अॉनर किलींग

अॉनर किलींग चे प्रकार घडालेत. हे आजचं नही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेलं हाय. ह्या प्रवृत्ती अलिकडच्या काळात वाढल्यात. काही ठिकाणी जात आडवी येते, धर्म येतो, आर्थिक परिस्थिती ये, कुंडली येते. काही ना काही कारणानं आईबाप समाज ह्यांच्या फुकटच्या गंडापायी समाजातील लेकरे विनाकारण हाणली चाललेत. ह्या गोष्टीचच काय कुठल्याही मरणाचं दु:ख आपल्याला फार काळ होत नाही. त्यांच त्यांना बघूदे वगैरे. किंवा त्याचा खून झाला माझं काय ? असा शेवटी प्रत्येकाचा प्रश्न असतो.
   प्रेम हे जरी ठरवून होत नसलं. तरी पुढं जाऊन बऱ्याच समस्या येतात. ते कळायच वय लेकरांचं नसतं. म्हणून त्यांचं कुठलही कौन्सेलिंग न करता सरळ काटा काढायचा हा काय मार्ग नही.
बापजाद्यांनी गुडगा घासला म्हणून काय मारायचं कांन्ट्रेक्ट मिळतंय अशातला भाग नही. समाजात एकमेकाचं स्वातंत्र्य मान्य करायची ताकद कुणाच्यात नाही. हे दूर्दैव जरी असलं तरी  त्यात जून्या अडाणी फळीचा पुरषार्थ दडलाय.
 ह्या लोकांचं सोडून देऊ. सुशिक्षित लोकांनी तर काय निराळी दिवं लावलेत. हा पण प्रश्न ऊरतोच कि.
शिक्षण आणि जाणीवा ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. शिकून जाणीव येते ही गोष्ट भंपक असते.
काय असतं ज्याचा त्याचा चॉईस असतो. निवडण्याचा अधिकार हवा. स्वातंत्र्य पाहीजे. त्यासाठी कायदे कानून काही करू शकत नसतात. प्रगल्भता आणि जाणीव येणं ही गोष्ट मोठी असते. आता माझी दूरच्या नात्यातली बहीण तिनं आधीच लग्न रजिस्टर करून टाकलंतं. ज्यावेळी स्थळं काढायची वेळ आली त्यावेळी घरात दंगा उठला. घरातल्यांनी घर डोक्यावर घेऊन नाचायला सुरवात केली. पण तिचा भाऊ समंजस निघाला. त्यानं समजून घेतलं. ज्यावेळी पावणंपै बोलावनं झालं तेव्हा आम्हाला पण बोलवलं. तिची बाजू तिनं मांडली. झालं लगीन धडाक्यात झालं. पण मावशी अबोला धरून होती. तिलापण बिचारीला समजावून सांगितलं. तिनं पण सुरवातीला शिव्या घातल्या आम्हाला पण नंतर व्यवस्थित महिलांचं जग वगैरे लांबडं बोलल्यावर आली मापात. माझी लेक तर मनानं केली असं समाधान झालं. पटवून देण्यात कमी पडायच नही.
दणकट तापट पैशेवाले चार चहा दारु पाजलेले कार्यकर्ते ज्याला आण्णा म्हणतेत अशा रिकाम्या डोक्यांच्या लोकांशी पंगा घेणं वेगळी गोष्ट असते. ज्याला दारू सुटत नही त्यो गडी सोडणारच नही म्हणतोय. अशा प्रसंगी त्याला विविध मार्गांनी समजावलं पाहिजे. समंजस लोक सोसायटीत लै नहीत हे जरी खरं असलं तरी अलिकडं लोक शहाणे व्हायलेत. बऱ्याच धनवान गणल्या जाणाऱ्या समाजात पोरी पाडल्या गेल्या. त्यामुळं आता त्यांच्या लेकरांची लग्न करताना कर्नाटक आणि मिळेल तिथून पोरीलाच हुंडा देऊन पोरगी आणायची पाळी येते. तिच जातधर्म नसतं माहीती. पुढं जाऊन हे लोक सुधारतात. पण ही काही मिरवायची पण बाब नही. अलिकडच्या महागाईत पळून जाऊन सेट होणं सोप्पी गोष्ट राहीली नहीच. त्यावेळी एका कुठल्यातरी बाजूच्या लोकांना घच्च करण्याची गोष्टही असते. नहीतर पोलिस स्टेशनात सगळा आनंदच असतो. त्यात आपल्या स्टेशनची तऱ्हा तर काय सांगायची ?
 समाज घाण असतो. आपण लग्न करणौ तर लांब पण दुसऱ्या दोस्ताला जरी मदत केली तर तुला काय भारतरत्न देऊ काय ? असं विचारणारी लोकंही याच समाजातली.
  कुणाला दोष द्यायचा ? जातीधर्म हे तिढा सोडत नहीत. आजकाल मुश्किलनं लग्न व्हायलेत. पुढं काय होईल ही गोष्ट निराळी.
हळूहळू परिस्थिती बदलतीय असं वाटताना एखादं प्रकरण येतं. अशा प्रसंगी कधीच वेगवेगळे लोक ज्यांनी आंतरजातीयधर्मीय  लग्न केली त्यांनाही प्रसिद्धी दिली माध्यमातून तर पडण्याची चिन्हं वाटतात. मिडीयाची ताकद मोठी असते ती देवूळ आरती भविष्य दाखवण्यापेक्षा मुलामुलींच्या आईवडिलांना ज्यांनी आंतरधर्मीय लग्न करू दिली अशा लोकांच्या मुलाखती आठवड्यातून एकदा तरी दाखवल्या तरी समाजमन बदलायला मदत होईल.
ईच्छाशक्ती महत्वाची. कुणा जातीवर किंवा धर्मावर वरडून काही फायदा नसतो. छोट्या छोट्या गोष्टीतून मन परिवर्तन करायची जबाबदारी घ्यायची. आंतरधर्मीय लग्नं ही ऐश असते. दोन्ही संस्कृती एकदम जगायला भेटतात. असं व्यवस्थित प्रोजेक्ट करता येतं. त्यासाठी तसदी घेटली तर मज्जा येईल. समाजात जोवर जाणीवा येत नाहीती तोवर कुणाच्या फेसबुक ष्टेटस पोस्टने खाटाएवढाही फरक नसतो पडत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!