अशा रात्रीत कुणालाच गुलाबाच फुल आठवत नाही.
.......................................
रात्रीत एस.टीच्या शिटा रिकाम्याच असतात. अस मी म्हणटलो तर तो म्हणटला चल एस.टीतंन फिरूया. 
................................................
भारत धर्मनिरपेक्ष देश असला तरी प्रत्येक शाळेत कुठल्यातर एकाच धर्माच्या देवाची पूजा करतात. 
.................................................
एक पोरगी भाषण करताना अध्यक्ष महालक्ष्मी म्णटली होती.
............................................
जम्मु काश्मीरची राजधानी 'श्रीनगर' आहे हे बहूतेक लोकांना पटत नाही.
................................................
मदत आणि आधार या इनव्हेस्टमेंट आहेत ज्याचे रिटर्न आले नाही की माणूस निराश होतो.
.............................................
एकटी म्हातारी सांगितली होती,
रान सगळं पड आणि शिवभवती रड !
.............................................
समाधी घेणारे आणि आत्महत्या करणारे सारखेच असतात.
...............................................
मुंबईच्या मेट्रो रेल्वेतही बसायला जागा मिळत नाही.
.........................................
अण्णा हजारे अलिकडे कुठे दिसत नाहीत.
..............................................
व्यापम घोटाळ्यावर एखादा चित्रपट निघू शकतो.
..............................................
टोमॅटोचे दर कधीतर वाढतात. मग कुणाचे तर एका प्लाटलाच पंधरा लाख होतात मग तो स्कार्पियो गाडी घेतो.
...............................................
झेराॅक्स काढणारेकधीच कागद बघत नाहीत, दहावी बारावीचे रिझल्ट ते आवर्जून बघतात.
...............................................
कोरफडीचे काटे टोचत नाहीत.
...............................................
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी फोर्ब्स च्या यादीत पहिला क्रमांक पटकवलाय. मोदी नवव्या क्रमावर आहेत.
..............................................
थंडीच्या दिवसात पॅरॅशुटच्या बाटलीतून तेल काढण जिकीरीच काम असतं.
......................................
भारत 2020 पर्यंत महासत्ता होईल अस अब्दूल कलाम म्हणटले होते.
.....................................
हाफ शर्ट घातल्यामुळे हात वर करायला बरं पडतं असं शरद पवार कधीच म्हणटले नाहीत.
.......................................
दिवाळी संपली तरी अजून एकेकजणानी लायटींग काढलेच नाहीत, तरी बरं दिवे लावत नाहीत.
.....................................
वटवाघळांना चिक्कू आवडतात.
...................................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं