पोस्ट्स

मे, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टाईमपास कसा करावा ?

वेळ ही आत्यंत अनमोल गोष्ट हाय आणि झक मारत ते खरं सुद्धा हाय. तरीपण कायकायवेळेला विनाकारण निराश वाटते. ते आगदी शिवखेरा ची पूस्तक वाचलं तरीबी निराशा जात नही. मला आगूदर शिवखेरा लै आवडायचा. आता ते पुस्तक आणि माहेरची साडी हे मी अत्यंत विनोदी असं वाटून वाचतो बघतो. जीवन गतिमान हाय तिथं आजचं वास्तव उद्याची खिल्ली असत्या. पटत नसलं तर एकदा ईचार करा. त्यातून निराश वाटलं की मी काही ऊपाय योजून काढलो. ते सकाळ ते रात्री झोपेपर्यंत आखंड दिवस कसा टाईमपास करता येईल. हे माझ्या डोशक्यात आलं नव्हतं. सकाळी भल्या पहाटे ऊठावे. आवरावे. आवरताना टाईमपास करू नये. आवरून माॅर्निंग वाॅकला जावावे. सूंदर मुली कमी असतात हे मान्य. पण त्यातल्या त्यात ज्वाला गूट्टासारखी एखादी दिसतेच. तिच्या प्रेमात पडावे. पडले तरी लै लागत नही. जाड पोरी मायाळू असतात. बीपी, शुगर, हार्ट असले प्राॅब्लेम असलेले कैक काका लोक असतात. त्यांच्याबरोबर चालत बोलत जावे. ऊगचच कायवाट्टलं ते इचारावं. सकाळसकाळी त्यास्नी पण कोण बोलायला नसतंय. त्यामुळं ते अधिक बोलत्यात. आणि लांब थापा मारत्यात. ते ऐकायला मज्जा येते. माॅर्निंग वाॅकहून परत येत

नेव्ही

पौसपाणी, वढा, वगळ, नदी, समुद्र ह्या गोष्टी लहान असल्यापसंन लै आवडायच्या. सातवीत पयल्यांदा गणपतपुळ्याचा समुद्र बघिटलो. तिथंन कोकणातले अनेक किनारं हिंडलो, गोव्याचा बीच हिंडलो. दहावी व्हायच्या अगोदर मला नेव्हीत जावं असं सारखं वाटायचं. मी कोणतर माझ्यापेक्षा मोठ्ठं भेटलं की त्याला विचारत हूतो मला नेव्हीत जायला काय करावं लागल ? माझा मामा त्यावेळी एमए ला हुता, त्याला नोकरीसंदर्भ वगैरे महित असायचं. त्यात बारावी नंतर ssbसिलेक्शन बोर्डासाठी असणार्या परिक्षेचं माहिती असायचं. पण ती परिक्षा बारावीनंतर हूती. त्यामुळं झक मारत अकरावी बारावी करणं भागच हूतं. तरीपण एका पेपरात छोट्या जाहिरातीत मर्चंट नेव्हीत जाण्यासाठीची जाहीरात हूती. ते कोल्हापूरला होते. फोन करून विचारलो तर म्हणटले प्रत्यक्ष भेटायला या. मग भेटून आलो. ते म्हणटले अजून वय कमी हाय. मग परत ते विषय काढलो डोक्यातंन. तोपर्यंत हिकडं अकरावीला तीन विषय गेलीत आणि बारावीला दोनच सूटलेत. मराठी आणि इंग्लीश. मराठिला एकाहत्तर मार्क. पीसीएमबी सगळं ऊडलंतं. गावातली सगळीच नापास असल्यानं मला शिवा कमी बसल्या. परत बारावीला बसलो. सूटलो. काॅलेजचा

शहरात काय मेळ नसतंय

शहरात काय मेळ नसतंय. ऊगचच भरलेला भंपकपणा. मोठ्ठीच्या मोठ्ठी बिल्डींग आणि त्यात कोण विचारत नसलेला एक फ्लॅट कुठल्यातर मजल्यावर. सकाळी ऊठून माॅर्निंग वाॅक करून पेपर वाचूपर्यंत दहा वाजतंय. तिथंन गडबडीत शिळं झालेलं माळव्याची भाजी नहीतर पच्चपाणी असलेल्या आमटीची वाटी आणि तेल सोडा टाकून हवा भरलेल्या चपात्या खावून कामावर पळा. तिथं राबून आलं की परत घरात येवून काम. आणि रडक्या सिरीयल बायकूबरोबर बघून पोराचं अभ्यास घेतल्याची नाटकं. मग दमून भागून झोप. ती गर्दी, सिग्नलला वाट बघत बसणं, कधीक धी वाटतयं मधल्या मजल्यावर एक फ्लॅट घेवून पिलरंच पाडून टाकावं. त्यापेक्षा गावात सकाळी ऊठा, गैरमसरांच शेणघाण करा, वैरण आणायचं, आकरी दूधाच चहा प्यायच, नाष्ट्यालाच झुणका भाकरी नहीतर सांजा खायाच. दूपारला रानातंन आलं की गार आंघोळ करायचं. जेवलं की कट्ट्यावर नहीतर आंब्याच्या झाडाखाली जावून झोपायचं. झोपून ऊठलं की परत चहा प्यायला जायचं. संध्याकाळला कुठतर देवळात ते बसून गावाची माप काढायची. कशाला कोण जबाबदार हाय त्यावर चर्चा करायचं. गावातलं मॅटर ऐकत बसायचं. रात्रीला पाणी पाजवायला जायचं. तिथंच रानात झोपायचं. सकाळ