पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असंच पायजे ह्यास्नी..!!

मी आठवीला हाय. बाबा मास्तर हाय. मी आदी पप्पा म्हणायचो. पण आता योग्या म्हणटला आमचं पप्पा न म्हणता आमचा बाबा  म्हणायचं. आणि सर नही मास्तर म्हणायच. बाबा अलिकडं लै वांड झालाय. उठलंसुठलं कि वरडतच असतो. मग मम्मी बी वरडत्या. लै मस्ती हाय दोगांना. मी एकटाच हाय. तरी बी आईबा दोघं कायम बोंबलत्यात. काय दारू पिवून आल्यागत बघत्यात. योग्या म्हणटला घरातल्यास्नी मस्ती हायच रे. त्यला एक भवू हाय बारका पाचवीत. त्यो आभ्यास करतोय आणि हे शिवा खातं.  आमचा बाबा दिवसा शाळेत शिकवतोय आणि नंतरनं हिथं माझ्यावर राग काढतोय. नुस्तं वरडतोय. आई बी. नंतर आई मंगळत येत्या.  मग मी बी परवा मस्ती जिरवलीच.  परवा योग्याच वाटदिवस हुतं. मी गेलतो संध्याकाळी. रात्री यायला धा वाजले. बाबा अंगावर आला वरडत. हरामखोर तुला भिताडातंच गाडीन. मला लै वईट वाटून रडायला आलं. मी म्हणटलो मारा. गाडा. बाबानं यिवून ढकलंलं. जा लै शाना हायीस. तणतणत बसला उशेरभर. मी हिकडं यिवुन झोपलो. रडायला आलं. मुसमुसत रडलो मग सलदी झाली शेंबुड आलतं. मग मुसमुस. रडु. एवढंच. मग आई दुध घिवून आली. बाळ पे एवढं. राजा असं करायच नही. पाचदा म्हणटली रट्टा धरून उठवालती.
आमचं पंतप्रधान मोदी स्टेजवर चढलं कि कुणाच्या बा ला ऐकत नही. भारतातली एक हुरुट पोरं हायीत म्हणून जगात सगळीकडं नसत्यात. हे कुठं बी स्टेजवर चढलं कि दहशतवाद चा बोलून सामना करतंय.  आणून आणून त्या बराकला आणला एकदा. ती किती केली तर सुटाबुटातली हिथं ह्या गड्यानं सुट तयार करून घेटला तर त्यावर बी नाव. ते कसतरच गिलावा बिन केलेल्या भिताडावर निरमाची एडवरटाईज रंगवल्यागत दिसलं.  पण त्या बराक ला जाऊन मिठ्ठी मार कुठ भाषनात पावनंपै असल्यागत बराक बराक करत उठला. चारचौघात हे बरं दिसतंय काय ? त्यात रशियाचा आपला पुतिनमामा लै डेंजर. डेंजर मंजे बोलावी तशी चालावी त्याची वंदावी पावले. मामा एकदा ठरवला कि कुणाच्या बापाला ऐकत नसतो. असं वार्रवीस भाषनातंन बोलत नही तो. शांत बसतो. स्विमिंग करुन येतोय आणि कोण काय बोलंलय बघून ग्राउंड लेवलला काटाच काढून ठेवतोय पुतिनमामा.  त्यात त्यंची आपल्याबरोबर लै चांगली मैत्री हुती आगूदर. खरं मोदी ला आगुदर व्हिसा नही म्हणटलीती. पंतप्रधान झाल्यावर दिली म्हणून का काय कुणास ठौक ऊठलं कि आमेरिका गाठलं असं करायलं. साहजिक हाय पुतिनमामाला वाईट वाटणारच.  तिकडं ते बराक सुद्दीच नही आह

मोजणीदार

मोजणीदार माझा दोस्त हाय.मी एकदा त्यच्याबरोबर रान मोजायला गेलतो. नकाशा वगैरे काढणे. टेप धरणे असली कामं त्योच करालता मी फक्त मापं लिवून घ्यालतो. तिथल्या लोकास्नी वाटलं मीच सायेब हाय आणि त्यो कामाला ठेवलेला. मग मलाच सरबत नाष्टा चहा जेवण सगळी हारकून द्यायलती मित्र हसालता. मी पण तावानं सुचना करालतो हां टेप ताणून धरा. चॉकपीट नीट मारा दगडाला चुन्ना मारा.  सगळं झाल्यावर प्रवचन चालु केलो शिवभवती भांडत बसू नका. काय असल ते रानात पिकवा. एका दुसर्या सरीनं काय फरक पडतंय असं. मित्र वैतागलं.  नंतर जाताना म्हणटला तु सगळ्यासनी शानं करून माझी वाट लावणार.  मी त्यच्या समाधानासाठी म्हणटलो, तुला मी पंतप्रधान झालो कि काश्मीर मोजायला पाठवतो.  मग त्यो लै हारकून म्हणटला आगुदर ब्यळगाव मोजतो. 

दिवाळी अंक बायको

सकाळी मी आणि माझी बायकु पेपर वाचतो. म्हणजे एकदम नही.आधी मी किंवा नंतर मी असं. बायकु पेपर वाचत्या. पुरवणी पण वाचत्या. कधीकधी त्यातल्या पाककृती रेसिपी वाचून मला दुकान ला पाठवत्या. नंतर खायला करून देत्या. बरं वाटतंय. मी पण समाधानी हुतो.  आम्ही दोघं राशिभविष्य पण रोज वाचतो. साप्ताहिक राशिभविष्य पण दोघं वाचतो.  मग एकदा माझ्या राशीत विवाह योग लवकरच असं आलं. मझं हिच्यासोबत लग्न झालंय. तरीपण हिला वाटतं मी अनेक करीन. म्हणून मला ही हाफिसला जाऊ देत नही. हाफिसातले चांगले हायीत समजून घेतात. मी परवा रुपेशला ईचारलो तुम्ही पेपर घेता काय ? मग त्यो नही म्हणटला. त्यला वाचावं वाटत नही. एकेकदा पेपर बरोबर शांपु फ्री मिळतो.  हे त्यला महीत नही. बायकु परवा म्हणटली एकाडेक दिवस शांपु फ्री दिला पाहिजे.  नंतर विचारली पेपर खपावं म्हणून ते मालक लोकं शांपु देत्यात काय ओ ? मी पण व्हय म्हणटलं. तिला सांगालो तर लै विचारत्या.  मग ती म्हणटली तुम्ही रोज शांपू फ्रि असणारा पेपर टाकायला लावा.  अग रोज कोण देतील असं तिला समजवायची पण काय सोय नसत्या. म्हणटलं बघू. मला ह्यो पेपर आवडतो कारण बातमी खरी असते. फोटो पण क्लियर येतात. मला