पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
सापाला शेपूट नसते.  ........................................................ हा म्हणटला 'शिकलो असतो तर बरं झालं असतं. मला ज्वाब करावं वाटतंय.' ......................................................... बरीच कामं करायला दोघजण लागतात. जास्त माणसं असली की एक गवंडी आणि धा इंजनेर होत्यात.  ........................................................ राग आल्यावर फ्रेश व्हायला ऐंशी च्या पुढच्या स्पीडनं गाडी पळवावी किंवा वाईस सिटी गेम खेळावा. यापैकी एकच करावे, नहीतर गेम खेळून गाडी पळवला तर लै दूश्मन मरतील. ......................................................... तुला एक सांगू ? .......................................................... चंद्र एकेक दिवस घिरणी लागल्यागत दिसतंय. ......................................................... पवारसायेब कधीच म्हणटले नाहीत 'हे असंच असतंय ह्यला मी काय करू ?' ........................................................

मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!!!!!

मराठी भाषा दिन. लहानपणापासून मराठी भाषा मला लै आवडते. आमच्या घरात कन्नड बोलंल जातंय. ते त्यांच्या त्यांच्यात. मी जन्मलो तस किंवा ज्यावेळी ऐकायला बोलायला यायला लागलं तवापासून माझ्याशी घरातले सगळे मराठी बोलायला लागले. आमचं आज्जा लै भारी माणूस गावात प्रामाणिकपणा काय ते त्यांच्याकडंन शिकायच अस होतं. कार्तिकवारी करायचे पंढरपूरचं. ज्ञानोबा, तुकोबा , जनाबई , पुंडलिक, रामायण, महाभारत, गोरखनाथ मच्छिंद्रनाथ, त्यांचं बालपण ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे.  मुक्ताबाई नं मला रडवलं, ज्ञानोबाच् या समाधीनं तर आज्जांच हात घट्ट पकडायला लावलं, तुकाराम हसवायचा मोक्ष सुखा हाणू लाथा म्हणायचा. आज्जी पूराणातलं मुक्त होवून मोक्ष मिळवायच हे सांगिटली की मला वाटायच काय अर्थ ? मला घाबरायला होत होतं तवा तुकाराम मला लै भारी वाटायचा. जनाबई म्हणटली ' विठ्या मेल्या तूझी रांड रंडकी झाली' देवाला कसं म्हणटली ही ? हे बघून मला जना लैच आवडली. नामदेवानं तर मज्जाच केलती, कापडाला गिर्हाईक नही म्हणून दगडास्नी कापडं घालून आला. नंतर दगडास्नी आणून घरात बांधून घातला. मला बाजारला जाताना हेच आठवत राहिलं अजूनपण. कुस्तीत बाहेरच्या

भारीच वाटल बघा.

रविवारला दूपारी म्हणायच काय सकाळला काय कळना, म्हणजे आकरा वाजल्यावर गूड आफ्टरनून म्हणटलं जातं. त्यामूळ संभ्रामवस्था हूते. असू दे तिकडं. तर त्यादिवशी कोल्हापूरला गेलो. सोनाली नवांगुळ मॅडमांच्याकडं. साडेबाराला त्यांच घर गावलं. शिवाजी पेठेत आहे. दारावर थाप हाणलो तर खूद्द सोनाली मॅडमांनी आमचं स्वागत केलं. तिथनं जे एकटाक आम्ही बोलत बसलो ते संध्याकाळंच सहा वाजल्यावर माझ्या ध्यानात आलं. प्रसन्न काय वाटाव तर तेच. कुठतर एकाठिकाणी असं लिवलेलं असेल आधी || सोनाली नवांगूळ प्रसन्न ||  तर अशी एकदम उत्साह नावाची दांडगी गोष्ट तिथं हाय. मूगाच्या डाळीच भात हा प्रकार इथ पयल्यांदा खायला मिळाला आणि मला नवांगूळ हे नाव दूसरंच कायतर वाटलं.  तिथंन आलो. घरात आल्यावर इंद्रजीत खांबे दादांचा फोन आला. ते म्हणटले सौरभनं बोलवलंय उद्याला तू पण ये. हे इंद्रजीतदादा इथं कोल्हापूरला आठवड्यात एकदा असतात. पण आजतका भेट झाली नव्हती, फोनवर बोललोतो नुस्तं. सोमवारी इंद्रजीतदादा जयसिंगपूरला आले. सौरभ पाटलाकडं जायचं हूतं. डिजिटल दिवाळीला 'झाले मोकळे आकाश' लिहलं होतं. ते माझ्या काही मित्रांना दाखवलंत. ते देखिल भेटायला उत्सुक

poem (तीन चिपट्या घवू गाड्या भरल्या नवू)

लोकं शिकली  शहाणी नाही झाली.  पिएचडी केली. डोनेशन भरून नोकरीला लागली. अच्छे दिन येतील म्हणटली. मोदीला निवडून आणली. भाषनं आवडली. टाळ्या वाजवली. टाळकी तिथंच ठिवून आली. वाॅटसपवर रमली फेसबुकवर गमली जोडी जमली तिथंच भांडत बसली. कुणाला शानं म्हणटली कुणाला खुळं म्हणटली रात्रीला चार्जिंगला लावून सकाळी नोटिफिकेशन बघितली. लोकं शिकली शहाणी नाही झाली तटस्थ राहिली ठिणगी इजली मंत्री माजली ट्रेंड केली जनता बोंबली इथ नको तिथं केली त्यात फसली सगळी हसली (तीन चिपट्या घवू गाड्या भरल्या नवू)
पयलं प्रेम झालं मला ती लै म्हणजे लै आवडायची, आमच्या रानात नानाच्या बांधाला एक इलायचिचाचं झाड हूतं. मी झाडाला कवाच शिवलो नव्हतो. खाली पडलेल्याच चिचा खात हूतो. ती भारी हूती म्हणून तिला कायतर द्यावं वाटायचं. म्हणून इलायचिचा द्यावं वाटलं. खरं खाली पडलेलं कसं दिवु ? म्हणून मी झाडावरंच चडलो. मला भ्या वाटलं नही. चिचा काढून आणलो. मग चेक केलो सगळं एकदा. कुठंतर मुंगी असलं तर तिला काय वाटल ? मग मदा लै कसतर वाटलं.  पिशवीत घाटलो. घरात इचारल्यावर सांगिटलो मॅडमला देतोय. मग घरच्यानी अर्धा किलो गवार्या बी दिल्या.  ते घिवून गेलो. मागच्या साइटला बसलो तासाला. तास झाल्यावर ती राह्यली शेवटला. मग मी मॅडमला गवारी दिलो आणि तिला इलायचिचा. ती तिथंच खाल्ली. बिया आणि टरफाल घाणा घातली. मग म्हणटली गोड आहेत. तोंड भरून राहतंय. मॅडमबी खूश झाली. माझं पुढच्या टेस्टला पयला नंबर आला. दूसरा तिचा आलं.  इलायचिचा तिला आवडल्या. ती मला दोनदा द्राक्षे दिली. नंतर नानाचं ऊस पेटवलं तोड यिना म्हणून त्यात झाड व्हरपाळलं. नंतर त्यला इलायचिचा लागायचं बंद झालं. मी रानात गेलो की वाईट वाटायच. इलायचिचाचं टरफाल गुलाबी. गूलाबाच्या फूलाचा र

choclate day

तिचा Hi म्हणून सकाळी मेसेज आला. मी फोन केलो. ती म्हणटली भेटायला ये.  आणि Happy चाॅकलेट Day म्हणटली.  मग मी दूपारी काॅलेजवर गेलो. येकशेऐंशी रूपयला फाळकूट लागलं.  जावून प्रस्तावणा करतो की नाही तेवढ्यात मास्तर ठपकला.  इस्कूट झाला. दोघी आत गेल्या. पुढं एका मित्राचं लग्न आहे तिथ भेटू म्हणटली. येकशेऐंशी रूपयेची आठवण येत आहे. जे तासभरपुर्वी होते. असूदे आन्नदान हे पुण्यदान !
इमेज
हा म्हणटला काळी असली तरी चालंल खरं बायको समजूतदार पाहिजे. लग्नाअगोदर हा कसा ओळखणार ? तरीपण आपल्या हातात आहे. ती समजूतदार असावी की कशी ते. काय करायचे ?  लग्न झालं की बायकोला घरातंच ठेवणार नाही मी. चल म्हणटलं की तयार होतेच. तिला घेवून लांब निघून जायचं, खूप लांब जिथं सगळंच वेगळं असेल. रस्त्यावर हिंडणारी कुत्री नकोत तिथं, कावळा पण नको, डूक्कर, गाढव, ऊंदीर, वांडरं पण नकोत लाल असतील तर चालतील, पाणी निळं पाहीजे, तळातली मासं सुद्धा दिसली पायजेत. माणसं तर कसल्याच प्रकारची नकोत. शेतं अ सू देतं हिरवीगार, ऊगाच माळरान नको, काट्याची झाडं नकोच त्यात, आंब्याची बहार सूटलेली असू देत, डासपण नको तिथं. ऊगचंच जागेची बेआब्रू करणार्या काचांच्या कवळ्या असलेल्या इमारती पण नकोत. आणि जमिनीचं अस्तित्व झाकून केलेला गूळगूळीत डांबरीचा रस्ताही नको तिथं. लांबवर बघितल्यावर लाल तांबडं दिसणारा रस्ता आणि कुठंच न संपणारा असावा. गाडी चारचाकी, बूलेट, हाॅर्न , इंडिकेटर, बझर, कुंईकुंई काहीच नको. म्हणजे गाडी नको आणि सायकल पण नको. आणि हिल्सवाल्या किंवा लाईटवेटवाल्या चपला पण नकोत. तसं तुम्ही पोरकंच असता आणि पाय अनवानी असल्याच द
माझं पोरगं साव्वीला हाय. एकटंच हाय. म्हणजे मला एकच पोरगं हाय. काल रातरी जेवताना शुभ्या त्वांड बारिक करून बसलंतं. मला वाटलं हिचं आणि त्यचं कायतर ख्यानपिन्नं झालंय. म्हणून लै काय वाटलं नही मला. मी बेतानं जेवलो आणि पाणी लावाय गेलो. पाणी लवून यायलतो तर येमेटी बंद पडलं, च्वाक लवून बघिटलो तरीबी चालू हूईना. आत्तरहिच्याबायली ! म्हणटलो आणि ढकलत आणलो. शुभ्याचं बेणं कुठतर फिरवून आणलं अशील आणि त्याल सपलेलं बघून लावलं अशील. आलिकडं जरा बिघडंलय, दात लावल्यागत करालंय. काय करायचं म्हणा.  तर मला यायला साडेआकरा वाजलं. सोप्यातलं लैट चालूच हूतं. यिवून दार उघडलो तर शुभ्या अभ्यास करत बसलंतं. माझं मलाच वईट वाटलं. पोरगं चांगल हाय, अभ्यास बी करतंय. मीच म्हणटलो, झोप आत्ता सकाळी लवकर ऊठून कर आभ्यास. आत्ता करून काय ध्यानात र्हात नही.  ते म्हणटलं, नही पप्पा गृहपाटची वही पुर्ण करायची हाय.  सकाळी ऊठून कुठं नांगर वढायला जाणार हायीस काय ?  ते परत म्हणटलं, तुमी झोपा जावा.  मी लै विषय वाढवलो नही. थंड वाजालती. बायकू घोरत पडलीती. मग मी बी पडलो.  खरं झोप काय लागीनाच. ऊगचच पोरगं आटवालं तोंडाफूडं.  नंतर कवातर झोपलो. सकाळी उट

बारावी नापास झाल्यावर आंडरवर्ल्ड डाॅन व्हावं असं वाटलंतं.

बारावी नापास झाल्यावर आंडरवर्ल्ड डाॅन व्हावं असं वाटलंतं.  ................................................. मुंगीचं डोळं कसलं असत्यात हे बर्याच लोकांना माहित नसतं.  .................................................. भारी पोरगी दिसली म्हणून एॅड्रेस विचारलो तर ती म्हणटली तूला पाहिजेत ते माझेच पप्पा आहेत की. मला उगचच अंगलटकला आल्यागत वाटलं. आणि वरनं बिनसाखरेचा चहा दिली. तिच्या पप्पाबरोबर बोलणं झालं. जाताना तिला म्हणटलो चहा भारी केल्यास की. ती म्हणटली तूला तस्संच पाहिजे ! ................................................. ऊस संपत आला की बाजारातले भाजीपाल्याचे दर पडायला चालू होतात. .................................................. हा रस्ता चुकला होता. कुठं वळायच कळना ह्याला. मग एकानं सांगितलं, तिथं कोपर्यावर एक कुत्र्याचं पिल्लू पडलंय तिथून जा. हा तिथून गेला. .................................................. रात्रीत एखाद्या मूरमाट रस्त्यावर बैलगाडी जात असताना. गाडीवान गप्पच बसतो. ................................................. बारावी सायन्स केलेल्या पोरी दोन वर्षे बीएस्सी करतात आणि सुट

डिक्शनेरी वाचायला भारी वाटतंय. grin emoticon

मला एक घाण सवय आहे. अलिकडं वाढल्या म्हणा. माझे बरेच चांगले मित्र मला पुस्तकं देत्यात. काहीजण इंग्लीश देत्यात पूस्तकं. मग काय हूतंय की एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नाही. मग माझ्याकडं एक ऑक्सफर्ड डिक्शनरी हाय. त्यात मी अर्थ शोधायला जातो.  पायजे ते सापडलं की मग मी दोनवेळा अर्थ समजून घेतो. हे आक्सफर्डवाले बरं वाटत्यात शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखवत्यात. मग जरा समजायला बरं पडतं. पण माझी एक सवय पडल्या लहानपणापासून. कुठल्यातर शब्दाच अर्थ शोधायला जातो आणि तिथंच जावून बसतो.  उदाहरणार्थ . Elegant हा शब्द हूडकत गेलो. हा शब्द मज्जा आणतो. इलिगंट, एलिगांट, इलिजान्ट असं मी उच्चार करून बघत बसतो. मूळ उच्चार एलिगंट असाच असावा. आता त्याचे अर्थ बघा मोहक शैली किंवा आकार असणारे; सूरेख, डौलदार, शानदार वाक्यात उपयोग 'She looked very Elegant in her new black dress' हे वाचलं की मनात परत विचार चालू होतात. ती काळ्या कपड्यात मोहक दिसते. दिसली असेल का ? नही म्हणटलं तरी सावळ्या पोरीना काळी कपडे चांगली दिसत नहीतंच. मग ती गोरी असेल असं वाटतं. आपल्याकडं कॅटरिना ज्वाला गुट्टा काळ्या कापडात भारी दिसतात. सावळ्या प

माझं एक अकाऊंट काढून द्या की !

जिल्हा मध्यवर्ती बँकंत हा जातो.  सायेब नमस्कार !  पाटील सायेब या या. बसा खुर्चीवर ! काय खुर्ची खुर्ची ? खुर्ची म्हणत्यात व्हय ह्यला ?  मग काय म्हणत्यात ?  आसू दे आता. बरं, काम असलं की थोरले पाटील येतात. आज तुमी कसं काय इकडं ? चवक्कशी ! कसली ओ ? (फोन खिशातंन काढत.) त्ये काल बघा, ये .बी. पी माझा वर सांगत हूतीत, फेसबूकवर लायकी आसलं की कर्ज देत्यात. ते ते त्याला वेळ आहे अजून. ते अजून विचाराधीन आहे. काय बी सांगता राव, आसं कूठं आसतंय का ? अहो पाटील. त्याला अजून मंजूरी मिळायची आहे. आणि तुम्ही कुठं आलाय ? कुठं आलाय मंजे काय ? निवू काय यफड्या काढून. ? नाही नाही, मला म्हणायचं होतं की नॅश्नलाईज बँकेत विचारा. आता ते आणि कोणचं ? एस.बी.आय ला जावा. यस्सबीआय ? काय राव, ह्यला काय आर्थ ? म्हणजे ? ते तिथंच चालु होतंय ना. आहो. चालु हू दे. त्यो विषय नही. मग ? काय प्राॅब्लेम ? प्राबलेम मंजे, तूमी तेवढंच इंगलीश बोलता. खरं तितली मॅनेजरबई पार्बलेम हूईल इतकं इंग्लीश बोलत्या. तुम्ही पण बोलायच मग. बोललोय राव. झेरो ब्यालन्स ला येटीम नही म्हणटली, पाचशे भरा म्हणत्या. मग बघा पाटील, आपल्या तर बँकेला हे एटीमसुद्धा नाह
रातकिडं, डास, भोंगं, पाल, बेडक्या रात्रीच बोलतात. कायतर चालंय त्यांच. डास फार जोरात, न श्वास घेता बोलतो. एवढ्यावरून अंदाजे वाटतंय डास चिडलंय. आणि आत्महत्या करतो म्हणून घरात सांगून आलंय. माणसं रेल्वेखाली पडतात. पोहायला न येणारी विहीरीत पडतात आणि मरतात. तसंच डासं पण रागानं सांगून येत असतील, आज मी माणसाकडं जातो आणि मरतो. डासांच्या आत्महत्येच ठिकाण माणूस असावं. सगळ्यांच ऐकाव वाटतंय.
स्वप्नांची कितीतर स्क्रीनशाॅट सेव्ह केल्यात.
पुढंनं ऊजेड पडला डोळ्यावर, खड्ड्यात पडलो  (रात्रीला गाॅगल कोण घालतो ?)  तूला वाटतंय तूझं सगळं बरोबर आहे,  मी स्वतःला खोडून घेत असतो.  ‪#‎ सावध‬  कोण आहे ?

प्रपोज डे

तिच्यावर आधी एकदा हा ट्राय करून बसला होता. खरं प्रपोज केला नव्हता. नंतर दोन वर्षं कुठंच संपर्क आला नही. आलातर ती कुठेतर जाताना आणि हा कुठंतरी काॅलेज ला जात असताना. एसटीत च नजरानजर व्हायची. एसटीत दंगा खूप. आत्ता पोरं शानी झाल्यात. दोन वर्षामागं च्यायना मोबाईलवर गाणं लावायची, कंडेक्टर शिवा द्यायचा. त्यात ती तर रिकामी शीट हाय म्हणून शेजारी बसायचं धाडस करणार्यातली नव्हतीच. अशी ही दोन वर्ष गेली. त्यानंतरच्या डिसेंबर महिन्यात सगळ्यांच्याकडंच व्हाटसप आलते.  एका मैत्रीणीनं ग्रुप तयार केला. ह्याचा नंबर तिच्याकडं होता आणि तिचाही. ह्या दोघांना तिनं त्या ग्रुपवर अॅड केलं. मग ग्रुपवर नूस्ता धुरळा उठायचा. ती आणि हा दोघंच चॅटींग करताहेत असं ग्रुप मेंबराना वाटायचं. मग हळू हळू खटके उडले आणि सगळ्यात आगूदर हा ग्रुपातंन बाहेर पडला. संध्याकाळी पाच वाजलेते. तो एकच ग्रुप होता. जिथं हा रमायचा, त्यातंन बाहेर पडलं म्हणून ह्याला कसतंर वाटलं. मोबाईल टाकला आणि संध्याकाळचंच झोपून टाकला. ती सुद्धा ग्रुप सोडेल. आणि आपल्याला पर्सनल मेसेज करेल असं ह्याला वाटत राहीलं. असं वाटणं भारी असतं. कधीतर राग यायचा. पण ती मेसेज क

Babyachi diary

इमेज

poem

एकदा ये अशी फूल्ल व्होल्टेजनं, आणि ऊडव माझ्या डीपीच्या फिजा !!! निघू दे धूर, हू दे अंधार !!! smile emoticon

लांब किरकिरत असणार्या रातकिड्यानी रात्र अजून भारी वाटते.

लांब किरकिरत असणार्या रातकिड्यानी रात्र अजून भारी वाटते.  .................................................. Cute ऊंदीर असतात. इनबाॅक्सात येवून क्यूट दिसतोस म्हणटलेल्या पोरींचा निषेध !  .................................................. अजून संशोधन करून नवीन गोष्टी तयार करावं वाटत आहे. ................................................... बोर मारल्यावर त्या पाण्यात मासे असतील का ? असा एकदा प्रश्न पडलाता. बर्याचजणाना विचारलो खरं नहीच म्हणटलीत. मग मीच एकदा वड्यातंन मासं धरून आणून बोरमध्ये टाकलोतो. काय झालं अशील कुणास ठवूक ? लगेच मेली नसतील. ................................................... देवराष्ट्रमधल्या येशवंतराव चव्हाणांच्या घरात आज जावून आलो. अभिप्रायची वही होती. काय लिवायचं त्यात ? ........ ................................................. यष्टीच पास पंच करताना मास्तर लोक हारखत्यात. .................................................. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ हे तीन नसून आणखीही काळाचे प्रकार आहेत. उदा. अवकाळ. .................................................. मेणबत्ती पाघळते. प

एकूणसत्तर वर्षाचा हाय मी.

एकूणसत्तर वर्षाचा हाय मी. देश स्वतंत्र करूनच जल्मलो. म्हणजे वय झालं म्हणाच की माझं. चारटर्म गावची सरपंचकी हाणली, गाव हागणदारीमूक्त केलो, मग मलाच वार्डातल्या शाण्याटक्कूर्याच्यानी मूक्त केलं. इस वर्षं म्हणजे काय च्येष्ठा नही. यकदा झेडपीच बी तिकीट गावलं राह्यलो खरं निवडूण आलो नही. गावातली जंता चांगली हाय. शेजारच्या गावातल्यासनी आक्कल नही म्हणा. मंजे आसं झालं ते म्हणत्यात कणी, पहिला पंत, दूसरा हानूमंत आणि तिसरा ह्याच्यातला जंत. तसं मद्दान पडलं बघा. आणि आविष्याला ऊट्ट लागला. नहीत र आमदार झालो आसतो. हालसिद्दाप्पाला बी कवाल लावलंत. ऊजव दिलतं. आता पत्रक वाचतोय, चाळशी लागल्या, मालकीन कवातर तांदूळ नीट करताना चाळशी घेत्या. कुठं ठेवत्या कळत नही. एकेकदा गावत नही. राग येतूय. दोनदा अटक आलंय. काय ह्यच्याआयला, गावातलं गायरान इकलो तर कुणाची हिम्मत झालं नही अटक करायची. खरं अटक आलं. पोरगं मंबईला हाय. बहीरच्या जातीतली पोरगी करून घेटलंय. आमचा बा माळावर मारून घातला आसता आसं बट्टा लावलो आस्तो तर. नही म्हणटलं तरीबी मला खानविलकर सायबाची पोरगी आवडायची. दोनदा जीपातंन फिरवून आणलोय तिला. डीयसपी खानविलकर म्हणजे लै

बघा हं तुम्हाला पटतंय का ते.

बघा हं तुम्हाला पटतंय का ते.  समुद्रातच सगळ्यात जास्त पाणी असतं. त्याचीच वाफ होते आणि नंतर पाऊसरूपी परत आपल्याला मिळतंय. समूद्राचं पाणी सोडून इतर ठिकाणची पाण्याच्या साठ्याचं पावसात फक्त 4ते 5% योगदान. त्यामूळं तुर्तास त्याकडं दूर्लक्ष करू.  आता पावसाचं प्रमाण लै कमी आहे. दूष्काळच म्हणा की. त्याप्रसंगी, समुद्रातल्या पाण्याला आग लावून किंवा इतर पद्धतीनं त्याची कशी जास्तीत जास्त वाफ होईल याकडं लक्ष दिलं तर पाऊस चिक्कार पडेल असं वाटतंय. हे मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे तवा कुठतर पाऊस जास्त पडलं. हा ऊपाय होवू शकतो का ?

पाणी पाजवाय जाताना हे आठवतंयच.

ही गोष्ट चारवर्षामागची आहे. अशाच एका हिवाळ्यातल्या सकाळपारी, चूलतचूलतभावाला चहा द्यायला गेलतो. तो गावात राहतो. आम्ही मळ्यात. मग तो रात्री पाणी पाजवायला आला कि चहा नाष्टा वगैरे आमच्या घरातंन देतो. त्यादिवशी त्याला चहा देवून घराकडं येत होतो. तर एकदम रडण्याचा आवाज आला. मी घाबरलो, घरातंन बाहेर पडून पंधरा मिनटंच झालती. सगळं ठीक होतं येताना आणि एकदम रडण्याचा आवाज. तरीपण बघितल्यावर काय ते खरं कळलं म्हणून गेलो. घरात गेलो तर गावातली एक बाई कुडकूडत रडत होती, धाप भरलाता. काय सांगायला प ण येईना. बापा गावाकडं दूध घालयला गेलते. भाऊ अभ्यास करायला बसलाता. मम्मी तिच्याजवळ थांबून काय झालंय ते सांगा ? म्हणेन विचारत होती. मम्मीच्या माहेरातल्या घराजवळची ही बाई. नंतर लक्षात आलं, आमच्या वरच्या पट्टीकडच्या पलिकडंच रान त्यानी करायला घेतलंत. थोडं शांत झाल्यावर सांगितली. आमचं त्यनी कुठं दिसनात. सगळ ऊस हूडकलो. पहाटं चारंला गायप झाल्यात. मला ऊसात जायला भ्या वाटाल्या. असं ऐकलं की कुणालापण धक्का बसतोच. मला पण बसला. शेजारपाजारी पण कोण नव्हते. कुठतरं विशाळगडला जाणार होते, त्यांना बोलवायला जाणं बरं वाटलं नही. मीच म्हण

English langauge is very ........................

I am science student, thatswhy i know importance of English langauge. When i am in third year, she studying in second year. she said me, 'from tommarow, we will speak in English !' I said 'yeah' We thought that our english will improve. I thought she is cleverer than me. This is perfect time. Then, next day in college. I waiting for her. she entered in the campus. I am going to joyfully her direction. And in the joy i asked her 'what what ?' Her friends are laughing, and she went with anger nose and face. I feared. Whats going wrong with her ? Then i went in canteen and orderd cup of tea and thinking what i said her ? Then i realise, she is looking beautiful today. She weared jeans and top. Oh shittt shitttt ! I said that what what ? and she listened hot hot !!! Thatswhy her friends are laughing on her. Thatswhy she is angry. Then in recess timing. I went and meet her and asked you remember yesterday ? 'What yesterday ???' 'We talked about English
मी बत्तीस वर्षाचा आहे. कालच्या 2 जानेवारीला मला बत्तीस वर्ष पुर्ण झाले. माझे वय वाढत चालले आहे. सगळ्यांचेच वय वाढते आणि माणूस कधी तर मरून जातो. कोणतर कितीतर जगतात, ते कसे वागले कसे वावरले यावरून त्याचे माप काढतात. लोकांना काम नसते ते मापं काढतात. ह्याने काय केलं, त्याने काय केलं, असे पॅरॅमीटर असतात. मला वाटते आपन जगून घेतले पाहिजे. कसे जगावे ?  झोपलेला माणूस जगत असतो का ? नाही. आपन निद्रिस्त असतो तेव्हां काही कृती करत नसतो. फक्त स्वप्ने पडली तर बघने एवढंच कृती असते. मला स्वप ्ने कधीतर पडतात. तुळी खाली झोपल्यास पडतात. काही लोक तुळीला तुळई म्हणतात आणि सळीला सळई म्हणतात. ई प्रत्यय जोडण्याचे काय काम असेल ? असू दे. अलिकडे स्वप्ने चांगली पडत नाहीत. परवा केळी सोलल्यावर रताळ बाहेर पडलं. तर प्रत्यक्षात असं झालं की माझ्या गाडीखाली साप येवून मेला आणि घरात वांग्याची भाजी ! मला जेवन गेले नाही. निद्रीस्त असलेली वेळ आयुष्यात धरावी की नाही यात मी साशंक आहे. आत्ता बत्तीसाव्या वर्षात कुठंतर बत्ती लावली पाहिजे असं वाटतंय. काय करू ? मी काॅम्प्युटर इंजिनयर आहे. कसं काय करू ? मला बावीस हजार पगार आहे. त्यात

डाॅक्टरांच्या गोष्टी.

चवथीला असताना आन्या मानेला पायात पाय घालून पाडलोतो. त्यचा गूडगा फूटला. मग आम्ही चारजण हून त्यला दवाखान्याला नेलं. आमच्या गावात एक डाक्टर आहे, त्यो आधी कमपाऊंडर हूता. त्यांच्याकडं कुठलीच पदवी नाही. तरीबी त्यचा गुण येतोय असं गाव म्हणतंय. आन्याला नेलो तर स्पिरिट ऊजव्या हाताला चोळला आणि इंजेक्शन डाव्या हाताला दिला. ..................................................... शाळेत दोन वर्षातंन एकदा धनूर्वातंच इंजेक्शन द्यायला एक बाई यायची. ती ह्यकनी हूती. कंबरंतच  इंजेक्शन द्यायची. गडबडगडबड करत पुढं व्हायचो आणि बिनइंजेक्शन घेता चड्डी चोळत वर्गाबाहेर पडायचो. एकदा मास्तरंन धरलं. कुठ चाललायस ? म्हणटला. मी म्हणटलो आऊट आलंय बर्फ लावायला. परत धरून मला वर्गात नेला आणि इंजेक्शन केला. ................................................... मी जन्मल्यावर लगेच माझं तिसर्या महिन्यात हरण्याचं ऑपरेशन झालं होतं. मला त्यातलं काहीच आठवत नाही. घरच्यांना सगळं आठवतं. ................................................... एकदा दाढवाणला पैण उटलंत. आज्जी पैण लिवायची. तिनं पैण लिवलीती पण कमी झालं नही. मग सांगलीच्या शहा डाॅ
इमेज
/my facebook post in daily Agrowon

तिनं डोक्यावरंचा पदर नाकापर्यंत खाली केला.

आज त्यची बायकू माहेरास्नं आली होती. लग्नानंतर पाच दिवस इकडं राहून परत माहेराला जावून पंधरा दिवस झालते. त्यानंतर पहिल्यांदाच तिला तो पाहत होता. ती सकाळी दहा वाजता आली. लाडूचिवडा फराळ आणि आह्यारमाह्यार घेवून. त्यानंतर दोन तास इकडेतिकडे असेच गेले. मग घरचे दोनचारजण आणि हे दोघे नवराबायको मिळून देवदर्शनाला गेले. कुलदैवत वगैरे जवळ होतं तासाच्या अंतरावर. असं दोनतीन तास गेले. कुठल्या देवाला जाईल तिथंला पुजारी उपरण्याला आणि साडीला गाठ मारायचा आणि प्रदक्षिणा माराय लावायचा. तश्या प्रदक्ष िणा झाल्या. परत सगळी घरी आली. संध्याकाळंच शेजारपाजारी लोकं घरी येवू लागली. ते येतातच. प्रत्येकजणाला फराळ देत देत हासुद्धा खात होता. गावातल्या दोस्तास्नी कळलं. हा देवाला जावून आलाय, म्हणजे आज पह्यलि रात्र. हा कलंदर कुणाचीही पह्यली रात्र सूखासूखी जावू द्यायचा नाही. फटाकड्या लावायचा, कुत्र्याचं बारकं पिल्लू निवून त्यांच्या दाराला बांधून यायचा. आज सगळी ती लोक बदला घेणार होतीच. रात्र झाली. साडेदहा वाजले. फटाकड्याची लड लागली, बायकू अजून आली नव्हती. ह्याला फोन आलीत. विचारले, काय ? आत्ता कसं वाटतंय ? हा म्हणटला, अजून कशा

अमेरिकेतली लोकं मावा खात असतील का ?

बर्याच सुंदर मुली हूशार नसतात आणि त्यांना शेवटला काळा, केसं पिकलेला, टकला नवरा मिळतो. ...................................................... आता संध्याकाळला थंडी संपून जे वारं सुटतं ते कसलं भारी असतंय ! ऊधळून घ्याव वाटतंय स्वतःला.  ....................................................... ऊगंच डाळीच्या किमंती वाढल्यात्या म्हणूनंच शेतमालाला दर चांगला होता. ....................................................... बर्याच लोकांना प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ते माहितंच नसतं. .................................................... अमेरिकेतली लोकं मावा खात असतील का ? ..................................................... आंब्याच्या झाडाला बहार सुटतोय आणि त्याच झाडावर कुठतर मधाचा पोळा असतंय ते काढायच आणि मध प्यायच. जब्राट टेश्ट. .................................................... फ्रान्सच्या गड्याला हिकडं ऊसाचं फड तोडायला आणलं पाहिजे. ...................................................... काही लोकं अंथरूणातसूद्धा मोबाईल घेवून झोपतात. ................................................... झोपेत परवा भाष

प्लॅस्टीक युग

ही गोष्ट सुमारे पावनेतीन हजार वर्षानंतरची आहे. म्हणजे आपलं हे सगळं जग परत एकदा गूडूप होवून. नव्यानं आणि जीवसृष्टी वरती तयार झालेली असलं. मग ती लोकंही प्रगती करतील. त्यांनाही ईतिहास वगैरे गोष्टींचा शोध घ्यावा वाटला. मग त्यांनी उत्खनन केलं. उत्खन करत करत असताना ते कनफ्युज झाले. मानवाचे सांगाडे काही ठिकानी गावले. काही देह हे प्लॅस्टीक सर्जरी केलेले सापडले. ते बघून ते परत गोंधळले. त्यांना कळंनासं झालं की हाडं प्लॅस्टीकची असतात की काय अशा प्रश्नात ते पडले. त्यावरून त्यांच्यात मतभेद झाले.  बर्याच सांगाड्यांच्या हाती आयताकृती प्लॅस्टीक सामान गावलं. ते खरतर मोबाईल होते. काहीजण सेल्फी काढतानाच गाडले गेले होते. त्यावरून अनेक कथा त्या काळात तयार झाल्या. एका खेडेगावात उत्खनन झालं तिथं, टमरेल, पॅरेशुटच डबा, कंगवा, बुट प्लॅस्टीकंच बारडी इ सामान आढळलं.  त्यानंतर पावणेतीनहजार वर्षानंतरचे लोक आपल्या युगाला प्लॅस्टीक युग म्हणू लागले.

माणसांची आर्थिक किंमत करावी असे वाटत आहे.

माणसांची आर्थिक किंमत करावी असे वाटत आहे.  बालपण काय राजपण तरूणपण काय हारूपण म्हातारपण काय कुत्तरपण  अशे म्हणतात. कशे करावे ?  बालपणात नाॅर्मल जन्मलेले हे गरीब असतात, शिजरन हून जन्मलेले श्रीमंत धरावे का ? रिमोट कंट्रोलच्या, ईलेक्ट्रानिक, मोटर आसलेल्या, किंवा चल छयां छयांच्या खेळण्या असणारे असे श्रीमंत वाटत होते. पण आलिकडे आईबाबाचे फोटो किंवा व्हिडीओ शुटींग करणारे बारके पोरगे पोरगी बघून ओरिझनल मोबाईल वाले श्रीमंत वाटत आहेत. इंग्लीश मेडमचे पोरं श्रीमंत, शेमी इंग्रज मध्यमवर्ग, तर मराठी माध्यम गरीब अशे समिकरण जूळवत होतो. पण ते फार काळ टिकले नाही. आंगठाछाप आप्प्याने आपलं पोरगं इंग्लीश मेडमला घातलं. रोज त्यची बायकू पाठीला शॅक आडकवून पोराला सोडायला जाते बसपर्यंत. तर दिल्लीला इंजनेर असणार्याने आपलं पोरगं गावातल्या मराठी शाळेत घातलं आणि वरनं पंचवीस हजार शाळेस दिले. हायस्कूलात मास्तर समिकरण जूळवत होते. मोठेपणी कोण शिरमंत होईल. हूशारं पोरं शिरमंत होतील असे त्यांना वाटलेते. पण नंतरनं आयट्या केलेली पोरं शिरमंत झाली. आर्टस, काॅमर्स सायन्स चे तशेच झाले आनुक्रमे गरीब मध्यमवर्गिय शिरमंत. आमच्या हिकडं

त्यांना कोपर्यात घेवून भारतरत्न दिला पाहीजे.

हाॅटसपवर नवीन आलं की लोक त्याला संभाळून घेतात आणि प्रोत्साहन देतात. हे बाकि कुठं बघायला मिळत नाही. दिवसाला चारदा डीपी बदलणे सूरू होते. आणि त्याचबरोबर स्टेटस सुद्धा बदलले जातात.  म्हणजे सकाळी काॅफीचा मग आणि स्टेटस गुड माॅर्निंग. दूपारी कुठतर चांगल्या माॅलमध्ये काढलेला फोटो. आणि स्टेटस गूड आफ्टरनुन नाऊ बिझि इन वर्क.  तिन्हीसांजला सुर्य बूडतानचा फोटो आणि स्टेटस गुड ईव्हनींग नाऊ फ्री फ्राॅम वर्क वगैरे. असे दोनचार महिने जातात. मग नंतर त्याच त्याच गोष्टीचा कंटाळ येतो.  त्यातंच कोणतर काय मटरेल असलं तर पाठव की ल्यका. असे मेसेज पाठवतात. ग्रुपवर चॅटींग चालू असताना कोणतर एखादी पोरगी मेसेज टाकली की ग्रुप बोंबलला पर्सनल चॅटींग चालू. मग पोरगीची तारिफ वाॅव हाऊ नाईस डीपी.! तिचे शाॅर्टफाॅर्म रिप्लाय 10x ह्यला कळायच बंद हूतंय. काय ते ? मग ति थँक्स म्हणते. व्हाटसपवर पायजे त्या स्मायल्या येत्यात. कधीकधी लाल दिल चावलेली कींवा बूबळाच्या ठिकाणी दिल असलेली स्मायली पोराला येडं करून टाकते. बराच वेळ असं गेल्यावर सामाजिक ग्रूपवर एड केल जातं. मग परत बोंब. अशे ग्रूपमेंबर लै डेंजर. हे एक टायपू पर्यंत दहामेसेज येतात

'यिकडे नोडर्य'

सकाळी इचलकरंजीला बाजारला गेलतो. माझं सगळं माल ईकून चहाच्या गाड्यावर तिथंच चहा प्यायलतो. तेवढ्यात दोन बारकी पोरं दिसली. दोघांच्या हातात पिशव्या. मला कळंना झालं एवढ्या बारक्या पोरास्नी ईचलकरंजीवाले बाजारला लावून देत असतील का ? गाड्यावरंन त्यंच्या जवळ गेलो. तर ती दोघं कन्नड बोलत होते. मग मी पण कन्नड बोलत बोलत त्यांच्यात सहभागी झालो. दोघांच्या पिशव्या बघितलो तर माल गच्च भरलेला. किमान दीडशे रूपयेच माल. नंतर मला सांगितली 'तूडगं माड्य व्हडीतंव यल्ला' म्हणजे चोरीचा माल. मला वळखल होतं. मी म्हणटलं 'नंग बी कलस्रल्या' मला बी शिकवा.  'यिकडे नोडर्य' बघा म्हणटले. बघितलो तर त्यातला एकटा पुढच्या बाजून एका व्यापार्याजवळ गेला आणि रेट चवकशी करायला लागला. मागंन एकटा गेला आणि फ्लावरंची चार गड्डं ऊचलून पिशवीत घातला. पूढचा म्हणटला परवडत नाही आणि सूटला. नंतर आम्ही तिघं चहाच्या गाड्यावर गेलो. दोघानां चहा पाजवलो. खूश झाली पोरं. सातवीला हायीत दोघं.

मी आंगठाबाद्दूर हाय.

मी आंगठाबाद्दूर हाय. मला सत्येचाळीस वरसं झाल्यात. जल्मतारीख शाळतंल्या दाखल्यावर येक जून हाय. आय म्हणटली तू दिवाळीसरून पांडवपचमीला जल्मलास. माझ्या आयीवर माझं इश्वास हाय. परवा म्हणटली तूला वल्लं चटणी कांडून देतो. लगेच दिलीबी. म्हणून आयीवर माझा ईश्वास हाय. तात्या पण म्हणटलाता तू दिवाळं काढूनंच जल्मलायस. त्यामूळं मी पांडवपचमीलाच जल्मलो अशीन असं वाटालंय.  आवंदाला काय मेळ नही. पऊस कमी पडलाय. बायकू म्हणटली एक रेडकू पाळूया. आता नही म्हणटलं तरीबी रेडी मोठ्ठी व्हायला तीन वर्सं लागतात.  त्यात पुढं जवून गाब गेली तर बरं नहीतर ग्व्वाड लागली की कापायला. वयीट वाटतंय. मूक्या जनावरंच. माझी बायकू ऐदी हाय. ती चवथी शिकल्या. तिला वाचायला येतंय. मला येत नही. शनवारी मी दूकानला जातो त्यायेळला चिठ्ठी लिवून देत्या. मी जवून बाजार घिवून येतोय. परवा ढासाचं क्वाईल लिवायच ते मच्छर लिकविड लिवली. मग दूकानदारनं दोन पिन असलेलं येक टकूचं आणि खाली बाटली दिली. घरात पिन घालायला बटनाचं सांगाडं नही. गोठ्यात हाय. दोन दिवस गोठ्यातंच लावलो. मग वायरमान ला बोलवून आणून बोर्ड तयार करून घेटलो. हे सगळं करताना मला वाटलं नाल गावलं म्हणू