मला दोन बायका

आमचं कुटूंब हाय, मला दोन बायका. मी O हाय. त्या दोघी H हायीत. मग आमचे वर्तृळ पुर्ण झाले. म्हणजे कुटूंब. आम्ही कुणीच आडनाव लावत नाही. आम्हाला H20 म्हणून ओळखतात. मी गोव्यात हिंडलतो तवा एका बाईनं सिगरेटमधंन मला वढलं. मी आत गेलो, रक्तात मिसळलो. तिथं ह्या दोघी भेटल्या, भनीभनी हायीत, माझं दोघींच्यावर प्रेम हाय, आमचं सूखी कुटूंब त्या बाईच्या कपाळातून बाहेर पडलं. नहीतर तिथं कितीतर कूरूप C सिगरेटमधंन येत होत्या. घामातंन थेट समूद्रात गेलो. दोघीस्नी घिवून समूद्रात भरपूर हिंडलो. एका सूरमईनं आम्हाला गिळलं. तरी आम्ही जिवंत हूतो, दोघी म्हणटल्या असं घर पायजे आपलं. तोपर्यंत सूरमईला पकडलं. आम्ही सूरमईतच होतो. सूरमई हाॅटेलात गेली तवा आम्हाला घराला गिलावा केल्यागत वाटलं. मग हाॅटेलवाल्यानं सूरमईला तव्यावर टाकलं आणि ह्या दोघी माझ्यापासून लांब गेल्या आणि हरवल्या. माझं ब्रेकप झालं. मी परत एकटा पडलोय.
जावू दे. पुढच्या वेळंला नव्या दोघी घेवून कुटूंब तयार करणार आणि कुणाच्या तर ब्रेकप पार्टीतल्या दारूत जाणार ! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं