ऊस लावण Basic

ऊस लावणीची जुनी पद्धत आजपण बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. त्याची माहीती व्हावी ह्यासाठी ब्लॉग.

* बेणे निवड

चांगला कोवळा ऊस साधारण सात ते दहा महिन्याचा ऊस, लोकरी मावा, खोडकिड, गवती रोग नसलेला ऊस बियाण्यासाठी तोडावा.
ऊस तोडताना खालचा भाग आणि वाडं तोडावं, मधलं पाचट तसंच ठेवावं. त्यामुळं ऊसाचा डोळा वाहतुकीत खराब होत नही.

ऊस आपल्या शेतात आणल्यावर पाचट क्लियर करून त्याची मांडणी सरीवर पाहीजे तशी करून घ्यावी.

*डोळा मारणे/ खांड्या मारणे.

हा ऊसाचा डोळा. ह्यालाच पुढं कोंब फुटून ऊस येतो.


एक आड एक सरीत अशा खांड्या मारत जाव्या त्या जास्त लांबड्या नसाव्या ह्याची काळजी घ्यावी. साधारण दोन डोळं येतील असं बघावं. जास्तीत जास्त पाऊण फुटाचं खांडी असावी. डोळा मारताना खांडी खिसू नये ह्यासाठी धारदार खुरपं असावं.

खांडी निवडताना ती निरोगी असेल हे बघावं. खाली काही फोटो देतो तशा खांड्या बाजूला कराव्या.


 ही खाांडकी बघिटली तर त्याला कोंब अधिच फुटल्याच दिसतं, त्यातून परत कोंब फुटायचे चान्सेस नसल्यानं ते बेणं वांझोटं ठरतं. त्यामुळं ते बाजूला करावं.











ही खांडी बघिटली तर काय दिसतं ? ती खांडी मारताना/कापताना खिसलीय. त्याच चिप्पाडंच नसेल तर ते लगेच कुजतं. किंवा कायकायवेळेला डोळं देखील खिसली जातात म्हणून असं खिसलेल्या खांड्या बाजूला कराव्या.




ही खांडी बघिटली तर मधून पोकळ झालीय, तिला किड लागलीय. ती काही ऊसाला मुळ्या सुटण्यात मदत करत नाही. उलट असं लावल्यानं जरी ऊस आला तरी त्यात ती किड यायची शक्यता असते त्यामुळं हेही बाजूला करावं.





ही खांडीही कुजून किड लागून वाळलीय, पोकळ झालीय, त्यामुळं अशाही खांड्या सिलेक्ट करूच नयेत.






खाली दिलेल्या फोटोमधील खांडी आदर्श खांडी असून तशी निवडावी. 



मांडणी.


सरीत मारलेल्या/तोडलेल्या खांड्या दोन्ही बांधाला अशा ठराविक अंतर ठेवून मांडून घ्याव्यात. 



मांडणी अशी दिसते.




तुडवणी



मांडणी झाल्यावर पाणी चालु करावं. पाऊस झाला असला जोराचा, तर पाण्याची जरूरत नही.





असं पाणी भरून घ्यावं. थोडं डबडबेल असंच सोडावं. 


पाणी जरा मुरल्यावर खांडी पाटात टाकून आबदारपणे त्यावरून पावलं टाकत पुढं व्हावं. 


असं. 


झाली लावण. त्यानंतर ही आपलीच अशी भुताटकी पालं बघावी आणि घरला जावावं. 😊







टिप्पण्या

mrinmayee म्हणाले…
वा, मला माहीतच नव्हतं ऊस कसा लावतात ते. फोटो फार छान, समजायला सोपं जातंय. लिहीत राहा गड्या तू, माझ्यासारख्या मुंबईकरांना जरा तरी शेतीबद्दल माहिती होईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!