पोस्ट्स

डिसेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेम सेलीब्रेट केलं पिंट्यानं !

ती दिसायला भारीच होती. पिंट्याला ती आवडायची. पण पिंट्या कधी बोलला नव्हता तिला. म्हणजे धाडस झालं नाही किंवा आणखीही काय काय. तिचा फोन नंबर होता सगळ सगळ बोलनं चालणं होतं.  थोड्या दिवसानं तिची लक्षनं काय मापात बसना झाली. म्हणजे कुणाबरोबर तर हिचं चालू झालं. मग पिंट्या बैचेन झाला, रात्र बेकार चालली, डोस्कं फिरलं. कधीकधी रडू लागला तिच्यासाठी. आधी ह्याला ब्रेकप पार्टी गाणं आवडायचं. आता ते पण आवडना. कशातंच मन रमंना. काय करायचं ?  दोनचार दिवस आठवडा असा भिकार गेला. काय इचारू नये एवढा. काॅलेजला दांडका लावला. रोज मित्रं पिडवायला लागली फोन लावून लावून.  सोमवारी गेला. दोन लेक्चर अटेंड केला. पोरास्नी भेटला, काय नही रे ऊसाच्या कांडक्या गोळा करालतो असं गंडवलं आणि काॅलेजातंन पसार. येता येता मह्यशा ला सूचना दिलता कुणाबरोबर लफडं हाय ते बघ.  शेतात जावून दूपारी ऊनाकडं तोंड करून बसला. हे गेलं आठदिवस चालूच होतं. सव्वाचारला फोन आला मह्यशाचा. ती सच्याला चिकटल्या म्हणून.  सचिन बादगड गडी. पिंट्या तो हसून खेळून एक होते. पण जास्त संपर्क नाही. सच्याचा काटा गेला पाहीजे तरच ही आपली नाहीतर आपन कट्ट्यावर. असं पण आणि तसं

काय करू ?

तिकडंन आला, स्टेशनरी दुकानपुढं गाडी लावला आणि पानपट्टीत गेला.  ................................................... हिवाळ्यात काही गोष्टी आकुंचन पावतात. निर्जीवसुद्धा. ..................................................... रताळ किंवा मक्याची कनसं, शिजवून खाण्यापेक्षा भाजून खाव्यात. चांगलं लागतंय. .................................................. देवावर अतिश्रद्धा असल्याचं जी व्यक्ती तुमच्यापुढे दाखवते. तिच्यापासून लांब राहा. .................................................... डिसेंबर आणि जानेवारीत जास्त लोक मरतात. नैसर्गीकपणे. ......................................................... हा म्हणटला, दूनिया झुठ है ! पैसा प्यार है ! .................................................... मुंबईपुण्याला असणार्या लोकांना गावाकडंच लै लै भारी सगळं सांगतो. तो जाताना नाराज होवूनच जातो. मी खूश होतो. .......................................................... मी मुंगी असतो तर विमानातंन फुकटात हिंडलो असतो. ...................................................... अतिथंडी पडल्यावर नारळातंल पाणी गोठत असेल काय

फुल्ल तेजी

बाजारला आलोय. गवारी विकायला, फुल्ल तेजी आहे. वीस रूपये, पंधरा रूपये पावशेर ने घालायलोय. गाडीवरनं पोतं उतरवायच्या आतंच पाचशेला एकटी बई खंडीत मागितली. सातशेवर गेली. नही म्हणटलो.  उजव्या आणि डाव्या बाजूला आज कोणंच नाहीत. दरवेळी बसत होतो त्या विरूद्ध बाजूला मिस्त्रीच्या गॅरेजजवळ बसलोतो, सुरवातीला एक चक्कर टाकून आलो मग पोतं सोडलो. पैसे घालायला आज पिशवी आणली नाही आणि टीशर्ट घातलोय. मिस्त्रीला म्हणटलो, मेणकागद द्या, तो म्हणटला कशाला ? पैशे घालायला. मिस्त्री म्हणटला कागद कशाला मीच ये तो कि मोजायला ! मग नंतर लै गिर्हाईक आली. मी पैसे तसंच पुढं ठेवून बसलोतो. ताकडीची साखळी जरा अडकलीती त्यामुळं एक पारडं वाकडं झालतं जरा, एकटी काकू आली ती सरळ करायला गेली आणि जास्तंच वाकडी करून गेली. तेवढ्यात दिवाणजी आला मिनटाच्या आत पारडं सरळ केला. मला म्हणटला, हे सरळ करायचं इथल्या बायका शान्या नसतात, जास्त शिकलेल्या असतात. मग मी दिवाणजीला पंधरा ला पावशेर दिलो, ते मला पाचची मळकी नोट दिलेत. एकटी बाई आली पोरगीला घेवून, दा चं दाभार द्या म्हणटली. मी विचारलं एवढंच ? तर आम्ही दोगचं आहे. नवरा बायको. मुलगी कुणाची आहे ? ती प

रोजनिशी

आज नविन वर्ष चालु झालेलं आहे. आत्ता 7 वाजलेत सकाळचे. मी मसोबाला जावून आलेलो आहे. उत्तरेला तोंड करून लिहत आहे. मास्तर म्हणटला रोजनिशी लिहायला घे. घेटलेलं आहे. सकाळी अंघोळ करून वगळीतल्या मसोबाचं दर्शन घेतलेलं आहे. मसोबाला पहिल्यांदा मीच गेलेलो आहे नविन वर्षात. गणपतिला, बस्तीत, पीराच्या दर्ग्याला गर्दी असते. मसोबाचं पाप वाटलं मला. कालच संध्याकाळी डेरीतनं म्हशीच दूध आणलं होतं. म्हसोबाला म्हशीचं दूध आवडतंय. म्हसोबाला मनोभावे नमस्कार करतेलं कोण बघिटलं नाही. म्हणून मी केलोय. म्हसोबा  व्रत असतं तर ? गूडगं टेकताना दोन बारिक खडक टोचलेत गूडघ्याला. कापूर लावलंय. रोजनिशी रात्री लिहायची असते. रात्र घातकी म्हणून दिवसा सूरवात केलीये. दहा वळी भरल्यात. मला शुद्ध मराठी यायला पायजे. असे मास्तर म्हणटले. आणि नंतर एकदा सुद्दीत र्हात जा म्हणटले. त्यांना शुद्ध देखील शुद्ध बोलता येत नाही. आजचा धडा : मास्तर लोक घातकी असतात. ............................................................ आज अंघोळ केलो नाही. हातपाय नीट धूतले. सर्दी आलीय. सर्दी कोरडी आहे. शनवारी सकाळशाळा असते. थंडी वाजते. डी.एच. पाटीलची गणितं सोड
वय वर्षे बावीस आहे. भारत देशात 21 वय असलं की लग्नाला परवानगी आहे. वय बावीस वर्षे आणि काही महिने आहे. एक वर्ष आणि काही महिने फूकटात गेलेले आहे.  मुलींचे वय लग्नासाठी 18 आहे. माझ्या बॅचच्या मुलींनी 4 वर्षे आणि काही महिने वाया घालवलेलं आहे.  लग्न केलं पाहिजे. लग्नात प्रकार आहेत. म्हणजे प्रेमविवाह आणि आरेन्ज मॅरेज. प्रेमविवाहाचे परत प्रकार पडतात. आंतरजातीय, आंतरधर्मीय, स्वजातधर्मीय इइ.  तसेच आरेन्ज मॅरेज देखील आंतरधर्मीय जातीय होवू शकतात. म्हणजे झाले आहेत. ते एक बरे झाले. जगातले  सगळेजण सगळ्यांचे लांबून का होईना पै पावणे झाले. एका मामाने लग्न केले आंतरधर्मीय. परवा आला होता. त्याची बायको काहीही सक्ती न करता उड्या मारत मामाचा धर्म पाळत आहे. मामाच्या डब्बल. मलाही चारदोन गोष्टी मामीनं सांगिटल्या. हुं हुं म्हणटलो. आता लग्न केलं पायजे असे माणसाला कधी वाटलं असेल ? किंवा वाटत असेल. ? परवा करण्या ला म्हणटलो गड्या तु आंतरजातीय लग्न करून जातव्यवस्था मोडून काढायचं काम केलायसं. तर तो म्हणटला अजून साताठ लग्नं करून सगळच मोडून टाकू काय सांग ? एकंदरीत फेसबुकवरल्या लोकांचं ऐकून मी कौतुक करायला गेलो तर आंगल

हाय हिल्स

गडी हूशार होता. पण अभ्यासात नव्हता. जळत असलेल्या ऊसाच्या फडाकडं बघून 86032 हाय का 265 आहे हे परफेक्ट ओळखायचा.  कधीही काहिही करायचा.  खिशात कायम एक चाकू असायचा बारिक, कटरसाईजचा. कधीतर कुणी एखादं फळ आणलं असलं तर लगेच घाईनं हा चाकू काढून द्यायचा. नंतर नंतर कुणी मागितलं तर अजाबात द्यायचा नाही.  नंतर त्याला एक सवयच जडली. कुणी उलटं बोलंल तर त्याच्या चप्पलचा अंगठा तोडायचा. सँडल असले तर मागची दोन बंदं तोडायचा. हे चालूच झालं. एकदा पाव्हण्याच्या घरी गेला. पाव्हणा अंदाकरण खडूस होता हा ग ेला कि कायम तो अभ्यासाचाच विषय काढायचा. आणि चारचौघांच्यात अपमान करायचा. तसा त्या दिवशीही केला. ह्यानं छानपैकी सगळं ऐकून घेतलं. खाली मान घालून. नंतरनं जाताना त्याच्या पाया पडला, पावना हरकून आशिर्वाद दिला. बाहेर पडला. जाताना एक पाव्हण्याचं पायतान पिशवीत घालून गेला. नंतर पुढे रस्त्यावर जावून एका कचराकुंडीत ते पायतान टाकला. मग उड्या मारत घरी आला. याला काॅलेजमध्ये एक पोरगी लै म्हणजे लै आवडली. तिच्यावर याच एकतर्फी प्रेम जडलंच. ती याच्याच ऊंचीची होती, पण हिल्सचे सँडल घालून येत असल्याने ऊगाचच तिच्याकडे याला मान वर करून ब

दिसत तस नसतं

घराकडं येत हुतो. रहदारीच्या रस्त्यावर अलिकडच्या गावाजवळ आलतो. एक विजारवालं रस्त्यावर पडलं हूतं. म्हणजे वाकून एका हातानं जोर मारतंय अशा अॅक्शन मध्ये दिसलं, मी गाडी पुढं घेवून थांबवल आणि बघिटल तर हे खोकत होतं आणि रक्त ठिबकत होतं. रक्ताच्या उलट्या होतायेत असं पहिल्यांदा वाटलं. पुढं गेलो तर डोळ्याच्यावरची भुवयी फाटलीती. त्यातन एकटाक रक्त गळालतं तेवढ्यात गाड्या दोनीकडनं यायलत्या अनेकटा हुता म्हणटलं हात करून गाड्या थांबव, आज्जाला विचारलो काय झालंय ? म्हणजे हे विचारणं भाग हुतं असं व ाटलं. कारण ह्यच्या दारूचा वास सगळीकडं दरवाळलता. आज्जा म्हणटलं हायायाया आलं रांडचं आणि उडवून गेलं आरारारा ! थांबलं नाय आरारारा. ह्येला विचारल तर ह्यो फरांडेबाबा टायीप भाकणूक सांगायला चालू केला. तेवढ्यात गर्दी जमली हुती. बरोबर अनेकटं हूतं ते बरं झालं नहीतर माझ्यावरच बेणी नाव घातली असती. दोनचारजण म्हणटले दवाखाण्याला न्या. मी नेणारच हुतो तर ते म्हणटलं, घरात सोड बाबा घरात सोड. चल बाबा म्हणटलं. रट्ट्याला धरून न्यायलतो तर ह्या गड्यान तीनचारदा मला भेलकाडत भकलत भकलत उकीरड्यावर नेलं. तेवढ्यात एक बई त्यच्याच गल्लीतली हुती त