलाच दिलो. नंतर जरा मूड झाला. गालावरंन फिरवत बसलो. आणि मग... हां.
नंतर ती ऊठून गेली, गुलाब घेतलो. वास घेतलो. हिच्या पावडरचाच वास आला. गावातलं गुलाब वास देतं. हिथं पावडर.
आज दूपारला पावूस पडलंय. रापरीपराप्परीप्प. गावातपण पडलंय म्हणं, थोरल्या माळावरचा वढा आलाय. केशव सांगिटला. मी भिजतच घरला आलो. ही दंगा केली भिजत कशाला आलास ?
तूला काय महित मज्जा. म्हणटलो आणि आणि ...... हां.
आता शनवारला रजा टाकणार, हिला गावाकडं नेतो. गावातल्या हानूमानला जायाचं शनवारी....
आणि.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं