म्हणजे मी काय अजून हे.. च हाय होय ?

पाकिस्तान वर ऊसाचं चगळा टाकायचं आणि पेटवून द्यायचं असं बारकं असताना वाटत होतं. 
.................................................
कोणतर दूसरीत असताना सांगिटलतं, अमेरिकेत भिकारी चारचाकीतंन हिंडतात. आत्ता खरं वाटतंय. भिकार्यांची व्याख्या व्यापक व्हायला हवी.
..................................................
समूद्रातल्या पाण्याचा योग्य वापर करायला हवं.
..................................................
पृथ्वी गोल हाय, मग काय करायचं माहित हाय का ? सहजच परवा वाटलं. मग मी परवा वर्ल्ड मॅप काढून बघितलो. मधोमध आफ्रिका खंड येतंय. तिथं जायाचं आणि डबरा पाडायचं लै म्हणजे लै खोल पाडायचं एकदा तर आरपार हूईल असं म्हणजे दूसर्या बाजूला जायाचं झालं की त्या डबर्यातंन जायचं. परवा एवढं रमून गेलो या खड्डा पाडायच्या विचारात आखंड रात्र झोपंच लागलं नही. खरं तर आफ्रिका वाल्यासनी हे कळायला हवं.
.....................................................
किशोरी आमोनकर रडकं गाणं गात्या. तिच्यापेक्षा बेगम परवीन सुलतानाला ऐका नुस्तं ऊचलून फेकत्या. वा वा ! करशीला. मी गेलो दोनवेळला आणि संगीताचा तास बंद पडला आत्ता विठ्याकडंन गिटारंच शिकतो. आण्णाप कडं हलगी शिकायला गेलो तर त्यनं लेझीम शिकवलं.
....................................................
कोणतरं वुडलॅन्डंच किंवा रेडचिफचं बुट घातलं की त्या बुटात वाळू टाकायची अवदसा सूचते.
...................................................
ऑरपॅटच्या ऊजेडापेक्षा (म्हणजे पांढर्या बलाच्या) साठच्या बलाच्या ऊजेडात कायपण वाचायला मज्जा येते.
...................................................
कोशिंबीर आणि मठ्ठा जाणून बुजून कमी वाडणार्या वाडप्याला ऊसाच्या बूडक्यानं मारावं असं वाटतं.
....................................................
पोरी नको तिथंच हसतात.
...................................................
हा म्हणटला नवाज शरीफ पण कोट घालतोय की.
....................................................
परवा पाव्हण्यांच्या म्हातारीचं पाया पडालतो आणि आशिर्वाद देताना म्हणटली, शाना हो बाळा !
म्हणजे मी काय अजून हे.. च हाय होय ?
.................................

टिप्पण्या

अमर म्हणाले…
लै हसलो भारी लिवतो गड्या तू.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं