पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाजपमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा !!

कुठल्याही वाईट गोष्टीचा दोष एकट्याला देता येत नाही. त्याला जबाबदार अनेक घटक असतात. आज २०१७ ला भारतात जी काही वाईट परिस्थिती ओढावलीय. ह्याची सुरवातच २०११ ला आण्णा हजारेंपासून झाली. समुहाचा उन्माद दिसू लागला. उद्दाम भाषणांनी कान तृप्त होणारा समाज दिसू लागला. आणि आपल्या वाईटाला काँग्रेसच कशी जबाबदार हे वातावरण तयार करण्यात तथाकथित विरोधकांनी बाजी मारली. सोशल मिडीया सक्रिय झाला तो याच काळात. आण्णांनी गांधीमार्गावर जाऊन हिंसेच समर्थन करत एकच मारा क्या ? हा निर्लज्ज सवाल केला होता. टोप्या घालणारी गर्दी मोदींकडे फिरली. मोदीच देशाच कल्याण करू शकतात हे बिंबवल गेलं.  याच काळात श्रीमती सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवार, राहुल गांधी आदी आघाडीच्या नेत्यांची अश्लील फोटोशॉप पसरवली गेली. जनतेला पटवून देण्यात आलं कि हे लोक खलनायकच आहेत. आज सोशल मिडीयावरच्या तक्रारींचा ओघ बघता. २०१४ ला जर सायबर पोलीस सक्रिय झाले असते तर कदाचित सायबर पोलिसांसाठी वेगळी भरती गृहमंत्रालयाला काढायला लागली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या अफवा पसरविल्या गेल्या. काँग्रेस राष्ट्रवादी चा समर्थक म्हणजे देशद्रोही ह्या नजरेनं

अभ्यास

इमेज
मी लहानपणी फडणवीस एवढा अभ्यास केलो असतो तर शिवाजी युनवर्सिटीतंनंच एकदम शेदोनशे उपग्रह वर सोडलो असतो.  आणि जोतीबा जत्रंला गुलालमय, आप्पाचीवाडीला भंडारा उधळलेले फोटो उपग्रहाथ्रु काढलो असतो.  गोमातेला जन्मताच चिप बसावी अशी लस भरवतानाच सोय केलो असतो.  बुलेट ट्रेन ईचलकरंजीत फिरवलो असतो.  एवढी प्रगती केलो असतो कि आमच्या जिल्ह्यातली लोकं स्वतंत्र देशच मागिटली असती. कर्नाटक वाली आमचं बेळगाव सकट सगळं घ्या खरं तुमच्या राष्ट्रात घ्या म्हणटली असती.  मग आम्ही स्वतःच देश तयार करून राष्ट्रवादी चा पंतप्रधान केला असता.  पण अभ्यास अभ्यास कमी पडला अध्यक्षमहोदय.  😢

पुरोगामी

मी पुरोगामी हाय. पुरोगामी असण्यात मज्या असते. मज्या म्हणजे ते लै क्रिटिकल असतंय. क्रिटिकल म्हणजेच बुद्धिमान. बुद्धी मान म्हणजे शक्तीमानचा साडु. म्हणून लै मज्या येते. नमुन्यादाखल माझ्या दोस्ताबरोबरच्या गप्पा. तु पुरोगामी हायीस का ? हौ. तु कांग्रेस चा समर्थक हायीस का ? नही. मग राष्ट्रवादी चा ? हौ. म्हणून तु पुरोगामी हायीस का ? नही. मग पुरोगामी म्हणजे काय ? पुरोगामी लै आवघड असतंय. गप्प तुला कळणार नही. हाँ. अशा रितीने गप्पा झाल्या. पुरोगामी असल्यानंतर प्रचंड गप्पा मारता येतेत. म्हणजे त्या मित्राबरोबर मी गप्पा मारत नही. कारण तो पुरोगामी नही. आम्ही आपल्याआपल्यात लै गप्पा मारतो. म्हणजे कायबी आम्हाला रोज विषय असतात. आणि आम्ही आपल्याआपल्यात लै गप्पा मारतो. रोजचा विषय आम्हाला अनेक पदर उलगडून चर्चा करायची असते. म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा, भुमिका, निधर्मी, कशा पद्धतीने एखादी गोष्ट पुरोगामी हाय कि नही ते ठरवितो. पुरोगामी क्रिटिकल असते. त्याला अनेक म्हणजे अनेक पदर असतात. पुतळा, ह्यंवत्यंव. निधर्मी. सर्वधर्मसमभॉव वगैरे. शाकाहारी मांसाहारी. मूनी बाबा रामदेव बाबा राम रहीम रामनाथ कोविंद कायपण

महापूर

सण २००५ ला पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. लाखो लोकांचं स्थलांतर करावं लागलं. २००५ ला महापूर यावा असा काय महान पावसाळा नव्हता. पण भौगोलिक स्थिती मुळे तो पूर आलता.  पुढे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सरकारने हवे ते बदल केले. नंतर बरेच पावसाळे आले गेले. २००५ पेक्षा जास्त पाऊस देखील पडला. पण पूराचा धोका टळला.  तेच जर मुंबई बद्दल बघितलं तर दरवर्षी तुंबापुरी होतेय. आपत्तीवेळी कोण मदत करत नही ? सगळेच करतात. आमच्या शाळेला १ महिना सुट्टी पडली. त्या काळात सगळी पोरं रोज पुरग्रस्तांना खायप्यायला घरून डबे घेऊन जायची.  पण लोकांच नुकसान झालं होतं. कुणी गप्प बसलं नाही. आणि खुळचट भावनिकतेत न अडखता नेत्यांच्या मागं लागून कामं करून घेतली. तेव्हापासून२००५सारखी परिस्थिती परत उद्भवली नाही.  काल मुंबईत लोकांनी मदती केल्या एकमेकांना. ठीकच. पण उगचच दरवर्षी असं करत बसणार असला तर दरवर्षी च पूर येणार. तुम्ही नियोजन करण्यासाठी कधीच मागं लागणार नाहीत. कारण मुंबईतील लोकांना वेळ पण नसतोच. पण उगचच भावनेत गंडून दरवर्षी गुडगाभर कमरेभर पाण्यात अडकून पडायच कशाला ?  त्या वाटणीच एवढ्या वर्षे सत्ताधारी असणाऱ्या लोकांना

जोकपाल

इमेज
आण्णा हजारे आणि माझं काय बांधाला बांध नही. ना आण्णानं आमचं पपईचं झाड तोडलंय, ना मी आण्णाचं एरंडमुंगळीच झाड तोडलंय.  आण्णा हजारे हे परवा परत लोकपाल वगैरे लावायला परत आंदोलन करणार अशी खबर आमच्या कानावर आली. काय करणार लोकपाल आणि लोकायुक्त घेऊन ?  ती काय धुतलेली असतात काय ? अंदाकारण फ्लॉप शो हाय हे.  एका उदाहरणार्थ सांगतो हे मी. (म्हणजे बोकील काका कसं झटपट सांगतेत तसंच अगदी)  हे बघा मला जनतेने सांगितलं कि , हे घे धा रुपये आणि एक पेन आण.  तर मी आठ रुपयाचा पेन आणणार आणि दोन रुपये खाणार.  आता लोकपाल आणि लोकायुक्त हे दोघं आले तर लोकपाल ला २ रू, आणि लोकायुक्त ला १रू खायाला घालणार आणि ५रूपयाचा पेन आणणार. मग जनतेला ८च दिलेलं चांगलं कि ५ चं . कुठलं शुद्ध विचार वगैरे काय नसतंय. सगळे पैसे खाऊ असतात. लोकपाल आणि लोकायुक्त भ्रष्ट निघले तर काय मी उपोषनला बसू काय ? त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि लोकं. कोण सांगिटलंय असला फालतू कारभार ? नोटबंदीत बोंबलत भाजून गेल्या जनता. लोकपाल आणून तिरडीवरची सुतळी घच्च आवळली जाईल. त्यामुळे ते काय नको.  त्यामुळं आण्णांनी घ्यावी विश्रांती हाच नातू म्हणून प्रेमाचा सल्ला.  🙏

संभाजीराजे , कोल्हापूर

छत्रपती संभाजीराजे. २००८ ची निवडणूक होती. ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हातकणंगले लोकसभा मतदार संघ तयार झाला. त्यावेळी खासदार श्रीमती निवेदिता माने होत्या. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात त्यावेळी खासदार कै. सदाशिवराव मंडलीक होते. दोन्ही जागा राष्ट्रवादी च्या. २००८ ची निवडणूक जाहीर झाली. कै. सदाशिवराव मंडलीकाची राष्ट्रवादी कडून दुसरी टर्म पुर्ण झाली होती. श्रीमती निवेदिता माने वहिनींचीही तिच गत होती. पवार सायबांनी कै. मंडलिकांना तिकीट नाकारल. आणि कोल्हापूर चे यूवराज छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट दिलं. तोपर्यंत संभाजीराजे कोण ? ह्याची खबर कोणालाच नव्हती. कदाचित पवार सायबांना सातारा पॅटर्न लागू करावा वाटलं असावं. त्यापुर्वी राजु शेट्टी शिरोळ विधानसभा मतदारसंघात रजनीताई मगदूमांचा पराभव करुन आमदार झाले होते. (ही कै. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटलांची ऐतिहासिक चुक होती.) आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष यात्रा काढून (यात त्यांच्या पायाला फोड वगैरे आले होते.) दुध दरवाढ आणि ऊसाचा ३८० रुपयाचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून वातावरण बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी करण्यात यश मिळ
इमेज
जग भलत्या वेगानं पुढपुढं सरकायला लागलंय. लहाणपणापासूनचा आता पर्यंत चा प्रवास रिवाईज केला कि झालेली बदलं आठवायला लागतेत. आम्ही शाळेत जायचो. आताची पोरं पण जात्यातच. दीड किलोमीटर पायपीट करत शाळेला जावं लागायचं. पण त्याचं काय वाटायचं नही. आज दीडेक किलोमीटर चालायच म्हणजे हातात गाडी असताना का चाला ? म्हणून प्रश्न पडून मन किळसवाणं होऊन जातंय. आणि आपण गाडीवरौनंच जातोय. आम्ही पाचवीत असताना मोबाईल आला. कोणतर मोबाईल वर बोलायला लागला कि त्याचं मोठं कौतुक वाटायच. त्याकाळी बऱ्यापैकी नेत्यांची पोस्टरं कानाला मोबाईल लावल्याची फोटो असायची. नोकीयाचे ब्लॅक अँड व्हाईट टु कलर मोबाईल यायला चालू झालं. ईनकमिंगला पण चार्ज पडायचा. नोकिय स्यामसंग कंपनीच्या मोबाईल नी त्यावेळंला वारंच केलतं. मल्टिमिडीया मोबाईल आलं. एसेमेस एमेमेस. झालं. रेडिओ लागायचा. माझ्याकडं आठवीत नोकियाचा 6030मोबाईल आला. मोबाईल चालवायची अक्कल लै आली. त्याकाळात मजा वाटायची एकमेकाला मिसकॉल मारायला वगैरे. हळूहळू एमपीथ्री मोबाईल आलीत. गाणी मेमरी कार्ड आलं. मग आपल्या आवडीची गाणी ऐकायला आली. फोटो व्हिडिओ एनेबल मोबाईल आलीत. त्यात सर्रास बीप्या बघण्य

आज्जा आणि आण्णा

वर्षाला रानात शाळू असायचा, आतापण हाय. आज्जा हुतं तवा सांजच्या टायमाला आम्ही फिरायला जायचो. माळा असायचा आम्ही आंटा म्हणायचं त्याला. कन्नड भाषेत एक घाण म्हण हाय. 'आंटा इल्लरे शंटा इल्ल'  म्हणजे  ते रान पिकलं नसायचं. ह्या दिवसात संध्याकाळी एक असलं मस्त वातावरण असायच काय विचारायला नको असं. तवा अजिबात मोबाईल कंप्युटर असलं काय काय नसायचं. आज्जांची दोस्तं लै.  आज्जा फिरत असायचे. पंढरपूर ची वारी करणारा आज्जा गावात एकटं. लोकांच्या उपयोगाला पडायच, हे मला दुसरीत सांगायचीत. काय घंटा कळतंय ? मी उगचच रुबाबात हांहां म्हणायचो.  पुढं पैलीदुसरीत गेल्यावर सकाळी संध्याकाळी आज्जा न्यायला आणायला यायचीत.  केस कटींगला गेलं कि आज्जा टक्कल करायचीत आणि शेंडी ठेवायचीत. संध्याकाळी भजनाला आजरेकरवाड्यात. तिथंच आज्जांचा दोस्त पैलवान तातबा लठ्ठे. त्यांची खासियत हुती लै खुराक लागायचा, मग आम्ही जेवायला बसल्यावर जरा जास्त जेवलो कि आज्जा म्हणायचीत भजी पाव- तात्या लठ्ठ्या. दुसरं दोस्त निशानदार आज्जा त्यांचं टोपन नाव बताशा. बताशा आज्जा  प्रसिद्ध माणूस. कुस्त्यांचं मैदान घ्यायचं पैलवान आणायची तयार करायची कामं