पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाव तसं चांगलं

गाव म्हणजे ठराविक जणांचाच रुबाब, त्यांचाच हुकूम, ठराविक लोकच शहाणी असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पुर्वी हे असायचं पण. आत्ता परिस्थितीती बदलून नवीन गाव तयार झाला.   गाव हे ठराविक लोकसंख्येचंच असल्याने कुणाच्या गोठ्यात कसली म्हस हाय ? त्यापासून ती म्हस किती महिन्याची गाभन हाय ? हिथपर्यंत माहीती ठेवणारी लोकं असत्यात. गावात रुबाब कुणाला झाडता येत नही, कारण लगेच उतारा करून ठेवणारी लोकं पण हिथलीच. त्यामुळे तु शहाणा असलास तुझ्या घरात हिथं तंदारी नही करायची...! असा बाणा. सगळे अगदी कुठल्याही जातीपातीची धर्माची असूदेत. कायम रुबाब. तु काय लै शहाणा लागला नहीस. लै शिकलास नव्हं ? बापाच्या जीवावर शिकायला काय दुखतंय ? असं म्हणून प्रत्येकाची इज्जत काढायची हे ठरलेलं. ह्यात म्हाताऱ्यांपासून अजून खुट्ट्यातंनं वर न आलेली पोरं पण फटाकनं काय पण बोलून जात्यात. आणि तेवढ्याच जोरात पुढच्या माणसाच्या आब्रूचं खोबरं, खोबऱ्याची बर्फी हुतीय.   आम्ही गावातली पोरं सायन्सला एडमिशन घेटलं, सकाळी लवकर पी.ई (physical Education) ची तासं असायची. सकाळी ग्राऊंडवर मास्तर यायचं आणि प्रोत्साहित करायचं. प्रोत्साहित करायचं

अॉनर किलींग

अॉनर किलींग चे प्रकार घडालेत. हे आजचं नही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेलं हाय. ह्या प्रवृत्ती अलिकडच्या काळात वाढल्यात. काही ठिकाणी जात आडवी येते, धर्म येतो, आर्थिक परिस्थिती ये, कुंडली येते. काही ना काही कारणानं आईबाप समाज ह्यांच्या फुकटच्या गंडापायी समाजातील लेकरे विनाकारण हाणली चाललेत. ह्या गोष्टीचच काय कुठल्याही मरणाचं दु:ख आपल्याला फार काळ होत नाही. त्यांच त्यांना बघूदे वगैरे. किंवा त्याचा खून झाला माझं काय ? असा शेवटी प्रत्येकाचा प्रश्न असतो.    प्रेम हे जरी ठरवून होत नसलं. तरी पुढं जाऊन बऱ्याच समस्या येतात. ते कळायच वय लेकरांचं नसतं. म्हणून त्यांचं कुठलही कौन्सेलिंग न करता सरळ काटा काढायचा हा काय मार्ग नही. बापजाद्यांनी गुडगा घासला म्हणून काय मारायचं कांन्ट्रेक्ट मिळतंय अशातला भाग नही. समाजात एकमेकाचं स्वातंत्र्य मान्य करायची ताकद कुणाच्यात नाही. हे दूर्दैव जरी असलं तरी  त्यात जून्या अडाणी फळीचा पुरषार्थ दडलाय.  ह्या लोकांचं सोडून देऊ. सुशिक्षित लोकांनी तर काय निराळी दिवं लावलेत. हा पण प्रश्न ऊरतोच कि. शिक्षण आणि जाणीवा ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. शिकून जाणीव येत

गवारी

गवारी ही भाजी मला अजिबात आवडत नही. पण मापात पैशे करुन देतंय म्हणून दरवर्षी दोन प्लाट गवारी निघतंय. सौद्यात चाळीस रेट निघतो बसून विकलं तर ६०रुपये ते ८० रुपयांपर्यंत विकता येतंय. आणि त्यात मला बाजारात बसायला लै आवडतंय. आवडायच कारण म्हणजे आपण पैशे कमवत असतो हे प्रमुख कारण. बाजारात बसून लोकांचा अंदाज घेणे त्या गिर्हाईकाला त्यामापाने वेळ देणे, गिऱ्हाईक नसतंय त्यावेळी फुकटात निरीक्षण करणे असा उद्योग चालतो आणि त्यात मजा येते.  मी पाचवीला झाडावरची पेरू विकायला सुरवात केली. मी भावाला घेऊन जायचो, म्हणजे ते बारकं हुतं घरात ताप देतंय म्हणून माझ्याबरोबर असायच. मग लै काय नहीं तर पाचपन्नास रुपये व्हायचं. मग येताना त्याला गोळ्या बिस्किट चाकलेट चिरमूर फुटाणं वगैरे कायतर घ्यायचो म्हणजे त्यो एक आनंद असायचा भावाला कायतर घेऊन देतोय. असं कायबाय वाटायच. मग तिथंन पुढं नगावर म्हणजे उदाहरणार्थ कोथमीरच्या पेंड्या, मेथी,लालफोफळा असं विकण्याची बढती मिळाली. शाळेतले मास्तर म्याडम आलीत कि फुकटात एकदोन पेंड्या देऊन टाकत. त्याचा उपयोग मला झाला. मग परत शाळेत ते कधी तर नाव काढत नरदे तु दिलेली मेथीची भाजी आमच्या

म्हशी

इमेज

ऊस लावण Basic

इमेज
ऊस लावणीची जुनी पद्धत आजपण बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. त्याची माहीती व्हावी ह्यासाठी ब्लॉग. * बेणे निवड चांगला कोवळा ऊस साधारण सात ते दहा महिन्याचा ऊस, लोकरी मावा, खोडकिड, गवती रोग नसलेला ऊस बियाण्यासाठी तोडावा. ऊस तोडताना खालचा भाग आणि वाडं तोडावं, मधलं पाचट तसंच ठेवावं. त्यामुळं ऊसाचा डोळा वाहतुकीत खराब होत नही. ऊस आपल्या शेतात आणल्यावर पाचट क्लियर करून त्याची मांडणी सरीवर पाहीजे तशी करून घ्यावी. *डोळा मारणे/ खांड्या मारणे. हा ऊसाचा डोळा. ह्यालाच पुढं कोंब फुटून ऊस येतो. एक आड एक सरीत अशा खांड्या मारत जाव्या त्या जास्त लांबड्या नसाव्या ह्याची काळजी घ्यावी. साधारण दोन डोळं येतील असं बघावं. जास्तीत जास्त पाऊण फुटाचं खांडी असावी. डोळा मारताना खांडी खिसू नये ह्यासाठी धारदार खुरपं असावं. खांडी निवडताना ती निरोगी असेल हे बघावं. खाली काही फोटो देतो तशा खांड्या बाजूला कराव्या.  ही खाांडकी बघिटली तर त्याला कोंब अधिच फुटल्याच दिसतं, त्यातून परत कोंब फुटायचे चान्सेस नसल्यानं ते बेणं वांझोटं ठरतं. त्यामुळं ते बाजूला करावं. ही खांडी बघिटली तर का

माणसा परीस कुत्री बरी

इमेज
माणसाने माणसाळावलेला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा. आजही आपल्या जवळचा म्हणजे तोच. कुत्रा माणसाळला, मदत करु लागला, राखणीला आला, शिकारीचा माग काढून दिला, छोटी शिकार करून दिली. भलताच तो माणसाळला पण बोलता बोलता माणूस एकमेकाला कुत्र्या, कुत्र्यासारखं मारीन, कुत्र्याची लायकी, कुत्रा तो कुत्राच असं काही द्वेषाने भरभरून बोलतो तेव्हा ते काय बघू वाटत नही. काय माणूस काय करत चाललाय हे त्याच्यापण लक्षात येत नसतं.  उलट कुत्रा (पाळीव) हा मायाळू असतो, प्रामाणिक इमानदार असतो हे बव्हतांशी गुण माणसात नसतात.  एखादा धनगर जेव्हा शेकडो जनावरं चरायला घेऊन भटकत असतो तेव्हा एकदोन कुत्री असल्याने किती बिनधास्त असतो. रात्री जर दरवाजाबाहेर कुत्रा बांधलेला असेल तर सुखाची झोप लागते. तो भलेही चोर दरोडेखोरांचा प्रतिकार करू शकत नसेल, पण सुचना करतो माणूस सावध होतो.  कुणाच्या घरी जर कुत्रा असेल तर तो कुत्र्याचा अनादर करणार नाही. घरात जर बाहेरून तुम्ही आलात , परगावाहून जर बऱ्याच दिवसांनी आगमन झालं तर त्याला एवढा आनंद होतो किंवा तो तुम्हाला एवढा मिस करत असतो जेवढे घरातले इतर कोण करत नसतील.  किंवा घरातले व्यक्त करु शकत नस

Happy new year

मी आणि कैलास दोघपण गरीब हाय, त्यला आणि मला आठ हाजार पगार हाय. एमायडीशीत आमी कामाला जातो. दोघं आमची शेम परिस्तीती हाय. आमी पगार कमी आसल्यानं चैनी करत नही. मी मागल्या वर्षी बिन संकल्प करता सेकंड स्पलेंडर घेटली. आदूगर आमी सायकल नं कामाला जायचं. आता आमी माझ्या गाडीनं जातो.    आमी चैनी करत नही, कारण आमी गरीब हाय. आमचं आमाला कसं रहावं त्ये कळतंय. एकदा मालक राउंड मारत मारत आमच्या तिथं आलता. मग त्यानं आपुलकीनं नाव इचारलं. त्यो कैलास म्हणटला मी विलास म्हणटलो. भावाभावा सारख वाटता कि रे  म्हणटला. मग कैलास आणि मी विलास आम्हाला कंपनीत सगळी लोकं भावू म्हणत्यात. आमी कामाला दांडी मारत नही.   आमी आयट्याला असताना दारु पेलती, वोल्ड मंक आणि रेड रम. स्वस्त मिळते. आणि डोस्कं बी धरतंय. म्हणून आमी रेडरम पेतो. बारला जात नही. जाताजाता दुकानातंन घेतो आणि अंधार पडायच्या टायमाला तिकडं मैदानावर पिऊन जातो. कैलासकडं पावण्यांनी दिलेल्या२ लिटरच्या बिस्लेरीची बाटली हाय आणि माझ्याकडं १ लिटरच्या थामस्प ची बाटली हाय. वीस रुपयच केळी चिप्स घेतो आणि गडबडीनं दारू पेतो.  आमी गरीब असल्याचं दारू दुकानदाराला माहीत हाय. त्य