हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?
मोदी आणि चंद्रचूड हे कधीही भेटले तरी मिठ्ठी मारली तरीही कसलाही आक्षेप नाही.
हे दोनही लोकं संविधानिक पदावर आहेत. मोदी पंतप्रधान आहे. चंद्रचूड सरन्यायाधीश.
त्या संविधानिक पदावर बसल्यावर काही संकेत पाळायचे असतात. तेच काल मोडून टाकले गेले. ज्यांना थोडंफार कळतं त्यांची अवस्था झाली कि 'हागणाऱ्याने लाजावे कि बघणाऱ्याने लाजावे?'
सरन्यायाधीशाचं काम असतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संवर्धन करणे आणि सरकार नीटपणे चाललंय की नागरिकांना त्रास देतंय हे पाहणं.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन लोक एक रोजी उठतात आणि पक्षातील अनेक आमदार खासदारांना घेऊन पक्ष पळवतात.
यात पन्नास खोके दिल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर याने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे आणि अजित पवारांना देऊन टाकणे हे नेमकं कुठल्या नितीमत्तेत बसतं?
कुठल्याही सर्वसामान्य माणूस सांगू शकेल की दबावामुळे हे निर्णय आलेत.
आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा एकनाथ शिंदे हा खरोखरच माझा मुख्यमंत्री आहे का? कि तो घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे? हे जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे.
जर समजा शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री असेल तर त्याच्या नेतृत्वाखालील सरकाराने घेतलेल्या निर्णयांचं काय करायचं? या महाराष्ट्रासाठी अनेकांनी आपला जीव दिलाय. महाराष्ट्रात कधीही इतके अराजक माजले नव्हते. मात्र ते आज माजलं आहे आणि त्याला आशिर्वाद आहे महाशक्ती आणि सरन्यायाधीश चंद्रचूड या लोकांचा.
स्थानिक स्वराज संस्था, महानगरपालिका, नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणूका होऊन आठ वर्षं होत आली इथं सर्वच जागांवर प्रशासक बसवलेला आहे. इथे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी नेतृत्व करत नाहीत. अगदी मुंबईत सुद्धा. देशाच्या आर्थिक राजधानीत लोकशाही नाही तर बाबूशाही चालू आहे याला कारण चंद्रचूड आहे.
लोकशाही संपविण्यासाठी ज्या टेस्ट घेतल्या जात आहेत त्या भयंकर आहेत.
मोदी RSS वगैरे शी संबंधित आहेत असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदीवर अप्रत्यक्ष पणे टीका केली ती एवढ्यासाठी. मोदी हे अंबानी आणि अदानी यांनी पोसलेलं बांडगूळ आहे.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे महायुती सरकार आल्यापासून गुजरातला चालले. शिंदेना महाराष्ट्राचं काही पडलं नाही. त्यांना फक्त मी मुख्यमंत्री झालोय हे पुरेसं आहे. आता त्यांनी पन्नास खोके दिले असतील नसतील मात्र जे काही झालं त्यातून एक पक्ष फोडला गेला.
हा पक्ष खरा की बनावट? हे सांगणं चंद्रचूड यांचं कर्तव्य होतं. पण चंद्रचूड यांनी तारीख पे तारीख ढकलत राहिले आजही पुढंच ढकलली. दोन महिन्यात सरकार टर्म पुर्ण करेल.
न्याय वेळेत न देणे हाही एकप्रकारचा अन्यायच आहे.
टिप्पण्या