गाव तसं चांगलं

गाव म्हणजे ठराविक जणांचाच रुबाब, त्यांचाच हुकूम, ठराविक लोकच शहाणी असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पुर्वी हे असायचं पण. आत्ता परिस्थितीती बदलून नवीन गाव तयार झाला.
  गाव हे ठराविक लोकसंख्येचंच असल्याने कुणाच्या गोठ्यात कसली म्हस हाय ? त्यापासून ती म्हस किती महिन्याची गाभन हाय ? हिथपर्यंत माहीती ठेवणारी लोकं असत्यात.

गावात रुबाब कुणाला झाडता येत नही, कारण लगेच उतारा करून ठेवणारी लोकं पण हिथलीच. त्यामुळे तु शहाणा असलास तुझ्या घरात हिथं तंदारी नही करायची...! असा बाणा.

सगळे अगदी कुठल्याही जातीपातीची धर्माची असूदेत. कायम रुबाब. तु काय लै शहाणा लागला नहीस. लै शिकलास नव्हं ? बापाच्या जीवावर शिकायला काय दुखतंय ? असं म्हणून प्रत्येकाची इज्जत काढायची हे ठरलेलं.

ह्यात म्हाताऱ्यांपासून अजून खुट्ट्यातंनं वर न आलेली पोरं पण फटाकनं काय पण बोलून जात्यात. आणि तेवढ्याच जोरात पुढच्या माणसाच्या आब्रूचं खोबरं, खोबऱ्याची बर्फी हुतीय.

  आम्ही गावातली पोरं सायन्सला एडमिशन घेटलं, सकाळी लवकर पी.ई (physical Education) ची तासं असायची. सकाळी ग्राऊंडवर मास्तर यायचं आणि प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित करायचं म्हणजे आपल्याच ष्टोऱ्या सांगून पिडवायचं. दोनचार दिवस ठीक हाय की, पण ह्या बाबाचं रोजचच ते. आम्हाला बी लै कटाळा यायचा.
  एकदिवस सकाळपारी असंच आमच्या कानाला उकाळलेलं तेल लावालता. सांगाला,
  माझी नऊ एकर द्राक्षबाग हाय, ८ एकर ऊस हाय, तीन एकर हळद हाय असं व्वीस एकर रान हाय.
आमच्यातला पोप्या म्हणटला, आमचं नुस्ता तेवढा बांध हाय.
झालं फास्संदिशी आम्ही हसलो. मास्तरनं आम्हाला हाकलून काढलं. त्यानंतर मास्तरने प्रोत्साहित करायचा धंदा बंद केला.


म्हाताऱ्या बाया ह्या अतिशय स्सॉट असत्यात. त्या स्थळ, काळ, वेळ, लाज, लज्जा, आब्रू,शरम, भाड, भीड ताळ, तंत्र असंलं कायदेखील नसतंय. मस्ती तर अंगभरून असत्या.
ह्या बिचाऱ्या कवादेखील नीट बोलत नहीत.
सकाळपारी एखादी चुलीत बंबात जाळ घालत बसलेली दिसली आणि सहज विचारलं काय म्हातारे काय काय कराल्यास ?
   तुझं मडं उचलायच नही काय ? मग पाणी तापवायला नको ?

असं फाडक्न बोललीत कि कशाला कोण झक मारायला विचारायला जातोय ?

तरी आमच्याच ह्याच्यात मस्तीत.

     येताना एक म्हातारी गाठ पडली. रस्त्यावर तंबाखू शेकत बसलीती. म्हणटलं काय म्हातारे बरं हाय का ?

हाय कि ! असायला काय झालं ? मस्त परवा २०० रुपयं डाक्टरच्या मड्यावर आवळलोय.

मग कशाला तंबाखू जाळत बसल्यास ?

मग काय करू म्हणतोस ?

कशाला काय करतीस ? उगच घाण वास.

माझं मुक्का घेणारा उलतलाय तवाच. तु काय मुक्का घेणार हाईस. वासाची चौकशी करायला ?

घाल तुझी.

तुझी पण नीट घाल.

😡😡😡😡

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं