पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डियर, डाक्टर कब्र्या शिंग ,

इमेज
डियर, डाक्टर कब्र्या शिंग , कबीर सिंग या शनिमाचे तिकीट माझा दोस्त हानमाने काढलेलं असल्यानं नाईलाजानं बघावं लागलं.   अत्यंत होपलेस शनिमा असून डायरेक्टर वगैरे मंडळीही चार तुंब्या हाणूनच शनिमा तयार केल्याचे पावलोपावली आम्हास जाणवले. माणसाची एक मर्यादा असते, खोटं सहन करायची. थोडंबहोत चालत असतं म्हणजे ढगामुळं रडारावर आपली विमानं नाहीत येत वगैरे.   हे पटू शकतंय ओ. पण, कबीर हा हलकट डाक्टर अख्ख्या शनिमात एकदाही जेवताना-खाताना दाखवला नही. निस्ता एक झालं कि एक दारूची बाटली लावीत असतो, ते बी मान्य. पण त्या दारूबरोबर सुद्धा खारीडाळ, खारेशेंगदाणे,लस्सूनफ्राय, मुगडाळ, कुरडंपापड, केळीचिप्स, भडंग, पापडी, चकली, वल्लीचटणी, चिकनसिक्सटी फाईव, चिकन लॉलीपॉप असलं काहीही खाताना अख्ख्या शनिमात एकदाही दिसत नही. तरी ह्या डॉक्टराची बॉडी एकदम फिट. हिथं लोकं सायकलिंग करतेत, वॉक करतेत, निंबसाची बुट घालून रनिंग करते, दीक्षीत-दिवेकर डायटं करतेत, जीम करतेत,मसाज करून घेतेत. तरी त्यांच बाहेर आलेलं पॉट आत नसतं रे जात. आणि तु नालायका निस्ता पित असतो, सिग्रेटी फुकीत असतो. असं करून बॉडी होत असते का नालायका ?