बापा

ए आय ट्रिपल ई चा फाॅर्म भरायचा होता बारावीला वडलांची सही लागत होती, गडबडीत फाॅर्मवर सही राहीलीती आणि तसाच फाॅर्म सबमीट केलता. क्लार्कनं फाॅर्म परत केला. दूसर्या मिनटाला परत मीच सही मारून फाॅर्म सबमीट केला. क्लार्कला काळाबाजार ध्यानात आला. त्यांनी थेट प्रिंसीपलांकडे तक्रार केली. मला बोलवून घेवून घरला फोन केला. 
वडलांना म्हणटले की, तुमच्या मुलानं डुप्लिकेट सही केलीय. 
बापा म्हणटले, करू दे की मीच सांगिटलोय. 
मग प्रिंसिपल म्हणटले, 
अहो बँकेत ते डुप्लिकेट सही मारली तर ?
नही मारणार त्यो !
फोन कट करून प्रिंसिपलांनी माझ्यापुढं हात जोडलं आणि म्हणटले धन्य आहेस बाबा !
माध्यान्ह भोजन आता आलं. आधी तांदूळ यायचे. त्याला घरातल्या कुणाचीतर सही लागायची. बापांनी तवाच शाळेत सांगिटलं, करू दे सही.
नंतर माझं मला वईट वाटायचं की, आपन त्यांची सही करतोय. मी एकदा बोललो. तर बापा म्हणटले तुझ्यावर भरोसा हाय.
माझ्या बापांचं शिक्षण कमी. शेतीत लहानपासून राबले, अजून राबणं चालूच आहे. जसं कळायला चालू झालं तवापासूनच मी पण शेतात चाललो, मी गेलो की कौतुक असायचं.पण ते मला कधी बोलून दाखवायचे नाहीत. मम्मीपुढं कौतुक करतात.
कधीच हात लावला नही. मम्मीचा मार खाल्लोय लै.
बारावीच्या निकालावेळी माझ्या चारपाच मित्रांची टोळी घरात हूती. सगळे आम्ही नापास झालो. बापा रागावले नाहीत. ऊलट म्हणटले, पुढच्यावेळी अभ्यास करा पास व्हा. बाकीचे दोस्तमंडळी घरच्यांच्या भितीने माझ्या घरून हालले नव्हते. नंतर संध्याकाळी गेले. सगळ्यांना बद्या मार पडला.
दूसर्या वेळी मी पास झालो, तवा फक्त आधार बापांनी दिलता. तास अंधारात क्लासला सोडायला यायचे सातवीपर्यंत. शाळेत गुपचूप येवून सहलीचं फी भरून जायचे. नंतर कळलं की भारी वाटायचं. लागील तेवढं पैशे घिवून जा. असं अजूनपण सांगतात. आम्ही दोघं भाऊ सिद्धार्थला पण तितकीच माया माझ्याएवढी. त्यांचं जास्त जमतंय. ते कायतर ठरवलेलं असत्यात. माझ्या डोक्यात दूसरंच कायतर चाललेलं असतंय. ऐनटायमाला गोंधळ घालण्याची माझ्या सवयीमुळं त्यांचं ठरलेलं बदलायला लागतंय.
कधी रागावलेच तर हसत हसत दिवसा ऊजेड पाडणार तु ! ह्यो ठरलेला डाॅयलाग.
आजही बाजारला जाताना गाडीला पोतं बांधून ठेवायला तेच असतात. तिथं गेल्यानंतर गाठ सुटता सुटत नाही.
शुभेच्छा दिल्यातर खुळ्यात काढतील मला.

टिप्पण्या

Kaustubh म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं