पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रांतीसिंह नाना पाटील

इमेज
चौथीची उन्हाळी सुट्टी होती. घराशेजारच्या सुरगोंड मास्तरना सुट्टी असायची. मग ते कोल्हापूर हून गावाकडं यायचे. त्यांच्या घरात ढीगभर पुस्तकं, त्यात गोष्टीची, इसापनिती, चंपक, पेपरमधले अंकूर बालमित्र हे सगळं वाचायला लै आवडायच, म्हणून मी तिथं सदानकदा पडाक सकाळचा नाष्टा पण तिथंच व्हायचा आणि कधीकधी रात्रीच जेवणपण.  त्या सुट्टीत मास्तर परत कोल्हापूरला जाताना एक पुस्तक देवून गेले. जे मी त्यांना अजूनही परत देत नही. पुस्तकाचं नाव क्रांतिसिंह नाना पाटील. नाव वाचून तर भारीच वाटलं म्हणटलं क्रांतिशिंव आणि पाटलाचा नाना हे जवळच वाटलं. पुस्तक ईतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी संपादित केलेलं आणि अरुंधती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं. नाना पाटीलला कुठल्या महान ठिकाणी जन्म मिळाला नव्हता. आमच्या सारख्या लहानशा शेतकरी कुटुंबात जन्मलेलं नाना, घरी वारकरी संप्रदायातले आईवडील. साधंसुध कुटुंब काहीही पार्श्वभूमी नसताना नाना तलाठी पदापर्यंत पोचले. ब्रिटीश सरकार जनतेचं शोषन करत होतं. जिकडंतिकडं पोलीस हुते. हे सगळं बघून नानांच मन अस्वस्थ झालं तलाठ्याच्या नोकरीला राजीनामा दिला आणि घेतली ऊडी गांधीबाबाच्या चळवळीत !

देशभक्तांची तटस्थता

गेल्या काही वर्षात राजकारण झपाट्याने बदलत चाललंय. यात सोशल मिडीया, ईलेक्ट्रानिक मिडीया किंवा प्रिंट मिडीया ह्याचा वेग वाढतोय आणि नमुनेदाररित्या आपल्या पुढे बातम्या झळकतात. आता काही लिंकपाहिलं तर लक्षात येतं. अबब राखीने हे काय केलं ? त्यामुळे उत्सुकता चाळवून लक्ष खेचण्यात माध्यमं यशस्वी ठरतात. मुळात राखीनं काय केलं हे स्पष्ट न सांगता ते दडवून ठेवायच. आत वेबसाइटवर बातमी तर सामान्य असते. पण राखी नं काय केलं हे बघण्याची उत्सुकता राहवत नसणारे तिथं धडकतात. हाती काय तर राखीनं  अमुकतमुक पक्षात प्रवेश केला. ह्यात अबब करण्याईतकं काय असावं ? अतिरंजीतता हा एक समाजमनाचा भाग होवून बसलाय हे पद्धतशीरपणे काही चाणक्यानीं आधीच ओळखलतं. त्यातूनच एका मुंडक्याच्या बदल्यात शंभर मुंडकी किंवा चुनावी जुमले किंवा पाकिस्तान मध्ये फटाके ई भाषनं राजकारणाची बदलती दिशा ओळखून आलीत. त्यात ते पुरते फसले गेले.  आज परत विविध टप्प्यात गेले अडीच वर्षे गोंधळच गोंधळ चालू आहे. अखलाक, रोहित वेमुला, कन्हैयाला देशद्रोही घोषित करनं, व्हाटसप संवादावर नजर ठेवणे, पॉर्न वेबसाइटवर बंदी आणने, गोहत्याबंदी इत्यादी घडामोडींनी सरकार

असंच पायजे ह्यास्नी..!!

मी आठवीला हाय. बाबा मास्तर हाय. मी आदी पप्पा म्हणायचो. पण आता योग्या म्हणटला आमचं पप्पा न म्हणता आमचा बाबा  म्हणायचं. आणि सर नही मास्तर म्हणायच. बाबा अलिकडं लै वांड झालाय. उठलंसुठलं कि वरडतच असतो. मग मम्मी बी वरडत्या. लै मस्ती हाय दोगांना. मी एकटाच हाय. तरी बी आईबा दोघं कायम बोंबलत्यात. काय दारू पिवून आल्यागत बघत्यात. योग्या म्हणटला घरातल्यास्नी मस्ती हायच रे. त्यला एक भवू हाय बारका पाचवीत. त्यो आभ्यास करतोय आणि हे शिवा खातं.  आमचा बाबा दिवसा शाळेत शिकवतोय आणि नंतरनं हिथं माझ्यावर राग काढतोय. नुस्तं वरडतोय. आई बी. नंतर आई मंगळत येत्या.  मग मी बी परवा मस्ती जिरवलीच.  परवा योग्याच वाटदिवस हुतं. मी गेलतो संध्याकाळी. रात्री यायला धा वाजले. बाबा अंगावर आला वरडत. हरामखोर तुला भिताडातंच गाडीन. मला लै वईट वाटून रडायला आलं. मी म्हणटलो मारा. गाडा. बाबानं यिवून ढकलंलं. जा लै शाना हायीस. तणतणत बसला उशेरभर. मी हिकडं यिवुन झोपलो. रडायला आलं. मुसमुसत रडलो मग सलदी झाली शेंबुड आलतं. मग मुसमुस. रडु. एवढंच. मग आई दुध घिवून आली. बाळ पे एवढं. राजा असं करायच नही. पाचदा म्हणटली रट्टा धरून उठवालती.
आमचं पंतप्रधान मोदी स्टेजवर चढलं कि कुणाच्या बा ला ऐकत नही. भारतातली एक हुरुट पोरं हायीत म्हणून जगात सगळीकडं नसत्यात. हे कुठं बी स्टेजवर चढलं कि दहशतवाद चा बोलून सामना करतंय.  आणून आणून त्या बराकला आणला एकदा. ती किती केली तर सुटाबुटातली हिथं ह्या गड्यानं सुट तयार करून घेटला तर त्यावर बी नाव. ते कसतरच गिलावा बिन केलेल्या भिताडावर निरमाची एडवरटाईज रंगवल्यागत दिसलं.  पण त्या बराक ला जाऊन मिठ्ठी मार कुठ भाषनात पावनंपै असल्यागत बराक बराक करत उठला. चारचौघात हे बरं दिसतंय काय ? त्यात रशियाचा आपला पुतिनमामा लै डेंजर. डेंजर मंजे बोलावी तशी चालावी त्याची वंदावी पावले. मामा एकदा ठरवला कि कुणाच्या बापाला ऐकत नसतो. असं वार्रवीस भाषनातंन बोलत नही तो. शांत बसतो. स्विमिंग करुन येतोय आणि कोण काय बोलंलय बघून ग्राउंड लेवलला काटाच काढून ठेवतोय पुतिनमामा.  त्यात त्यंची आपल्याबरोबर लै चांगली मैत्री हुती आगूदर. खरं मोदी ला आगुदर व्हिसा नही म्हणटलीती. पंतप्रधान झाल्यावर दिली म्हणून का काय कुणास ठौक ऊठलं कि आमेरिका गाठलं असं करायलं. साहजिक हाय पुतिनमामाला वाईट वाटणारच.  तिकडं ते बराक सुद्दीच नही आह

मोजणीदार

मोजणीदार माझा दोस्त हाय.मी एकदा त्यच्याबरोबर रान मोजायला गेलतो. नकाशा वगैरे काढणे. टेप धरणे असली कामं त्योच करालता मी फक्त मापं लिवून घ्यालतो. तिथल्या लोकास्नी वाटलं मीच सायेब हाय आणि त्यो कामाला ठेवलेला. मग मलाच सरबत नाष्टा चहा जेवण सगळी हारकून द्यायलती मित्र हसालता. मी पण तावानं सुचना करालतो हां टेप ताणून धरा. चॉकपीट नीट मारा दगडाला चुन्ना मारा.  सगळं झाल्यावर प्रवचन चालु केलो शिवभवती भांडत बसू नका. काय असल ते रानात पिकवा. एका दुसर्या सरीनं काय फरक पडतंय असं. मित्र वैतागलं.  नंतर जाताना म्हणटला तु सगळ्यासनी शानं करून माझी वाट लावणार.  मी त्यच्या समाधानासाठी म्हणटलो, तुला मी पंतप्रधान झालो कि काश्मीर मोजायला पाठवतो.  मग त्यो लै हारकून म्हणटला आगुदर ब्यळगाव मोजतो. 

दिवाळी अंक बायको

सकाळी मी आणि माझी बायकु पेपर वाचतो. म्हणजे एकदम नही.आधी मी किंवा नंतर मी असं. बायकु पेपर वाचत्या. पुरवणी पण वाचत्या. कधीकधी त्यातल्या पाककृती रेसिपी वाचून मला दुकान ला पाठवत्या. नंतर खायला करून देत्या. बरं वाटतंय. मी पण समाधानी हुतो.  आम्ही दोघं राशिभविष्य पण रोज वाचतो. साप्ताहिक राशिभविष्य पण दोघं वाचतो.  मग एकदा माझ्या राशीत विवाह योग लवकरच असं आलं. मझं हिच्यासोबत लग्न झालंय. तरीपण हिला वाटतं मी अनेक करीन. म्हणून मला ही हाफिसला जाऊ देत नही. हाफिसातले चांगले हायीत समजून घेतात. मी परवा रुपेशला ईचारलो तुम्ही पेपर घेता काय ? मग त्यो नही म्हणटला. त्यला वाचावं वाटत नही. एकेकदा पेपर बरोबर शांपु फ्री मिळतो.  हे त्यला महीत नही. बायकु परवा म्हणटली एकाडेक दिवस शांपु फ्री दिला पाहिजे.  नंतर विचारली पेपर खपावं म्हणून ते मालक लोकं शांपु देत्यात काय ओ ? मी पण व्हय म्हणटलं. तिला सांगालो तर लै विचारत्या.  मग ती म्हणटली तुम्ही रोज शांपू फ्रि असणारा पेपर टाकायला लावा.  अग रोज कोण देतील असं तिला समजवायची पण काय सोय नसत्या. म्हणटलं बघू. मला ह्यो पेपर आवडतो कारण बातमी खरी असते. फोटो पण क्लियर येतात. मला
शहरात काय मेळ नसतंय. ऊगचच भरलेला भंपकपणा. मोठ्ठीच्या मोठ्ठी बिल्डींग आणि त्यात कोण विचारत नसलेला एक फ्लॅट कुठल्यातर मजल्यावर. सकाळी ऊठून माॅर्निंग वाॅक करून पेपर वाचूपर्यंत दहा वाजतंय. तिथंन गडबडीत शिळं झालेलं माळव्याची भाजी नहीतर पच्चपाणी असलेल्या आमटीची वाटी आणि तेल सोडा टाकून हवा भरलेल्या चपात्या खावून कामावर पळा.  तिथं राबून आलं की परत घरात येवून काम. आणि रडक्या सिरीयल बायकूबरोबर बघून पोराचं अभ्यास घेतल्याची नाटकं. मग दमून भागून झोप.  ती गर्दी, सिग्नलला वाट बघत बसणं, कधीकधी वाटतयं मधल्या मजल्यावर एक फ्लॅट घेवून पिलरंच पाडून टाकावं.  त्यापेक्षा गावात सकाळी ऊठा, गैरमसरांच शेणघाण करा, वैरण आणायचं, आकरी दूधाच चहा प्यायच, नाष्ट्यालाच झुणका भाकरी नहीतर सांजा खायाच. दूपारला रानातंन आलं की गार आंघोळ करायचं. जेवलं की कट्ट्यावर नहीतर आंब्याच्या झाडाखाली जावून झोपायचं. झोपून ऊठलं की परत चहा प्यायला जायचं. संध्याकाळला कुठतर देवळात ते बसून गावाची माप काढायची. कशाला कोण जबाबदार हाय त्यावर चर्चा करायचं. गावातलं मॅटर ऐकत बसायचं. रात्रीला पाणी पाजवायला जायचं. तिथंच रानात झोपायचं.  सकाळी घरातली हूड

सदाभावूची शेती

इमेज
कृषी आणि पणन मंत्री सदाभावू खोत यांच्या मुलाचं काल लग्न झालं. ईस्लामपूरात. मुख्यमंत्री आणि डझनभर लोकं उपस्थित होते. लगीन आगदी जोरात झालं. आंदोलन आसलं की मिडीया भावूचं मोडकं घर दाखवत हुती. सहानभुती गोळा करून देत हुती. सामान्य शेतकरी ह्यंव त्यंव आणि आत्ता सामान्य खात्याचे मंत्री झाल्यावर परिस्थिती कशी बदलते हे दाखवत नही. मग आमी कसं म्हणायचं आछे दीन आले म्हणून ?   गुंठ्यावारीत जमीन असणारी लोकं एवढ्या जोरानं लगीन करतेलं बघून मला भावू रानात काय लावत असंल असा प्रश्न पडलाय.  माझंबी लग्नाचं वय झालंय. फेसबुकवरचेच पाच हजार, चारपाचशे परदेशातली, गावातली, पावणंरावळं कसं हान्डेल करायच कळंना. सदाभावू कडे शिकवणी तर लावु काय ? आजून ठरायचं हाय  दणक्यात करायचं हाय !!! 😊 😊 😊

माझं लगीन हून धा वर्षं झाली.

माझं लगीन हून धा वर्षं झाली. धा वर्षाआगूदर मला डोस्क्याला लै टेनशन यायचं.  माझं शिक्षेण कमी, चवथी. रान बी लै नही आमास्नी. एक एकर हाय. त्यच्यानं मला कोण पोरगी देतील काय असं वाटायचं. मंजे मी एकटाच इचार करत हूतो. संज्या माझा दोस्त. पानपट्टी हाय त्यची. त्यचं लगीन झालं आणि माझ्या डोस्क्यात किडं पडली. त्यला पावण्यातलीच पोरगी केली. संज्या लडतरबाज. काॅलेज शिकला त्यो आणि पानपट्टी काढला. काॅलेजात पोरीस्नी चुन्ना लावत हूता आता पानपट्टीत पानाला चुन्ना लावतोय. त्यची बायकू बघून मला भ्या वाटलं. तिची नही. मला माझं कसं व्हायचं ? मलापण असली गोरट्याली पोरगी बायकू म्हणून पायजेल. संज्या खूष हूता. मी सकाळी एकदा तेवढं त्यला गाठ पडत हूतो. ते बी तंबाखचुन्ना घ्यायला. लगीन झाल्यावर त्यला भारी वाटत असणारंच. त्यला बघिटलं की मला टेंशनच यायच. लग्नाला त्यची मेव्हणी बी आलती. ती हिच्यापरास दोन वर्षानं बारकी हूती. माझं माप बसत हूतं. खरं ती शिकलेली, मला करून घील काय ?  आसं सगळं डोशक्यात यायचं. दिवसभर तेच. म्हणून मी तंबाखचुना दूसर्या पानपट्टीतंन आणलो. लोकास्नी वाटलं माझं आणि संज्याचं वांदं झालंय. कायतर लोकास्नी वाटतंयच.

मी पूरोगामी आहे.

मी पूरोगामी आहे. यमपीयस्सीचा आभ्यास करताना ठरविलो. पूरोगामी व्हायचं. मला आगूदर पूरोगामी मंजे वेगळे वाटायचे. आता वेगळे वाटते. पूरोगामीपण चेक करावे वाटले. घरात म्हणटलो पूरोगामी आहे मी. घरातले म्हणटले हे काय ? कुठली पोश्ट काढलीस ? हाहा पुरोगामी पोश्ट. लहान असताना मी पूरोगामी नव्हतो. आता आहे. कसं ?  लहान आसताना मी कंडा बांधायचो हातात. आता बांधत नही.  शाहू फूले आंबेडकर. मी पुरोगामी. पूरोगामी संगीतातले स्वर परगम. सारेगमपधनीसा. देवळात जात नाही. देव नसतो. म्हणजे ती संकल्पना आहे. तुम्ही म्हणशीला देव नसतो म्हणजे हा देवाचं अस्तित्व मान्य करतो.  मी पोश्ट काढली. मंत्रालय सहाय्यक. घरात कळलं. बारक्या भावानं फटाके लावले. आईनं लक्षुमीला निवद दाखवलं. वडलांनी पेढे आणले. मला आनंदात कळलंच नही. पूरोगामीपण गेले असं वाटलं. नाही. माझा अभ्यास आहे. पुण्यात दोन वर्षं काढली मी. पुण्यात लोक हूशार आहेत. मला पुणे आवडतं. गावातली पोरं आयट्या करून कंपनीत कामाला. ईकडे त्यांचे आईवडील सांगतात आमचं पोरगं पुण्याला. गंमत वाटायची. पोश्ट काढल्यावर पुढे युपीएस्सी द्यायची होती. पण नको म्हणटलं. आता पूरोगामी पद्धतीने लग्न करावं अस
अवगुणांचे हाती । आहे अवघीच फजिती ।।१।। नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ।।२।। विष तांब्या वाटी । भरली लाउ नये होठी ।।३।। तुका म्हणे भाव । शुद्ध बरा  कृषी आणि पणन मंत्री सदाभावू खोत यांच्या मुलाचं काल लग्न झालं. ईस्लामपूरात. मुख्यमंत्री आणि डझनभर लोकं उपस्थित होते. लगीन आगदी जोरात झालं. आंदोलन आसलं की मिडीया भावूचं मोडकं घर दाखवत हुती. सहानभुती गोळा करून देत हुती. सामान्य शेतकरी ह्यंव त्यंव आणि आत्ता सामान्य खात्याचे मंत्री झाल्यावर परिस्थिती कशी बदलते हे दाखवत नही. मग आमी कसं म्हणायचं आछे दीन आले म्हणून ?   गुंठ्यावारीत जमीन असणारी लोकं एवढ्या जोरानं लगीन करतेलं बघून मला भावू रानात काय लावत असंल असा प्रश्न पडलाय.  माझंबी लग्नाचं वय झालंय. फेसबुकवरचेच पाच हजार, चारपाचशे परदेशातली, गावातली, पावणंरावळं कसं हान्डेल करायच कळंना. सदाभावू कडे शिकवणी तर लावु काय ? आजून ठरायचं हाय  दणक्यात करायचं हाय !!! 😊 😊 😊 😊 😊 सोंग वाव ।।४।।

हिलीक्यापटरच बरं. 😊

माझ्याकडं एक हिलीक्यापटर हाय. घिवून तीन वर्षं झाली, सुरवातीला डायवर ठेवलोतो. सहा महिन्यामागं काढून टाकलं. बायकू म्हणटली, विमान घ्या. आत्ता इमान कुठंन घिवु ?  मी म्हणटलं लै बोलू नकोस कशाला झक मारायला इमान पायजे ?  ती म्हणटली आपल्या घरातली तेवढंच मावत्यात चॉपरमधी. माझी आई बाबा मावत नहीत, तुमी एकदाच त्यासनी जोतिबाला निवून आणला. परत कधी माह्यारला गेलं तरीबी बसता काय मामा आणतो फिरवून असं एकदा तर म्हणटला काय ? असं म्हणून बायकू मला कायम ईमोशनल करत असते.  डायवर सॉरी पायलट हुता ते बरं हुतं. आता मलाच हाणावं लागतंय.  डायवर जरा कडूच हुता. जरा कुठं प्याड दिसलं कि उतरवायचा आणि तंबाखू मळ. कुठं शिग्रेट वड असं करायचा. आता मला सांगा सारखं उतरवायचं परत उडवायचं ह्यामुळं आवरेज कमी हुणार कि. आनेक पायलटची घाण सवय म्हणजे त्याच्या बा चं हिलीक्याप्टर असल्यागत एकटाच हेडफोन घालायचं आणि गाणं ऐकायचं. मला हाळूहाळू त्यचा कारभारच पसंत यिना. मग गोड बोलायला चालु केलो, हाळुहाळू कुठलं बटान कशाचं, गेर कसं टाकायच उतरवायच कसं ते शिकलो. खरं त्यला सांगिटलो नही. नहीतर उगच म्हणायचा पोटावर पाय आणला म्हणून.  एकदिवस दुपारला मी आणि
ईचलकरंजीला बाजारला जावून आलो. थोरात चौकात मोठ्ठा बाजार असतंय दर शुक्रवारी. सण २००८ ला मिरज दंगल झाली होती पाठोपाठ ईचलकरंजीतपण दंगल झाली. त्यावरून तिथली संवेदनशीलता ध्यानात येत्या.  तर ह्या थोरात चौकात डझनभर गायी मोकाट हिंडत असतात. बाजारात पण हिंडतात. शिंग मारतात. भाजीपाला नासधूस करतात.  आत्ता महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी लागु झालीय. त्यात ईचलकरंजी सारख्या संवेदनशील भागात अशा मोकाट गायी हिंडत असतात. कुणाची मानसिक स्थिती काय सांगता येत नही. आज ना उद्या जर कुणी स्वसंरक्षणार्थ ह्या गायींवर हात उगारला तर कुणाच्याही भावना दुखावल्या तर परत त्याच पर्यावसन धार्मिक भांडणात व्हायची शक्यता नाकारता येत नही. त्याप्रसंगी अशा गायी ज्या भागात हिंडतात त्या गायींना गोशाळेत दाखल करावं. किंवा त्यांची काहीतरी सोय लावून बंदोबस्त सरकारने करावं. अन्यथा भावना दुखवायला निमित्तच लागतंय लोकांना.
एक मोठ्ठा दगड. नंतर तिचे तुकडे. तेच विखुरले आघातानी. मग प्रिथ्वी तयार झाली. प्रिथ्वी मोठ्ठा दगड असणार मग तुकडे शिळा मुर्त्या.  मग पाणी गुरत्वाकर्षन समुद्र पाण्यात जीवसृषटी वगैरे.  मग माणूस.  दगडाला काय अर्थ ? तस बघितलं तर कशालाच काय अर्थ नाही.  झोपून टाकावं कायमच कुणी परत ऊठ म्हणनार नाही असं. 
परवाचा दोस्त भेटला, चंद्रावर बोलत होतो आम्ही.  मी म्हणटलं तुला चंद्रामध्ये कोण दिसतंय ?  ते म्हणटलं, चंद्र म्हणजे मोबाईलची बॅटरी. चार्जिंग हूईल तसं मोठ्ठा होतो. कमी हूईल तसं बारका हूतो. बॅटरी फुल्ल म्हणजे पोर्णिमा, क्रिटीकली लो म्हणजे आमोशाच्या आदूगरचा दिवस. स्वीचाॅप म्हणजे आमोशा. असं चंद्र असतंय.  आणि तुला म्हणून सांगतो पोरींच्याबरोबर लै चॅटींग करत जावू नको. लै चॅटींग केलं की असं चंद्रात कोणतर दिसतंय. त्यामुळं माणूस बिघडतो. शाना हो ! 

बापा

ए आय ट्रिपल ई चा फाॅर्म भरायचा होता बारावीला वडलांची सही लागत होती, गडबडीत फाॅर्मवर सही राहीलीती आणि तसाच फाॅर्म सबमीट केलता. क्लार्कनं फाॅर्म परत केला. दूसर्या मिनटाला परत मीच सही मारून फाॅर्म सबमीट केला. क्लार्कला काळाबाजार ध्यानात आला. त्यांनी थेट प्रिंसीपलांकडे तक्रार केली. मला बोलवून घेवून घरला फोन केला.  वडलांना म्हणटले की, तुमच्या मुलानं डुप्लिकेट सही केलीय.  बापा म्हणटले, करू दे की मीच सांगिटलोय.  मग प्रिंसिपल म्हणटले,  अहो बँकेत ते डुप्लिकेट सही मारली तर ? नही मारणार त्यो ! फोन कट करून प्रिंसिपलांनी माझ्यापुढं हात जोडलं आणि म्हणटले धन्य आहेस बाबा ! माध्यान्ह भोजन आता आलं. आधी तांदूळ यायचे. त्याला घरातल्या कुणाचीतर सही लागायची. बापांनी तवाच शाळेत सांगिटलं, करू दे सही. नंतर माझं मला वईट वाटायचं की, आपन त्यांची सही करतोय. मी एकदा बोललो. तर बापा म्हणटले तुझ्यावर भरोसा हाय. माझ्या बापांचं शिक्षण कमी. शेतीत लहानपासून राबले, अजून राबणं चालूच आहे. जसं कळायला चालू झालं तवापासूनच मी पण शेतात चाललो, मी गेलो की कौतुक असायचं.पण ते मला कधी बोलून दाखवायचे नाहीत. मम्मीपुढं कौतुक करतात. कधीच
I asked my friend what can i do for improve my English talking ? He suggest that chat with your foreign friends.  Then i messeged my pakistani friend Iffra.  We chat about bolywood.  She asked me 'Udta panjaab dekha ?'  I replied 'panjaab nhi punjab !' No it's Panjaab. Woh chor do tumhne dekha ki nhi ? Kounsa chor ? She replied chor nhi chhhodd. Then i went offline. Next day i told my friend about chatting. He replied, ky mrdaa tula pakistanchich gaavli hvy ? Ti b aaplyatlich hy ! aamerikchya poribrobr bol aani v4 when you coming Goa ? Aani sudhra jra.  :D

मी पावसाचं ठेंब आहे.

मी पावसाचं ठेंब आहे. परवा पडलो, समुद्रातच. जिथंन आलतो तिथंच पडलो. पडल्या पडल्या खाली गेलो. खाली गेल्यावर एक जोरात लाट आली. मी किनार्याला गेलो, जोरात लाटेनं ढकलल्यामुळं माझा मी कडेला येवून पडलो. वाळूत घूसलो, जरा शांत वाटलं. तेवढ्यात परत लाट आली आणि वाळूतंनं आत गेलो. रात्रभर हिंडलो समुद्रात सकाळ झाली, दूपारला ऊन पडलं. परत मी वर चाललो. माझ्यासारखं कितीजण तर ओरडत होते. त्यांना बघून बरं वाटलं.  वर जाताना एकच विचार डोक्यात होता. रात्रभर हे सगळे होते कुठे ?

डाक्टराच्यात आणि रेड्यात काय फरक राह्यला ?

एका गावात एक जनावराचं डाक्टर आलं, नवीन शिकलेलं हुतं, हुशारबी हूतं. हाळूहाळू जम बसाय लागलं. डाक्टरंच गुण यायला लागलं, म्हसरं पटापट गाब धराय लागली. डाक्टराची किर्ती झाली.  त्या गावातला एक भाग हूता, तिथली माणसं लै कडू, म्हस ओपला यायच्या आगूदरंच गाब घालवायची. आसं एक म्हस गाब आलेली नही म्हणून डाक्टरंन प्रामाणिकपणानं सांगिटलं, तर त्यो गडी म्हणटला घाला लस त्या नादानं का हूईना लवकर ओपला यील. डाक्टरला पण पैशाशी मतलब डाक्टर बी गाब घालवायचा.  आसंच दिवस चालली, एखादं जनावर दोन टप्प्यात गा ब गेलं नही की त्या भागातली लोकं डाक्टरला शिव्या द्यायची. मग डाक्टर ते भाग सोडून दिला. त्या भागातल्या एका मस्तवाल माणसाची म्हस आजारी पडली, ह्यो डाक्टर तर जायचंच बंद केलता, बाकीची तर आगूदरपास्नंच जात नव्हती. मग परत ती ह्या डाक्टराला पिडाली. ह्यानं गावातल्या एका म्हातार्या डाक्टरचा नंबर त्यला दिला. त्यो म्हातारा डाक्टर कुणाच्या पण गोठ्याला जायचं झालं तर न्यायला सोडायला गाडी लागायची. तश्या अटी त्यानं सांगिटलं. रोज सकाळी म्हशीचा मालक आल्यावरंच डाक्टर अंघूळीला जायचा, मग त्याला तासभर तिथंच ताटकळत बसावं लागायच. नंतरनं गो

दरबार भरलेला आहे

दरबार भरलेला आहे. हा प्रसंग विशेष महत्वाचा असल्यामुळे दरबारातील वातावरण तंग झालेले दिसते. राज्यवंशातील अनेक राजकुमार दरबारात हजर असून दरबारी लोकांना विशेष प्रकाराची चिंता व उत्कंठा लागलेली दिसते. अशा वातावरणातच राजानं आपली शोधक दृष्टी आपल्या लाडक्या सरदार बिरबलाकडे रोखली आणि म्हणटला..... गायछाप हाय का ? मी चुकून पितांबरीची पुडी आणलीय..

आणि.

लग्नानंतर पहिला पावसाळा. माझं लग्न एप्रिलमध्ये झालं. म्हणजे 15 तारखेला झालं. बायको शहरातली, मी खेड्यातला. खरं मी निम्मं शहरात निम्मं गावात. म्हणजे माझी ड्युटी साॅरी जाॅब शहरात, राहायला खेड्यात. इथं आल्यावर मी शुद्ध बोलालो, गावात गावठी बोलतो. बायकूला घेवून मी ईकडं सेट झालोय. गावात नकोच वाटालतं. यावर्षी पाऊस नही, रिमझिम आहे. मे पर्यंत रविवारी गावाकडं जायाचो मी बायको दोघंपण. रविवार भैरोबाचा वार, बायकू मी देवाला जायाचो, बायकूचं आणि माझं दोघांचं देवावर ईश्वास हाय, तिचा गणपती वर आह े, माझा भैरोबावर हाय. तरीबी आम्ही एकमेकांच्या देवाचा आदर करतोय. गावात भैरोबाला मी आणि ही. हीच नाव रूपाली. मी रूपाली दोघं जायचो. दर्शन करायचो. आता जायला नको वाटतंय. म्हणजे मलाच नको वाटतंय. गावातली लोकं चांगली नहीत. म्हणायची ही आली आणि पवूस गेलं. म्हणून जात नही. रूपालीवर माझं प्रेम आहे नही हाय. हाय जवळच वाटतंय. आहे म्हणटलं की ऊगच बरमूड्यात बनेल इन केल्यागत वाटते. रूपालीवर माझे प्रेम आहे. आरेंज लगीन असल्यानं प्रेमपण आरेंज. लग्नावेळी ही एकटी नही आली, बरोबर मांजर पण घिवून आली. डिंपी नाव मांजरीच. झक मारत हिकडं पण आणलं.

तुला लागल्या म्हणजे लै चांगली ! :D :P

एका लांबच्या पावण्यांकडे जवळच्या पावण्याबरोबर आलोय. तिथं लग्न ठरलंय, जवळचा पावणा पण माझ्याच वयाचा हाय. सकाळी जेवून खावून बसलो तर नंतरन एक पोरगी दिसली तिथं. कट्ट हूती दिसायला, मला आवडली आणि माझ्या अगोदर पावण्याला. ह्यो गडी म्हणटला हे माझा विषेय हाय तू हात घालायच नही.  मी बर म्हणटलो. पावणंपै जरा जास्त असल्यानं काय हालचालपण करायला यिना. त्यात ह्यो गडी डाव टाकायला जाताना एॅपलच फोन फिरवत चाललाता. जावून विचारला नाव काय ?  ती काय बोल्ली नही. हे मला यिवून म्हणटलं, बोलत नही ती. बसून क ंटाळलतं ते, आणि त्यांचं जरा जवळच पावणं असल्यानं ह्यो तिथंच लोळत झोपला. मी पण त्यांच्याच टेबलावरचं पेपर फाडलो नंबर लिवलो आणि तिच्याकडं टाकलो. चिठ्ठी ऊचलली आणि दूसर्या मिनटाला व्हाटसप चालू झालं.  ;) पुढची बोंब असं झाली की ती कर्नाटकातली. पहीली दोन मेसेज वाचून काय कळंना झालं. मराठी इंग्लीश मध्ये टाईपलेलं ओळखतंय, खरं कन्नड ईंग्लीशमधे कळत नही. मग नंतर डोस्कं लागलं हे कन्नडी हाय. मग असंच असंच चॅटींग करत बसलो. ह्यो ऊठला आत्याला चहा कराय लावला. चहा घिवून तीच पोरगी आली. मला लाईन देत गेली. ह्यो म्हणटला घाणा घाटलास ? चिडलंय

मला दोन बायका

आमचं कुटूंब हाय, मला दोन बायका. मी O हाय. त्या दोघी H हायीत. मग आमचे वर्तृळ पुर्ण झाले. म्हणजे कुटूंब. आम्ही कुणीच आडनाव लावत नाही. आम्हाला H20 म्हणून ओळखतात. मी गोव्यात हिंडलतो तवा एका बाईनं सिगरेटमधंन मला वढलं. मी आत गेलो, रक्तात मिसळलो. तिथं ह्या दोघी भेटल्या, भनीभनी हायीत, माझं दोघींच्यावर प्रेम हाय, आमचं सूखी कुटूंब त्या बाईच्या कपाळातून बाहेर पडलं. नहीतर तिथं कितीतर कूरूप C सिगरेटमधंन येत होत्या. घामातंन थेट समूद्रात गेलो. दोघीस्नी घिवून समूद्रात भरपूर हिंडलो. एका सूरमई नं आम्हाला गिळलं. तरी आम्ही जिवंत हूतो, दोघी म्हणटल्या असं घर पायजे आपलं. तोपर्यंत सूरमईला पकडलं. आम्ही सूरमईतच होतो. सूरमई हाॅटेलात गेली तवा आम्हाला घराला गिलावा केल्यागत वाटलं. मग हाॅटेलवाल्यानं सूरमईला तव्यावर टाकलं आणि ह्या दोघी माझ्यापासून लांब गेल्या आणि हरवल्या. माझं ब्रेकप झालं. मी परत एकटा पडलोय. जावू दे. पुढच्या वेळंला नव्या दोघी घेवून कुटूंब तयार करणार आणि कुणाच्या तर ब्रेकप पार्टीतल्या दारूत जाणार ! 

पावसाचं आवाज कसा येतं

पाऊस पडालाय. पावसाचं आवाज कसा येतंय. च्किठच्कप्च असं मेणकागदावर पडल्यावर येतंय. मातीत पडलं की सूरवातीला आवाज येत नही, नंतर येतो. माती ही पोरांच्या डोक्यासारखी असते, पोरांचे डोके जास्त भिजते पोरींचं डोकं कमी. कमी डोकं म्हणजे कमी भिजतंय. कारण पोरींचे डोस्के नाही, केस लांबडे असतात, ऊतार असल्याने पाणी घसरून जातंय. पावूस डोक्यात जात नाही. आता वेणीतल्या एखाद्या केसाचे मूळ शोधणे हे कठीण काम. नवीन- ऋषीचे कूळ आणि वेणीतल्या केसाचे मूळ शोधू नये.  ऊसाच्या पाल्यासारखे मोकळे केस सोडणार्या  पोरी भारी दिसतात. व्हरायटी फक्त 86032सारखी पाहीजे. पोरींचा विचार करायला नको. पावसाचा आवाज. पावसाच्या ठेंबाचा आवाज. पिच्चरात दाखवतात तसं नसतं. पावसाची आई म्हणजे समूद्र, पावसाचा बाप म्हणजे सूर्य. पावसाची बहीण नदी, पावसाचा भाऊ वढा. असं यांच कुटूंब. ढग म्हणजे गर्भाशय. पाऊस नोकरीला शेतात जातो, बादगड संगतीने गटारीत जातो, संस्कार चांगले असतील तर गाय पावसाचे पाणी पिते. हे म्हणजे पुण्याई, गोमूत्र म्हणजे सुवर्णस्वर्ग. पावसाची आई बा काढायला नको. पावसाचा आवाज. पाऊस पाण्यात पडला की टुब्बुक अस आवाज येतंय. मग भाकर्या ऊठत जातात.