हाय हिल्स

गडी हूशार होता. पण अभ्यासात नव्हता. जळत असलेल्या ऊसाच्या फडाकडं बघून 86032 हाय का 265 आहे हे परफेक्ट ओळखायचा. 
कधीही काहिही करायचा. 
खिशात कायम एक चाकू असायचा बारिक, कटरसाईजचा. कधीतर कुणी एखादं फळ आणलं असलं तर लगेच घाईनं हा चाकू काढून द्यायचा. नंतर नंतर कुणी मागितलं तर अजाबात द्यायचा नाही. 
नंतर त्याला एक सवयच जडली. कुणी उलटं बोलंल तर त्याच्या चप्पलचा अंगठा तोडायचा. सँडल असले तर मागची दोन बंदं तोडायचा. हे चालूच झालं. एकदा पाव्हण्याच्या घरी गेला. पाव्हणा अंदाकरण खडूस होता हा गेला कि कायम तो अभ्यासाचाच विषय काढायचा. आणि चारचौघांच्यात अपमान करायचा. तसा त्या दिवशीही केला. ह्यानं छानपैकी सगळं ऐकून घेतलं. खाली मान घालून. नंतरनं जाताना त्याच्या पाया पडला, पावना हरकून आशिर्वाद दिला. बाहेर पडला. जाताना एक पाव्हण्याचं पायतान पिशवीत घालून गेला. नंतर पुढे रस्त्यावर जावून एका कचराकुंडीत ते पायतान टाकला. मग उड्या मारत घरी आला.
याला काॅलेजमध्ये एक पोरगी लै म्हणजे लै आवडली. तिच्यावर याच एकतर्फी प्रेम जडलंच. ती याच्याच ऊंचीची होती, पण हिल्सचे सँडल घालून येत असल्याने ऊगाचच तिच्याकडे याला मान वर करून बघायची पाळी यायची. पण सुट्टी नाही. चारदिवस मागंमागं हिंडला, पाचव्यादिवशी प्रपोज मारला. ती विचार करून सांगतो म्हणटली. विचार म्हणजे 25:75 फाॅर्म्युला. हिनं त्याला डायरेक्ट नाही पण अप्रत्यक्ष दुखावल होतं, पण किती केलं तर याचं तिच्यावर प्रेम होतं. म्हणून ती लॅब मध्ये गेल्यावर एका सँडलचं हिल पद्धतशीर काढलं आणि टाकलं.
काॅलेज सुटलं. सगळी पोरंपोरी गेलीत तरी ती आणि तिची एक मैत्रीण दोघीच होत्या. आणि हा बाहेर तिची वाट बघत बसला होता. थोड्या वेळाने तया दोघी आल्या. हा गडी तिच्या मागे मागे हनीसिंगचं हाय हिल्स हेडफोनवर ऐकत हसत चालला होता. समाधानी असायचा नेहमी हा.
टीप : त्या मुलीच्या एका सँडलचं हिल्स तुटल्यावर ती जे चालते, ते हाय हिल्स हे गाणं ऐकत इमॅजीन करू नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं