गडी रंगात आलता.

रेल्वेमधे रात्र झाली की मधली शीट एॅडजेस्ट करून सगळे झोपत्यात, खालच्या शिटाला तेवढंच खिडक्या असत्यात. तिथं मित्र झोपलाता. म्हणून दूसर्या बगलच्या मधल्या शीटवर झोपलो. तर तिथं पुढच्या स्टेशनला लोकं आली. मग थेट वरच्या शीटवर मी गेलो. वर जावून टफ आणि मजबूत पंखं यापलिकडं काय नव्हतं. मला वईट वाटलं. खाली आणि मधे पण मित्र झोपली हूती त्यांना ऊठवायला नको वाटलं. मग ऊगचच त्या पंख्याकडं आणि जाळीकडं छताकडं बघून किती कमी जग हाय असलं नको ते विचार यायला लागलं. मग म्हणटलं नाण्याला दूसरी बाजू असत्या वर वईट असलं तर खाली चांगलं असेल.
खाली एक नजर टाकलो तर मधल्या शिटावरला मित्र खालच्या शिटवरच्याचा मोबाईल घिवून त्यात फेसबूक उघडूण पोरीबरोबर च्याटींग करालता. चार्जर बारिक असल्यानं हात कडला धरलाता. त्यामूळं मला वर स्पष्टपणं सगळं दिसायला लागलं.
गडी रंगात आलता. मला असं बघून लै मज्जा यायलती आणि हासू आवरना झालतं. शाल तोंडात कोंबून कंट्रोल केलो.
ती : me jate
हा : kuth janar ?
ती : pagal
ह्यला इथं कागल असं दिसलं असावं.
हा : ky krnar jvun ?
ती : Mental
हा : zal ky ?
अगायाया आसलं हसायला लागलो. त्यात त्यला गावलो. त्यनं मग चॅटींग बंदच केलं.
मी परत टफाकडं आणि पंख्याकडं बघत हासत हासत झोपलो. फेसबूक आबंड हाय. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं