पोस्ट्स

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

इमेज
भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ट्रकचा कधी ना कधीतरी संबंध आलेला असतोच.  कोणतीतरी एखादी तरी वस्तू ट्रकमधूनच येते. ट्रकडायवर हा पेशा रिस्की असतो. घरातून पंधरा दिवस महिनाभर तो बाहेर असतो. आणि पगार म्हणाल तर त्याच्या मानाने अत्यल्प असतो.  घरापासून अनेक दिवस बाहेर असतो.  बाकीच्या तुमच्या हाफीसातील ड्युटीवर तुम्ही डुलकी मारू शकता, टंगळमंगळ करू शकता पण ड्रायवर हा पेशा असा आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या भागाला सुद्धा अलर्ट राहावं लागतं.  अपघात हे अपघात असतात. जाणूनबुजून कुणालाही कुणी मारायचं धाडस करत नाही. नजरचुकीने अपघात घडतात त्याला पुर्वी दोन वर्षे शिक्षा होती.  आता अमितभाईंनी ती शिक्षा १० वर्षांवर नेली. मूळात अशी काही जरूरत नव्हती. ट्रकडायवर होणे हीच तशी एक मोठी शिक्षा आहे. त्यावर अमितभाईंनी आणलेला कायदा म्हणजे नरकात जन्माला एखादा जाणार असेल तर तो भारतात ट्रकडायवर होईल अशी परिस्थिती करून ठेवली आहे. ट्रकचा अपघात झाला की, पुढे असणारा वाहनधारक शक्यतो वाचत नाही तो मरतोच. मात्र अशावेळी मॉब असा काही खवळतो की ट्रकडायवरचा जीव घेऊनच तो शांत होतो.  त्यामुळे डायवरला तिथून पळून जाण्याशिवाय काही पर्य

भटके कुत्रे

इमेज
माणसाचा सर्वात जुना दोस्त म्हणजे कुत्रा. कुत्र्यासोबत माणूस जात लाखो वर्षे राहत आली आहे. त्यामुळे एकमेकांच्यात प्रेम निर्माण झालं आहे. त्यामुळे माणूसही आपल्या माणसांपेक्षा कुत्र्याला जादा जीव लावतो. माणसं हलकट आहेत त्यात काही प्रश्नच नाही. त्यामुळेच माणूस कुत्र्यावर जादा प्रेम करतो. किमान त्याचं प्रेम निस्वार्थी असतं. बाकी माणसांनी कुत्र्यासारखे प्रेम करणे ही अशक्य गोष्ट आहे. लाखो वर्षे सोबत राहूनही माणूस कुत्र्यांपासून काही शिकला नाही. पण कुत्र्यासोबत जो राहतो तो काही प्रमाणात संवेदनशील होतो. पण याचीही टक्केवारी कमी आहे.  पाळीव कुत्र्यांचे ठिक आहे. पण आज सर्वात मोठ्ठी समस्या काय असेल तर ती भटक्या कुत्र्यांची आहे. या लोकांना अन्न नसतं. कुठं तर चिकन ६५चा गाडा असेल, वडापाव चा गाडा असेल, किंवा इतर काही फूड स्टॉल असतील त्या ठिकाणी काही कुत्र्यांची सोय लागते पण बाकीच्या कुत्र्यांची अवस्था प्रचंड बेकार असते. ते अन्नाच्या शोधात हिंडत असतात. पण त्यांना अन्न मिळत नाही.  चार पाच वय वर्षे असणारे कुत्रे थोडेफार अनुभवसंपन्न असतात, ते त्यांची सोय लावत असतात.  अनुभव संपन्न यासाठीच की काही कुत्र्यांचे

बिअरचा खप कमी होण्याची कारणं आणि त्यावर करता येण्याजोग्या उपाययोजना.

इमेज
बिअरचा खप कमी होण्याची कारणं आणि त्यावर करता येण्याजोग्या उपाययोजना.  १) मुतखडा पडला रे पडला लोक बिअर सोडून व्हिस्की, रम,व्होडका पितात. २) महाराष्ट्रात सरसकटपणे गार पाण्याच्या बाटल्या आणि बर्फावर बंदी घातल्यास बिअरचा खप वाढेल.  ३) बिअर बारमध्ये गलास देताना बऱ्याचवेळा पेला देतात. त्यामुळे बिअर पिण्याचा ग्राहकांचा मूड जातो. ४) बिअर टीन हे एकदा फोडलं कि फेकून देणे हाच मार्ग राहतो. त्याऐवजी फिरकीच्या बूचाची बाटली काढावी. त्यात नंतरून तेल तुप वगैरे साठवता येईल तसेच यामुळे पुरूष लोकांचा बिअर पिण्याचा अपराधभाव कमी होईल.  महिला म्हणतील पिऊन आला पण येताना डबा घेऊन आला. त्यामुळे पॅकेजिंग कडे ध्यान द्यावे.  ५) बिअर साठी शीतपेटी ची भाडेतत्वावर तजवीज करून द्यावी. ६) गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण जास्त होते त्यामुळे साहजिकच बिअरचा खप कमी झाला असावा पण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे खप वाढेल त्यामुळे शासनाने चिंता करू नये.  ७) बिअरची बाटली मोठ्ठी असते त्यामुळे काही लोकांना वाहतूकीसाठी अडथळा येतो. त्याच जागी जर व्हिस्की किंवा रम असेल तर खिशातून नेता येते, तेही कुणाला न दिसता, त्यामुळे

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

इमेज
राहूल गांधीची काल फ्रान्स मध्ये एका विद्यापीठात मुलाखत झाली. त्यात तो थेट चायनावर निशाणा साधतो आहे. त्यांच्याकडे असणारी हुकूमशाही आणि म्हणून असणारी कामगारांची पिळवणूक हे मुद्दे त्याने मांडले. चायना को लाल आँखे दिखाना चाहीए वाले मोदीजी चीन भारतावर अतिक्रमण करत असताना चुपचाप बसले आहेत हे अख्खा देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तिथं राहूलने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हे मुद्दे मांडले आहेत. जगभरातील पत्रकार जी २० परिषदेसाठी आले आहेत. देशात घेत नाहीत ते ठीक पण इतर देशांच्या पत्रकारांशी मोदींना बोलता आलं असतं पण तिथंही त्यांनी ५६ इंची छाती दाखवली नाही ती पत्रकार परिषद टाळली.  हे झालं मोदी राहूलचं. आता देशातलं वातावरण पाहीलं तर जवान चित्रपट जोरदार हिट होत आहे. त्यात शाहरूख खानने कुणाविरूद्ध काय आवाज उठवला आहे हे चांगलंच सर्वांना माहीत आहे. शाहरुख खानची जवान वरून वाहवा होत आहे. देशभरात सिनेमा हाऊस फुल्ल आहे. पण त्यातील संदेश ही तरूण वर्ग गांभीर्याने घेत आहे हे महत्त्वाचं. शाहरुख खान ने मतदानाविषयी केलेलं भाष्य लोकांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहणारं आहे.  देशभरात भाजपाविरोधी लाट मोठ्या प्रमाणात दिसून य

फडणवीसांनी आजच पराभव स्विकारला ?

इमेज
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठ्ठा विजय झाला आणि भाजपचा लाजीरवाणा पराभव झाला.  देशभरातून राहूल गांधी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच वेळी भाजप विरोधी एक मोठ्ठी लाट उसळली आहे.  कर्नाटकला लागूनच महाराष्ट्र येतो, त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात सर्वाधिक दिसणे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मविआ आणि भाजप दोघांकडून राजकीय वातावरण निर्मिती करण्याला सुरवात झाली आहे.  महाराष्ट्रातले मविआ सरकार पाडून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. मात्र भाजप हा मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले. त्याचवेळी त्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध अपमानास्पद रीतीने उपमुख्यमंत्री केलं गेलं.  भाजपने शिंदेना मुख्यमंत्री करण्यामागे कारण होतं कि शिवसैनिकांचा रोष भाजप वर नको, पण भाजपची खेळी फसली भाजपला लागायचा तसा दोष लागलाच. शिवसैनिक शिंदेवर टीका जरी करत असले तरी त्यांचा मुख्य शत्रू भाजपच आहे.  मविआ सरकार कोसळल्यावर राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार झाले. त्याचा फायदा मविआला झाला.  नुकत्याच झाल

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

इमेज
गेला महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गाजत होती.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, दंड बडवून,शड्डू ठोकून एकमेकाला आव्हान-प्रतिआव्हान दिलं जात होतं.   या निवडणुकीत स्वतः बंटी पाटील उतरल्यामुळे हि निवडणूक चर्चेची ठरली होती. ती मग जिल्हा पातळीवर न राहता राज्यपातळीवर चर्चेला आली होती.  काल दुपारी अखेरीस चित्र स्पष्ट झालं आणि एकदाचा सोक्षमोक्ष लागून निवडणूकीचा कंडका पडला. या निवडणुकीत अप्पा महाडिक आणि त्यांच्या पॅनलने एकहाती सत्ता मिळवत आपलं वर्चस्व कायम राखलं.  उत्पादक गटातील महाडिकांचे उमेदवार हे १०००-१२०० अशा फरकाने निवडून आले आहेत.  कोल्हापूर म्हणजे जल्लोष आणि तसा जल्लोष पार पडला. यशाचे अनेक भागीदार असतात, महाडिकांनी आवाडे दादा, कोरे आणि धैर्यशील माने यांच्या सहभागाबद्दल आभारही मानले.  या निवडणुकीचा निकाल आला आणि दूसऱ्या बाजूला सोशल मिडियावर मात्र बंटी पाटील यांच्यावर काही लोक टीका करू लागले, तर त्यांना पाटील समर्थकांनी उत्तरंही दिली. अशा या चर्चा असतात.  दहावी बारावीचा निकाल आला आणि आपण पास झालो तर कुणी विचारत नाही. मात्र नापास झालो तर

दुध उत्पादक शेतकरी अडचणीत येणार?

इमेज
सध्या जनावर बाजार तेजीत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत तेजी आहे. म्हैस घ्यायची तर एक लाखाच्या पुढे किमंत मोजावी लागते तर गाय आणायची तर किमान पन्नास हजार रूपये आजरोजी लागतात.  हि तेजी कशामुळे आली? गेल्यावर्षी आलेल्या लम्पी या रोगात अनेक जनावरं बळी पडली. त्यानंतर भारतातील दुग्ध व्यवसाय अडचणीत येऊन दुधाचं उत्पादन कमी झाले. त्यामुळे गायी म्हैशींच्या दुधाच्या किंमती वाढल्या.  दुधाला किमंत आली कि बाजारात दुभत्या गायी म्हशींची मागणी वाढते. तशीच मागणी आता वाढली आहे.  गावातील शेतकऱ्यांनीही दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणून गोठे रिकामे केले होते. वाढत्या पशुखाद्यांच्या किंमती, वैद्यकीय खर्चामुळे, चाराटंचाई मुळे शेतकरी दुग्धव्यवसायापासून लांब गेला होता.  मात्र दुधाच्या किंमती वाढल्या आणि सारं गणितंच बदललं. शेतकऱ्यांनी परत गोठं झाडून लोटून नवी जनावरं आणली. वैरणी चालू झाल्या डेअरीला दुध जाऊ लागलं. घरचं दुध खायची हौस पुरी करता यायला लागली. शेतात शेणखत पडू लागलं होतं अशी चांगली सुबत्ता येत होती‌.  पण दुर्दैव शेतकऱ्यांचं ! शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळू लागले कि सरकारला ते बघवत नाही. तेच आजही झालं आहे