भाजपमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा !!

कुठल्याही वाईट गोष्टीचा दोष एकट्याला देता येत नाही. त्याला जबाबदार अनेक घटक असतात. आज २०१७ ला भारतात जी काही वाईट परिस्थिती ओढावलीय. ह्याची सुरवातच २०११ ला आण्णा हजारेंपासून झाली. समुहाचा उन्माद दिसू लागला. उद्दाम भाषणांनी कान तृप्त होणारा समाज दिसू लागला. आणि आपल्या वाईटाला काँग्रेसच कशी जबाबदार हे वातावरण तयार करण्यात तथाकथित विरोधकांनी बाजी मारली. सोशल मिडीया सक्रिय झाला तो याच काळात. आण्णांनी गांधीमार्गावर जाऊन हिंसेच समर्थन करत एकच मारा क्या ? हा निर्लज्ज सवाल केला होता. टोप्या घालणारी गर्दी मोदींकडे फिरली. मोदीच देशाच कल्याण करू शकतात हे बिंबवल गेलं. 
याच काळात श्रीमती सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवार, राहुल गांधी आदी आघाडीच्या नेत्यांची अश्लील फोटोशॉप पसरवली गेली. जनतेला पटवून देण्यात आलं कि हे लोक खलनायकच आहेत. आज सोशल मिडीयावरच्या तक्रारींचा ओघ बघता. २०१४ ला जर सायबर पोलीस सक्रिय झाले असते तर कदाचित सायबर पोलिसांसाठी वेगळी भरती गृहमंत्रालयाला काढायला लागली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या अफवा पसरविल्या गेल्या. काँग्रेस राष्ट्रवादी चा समर्थक म्हणजे देशद्रोही ह्या नजरेनं लोक आमच्याकडं बघू लागले. देशभक्त आणि देशद्रोही हे शब्द आता त्याबद्दल वाटणारं आकर्षण आणि तिरस्कार संपून गेलाय. हे दोन्ही शब्द बोथट झालेत. 
सण २०१४ ला मोदी संसदेत जाताना पायरीवर माथा टेकून गेले. पुढच्या गर्दीला भावनिक करणं हे मोदींइतकं कोणालाही जमु शकत नाही. पेपर न्याप्किन खिशात घालण्याचं ते झाडू मारण्याच्या कामापर्यंतचे व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरवून असा पंतप्रधान देशाला कधीच मिळाला नसता वगैरे पर्यंत प्रचार केला जायचा. 
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांना नशिबाने चांगली साथ दिली. नसिबवाला प्रधानमंत्री मिळाला. पेट्रोलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गडगडले. पण त्याचा फायदा सर्वसामान्य माणसालाकधीच झाला नाही. पेट्रोल वर विविध प्रकारचे कर लावून पेट्रोल चे दर कायम ठेवण्यात आले. 
गॅस सबसिडी सोडून देण्याचं आवाहन करण्यात आलं . अशा भावनिकतेवर काहीही होत नसताना ते करून दाखवण्याच धाडस मात्र मोदीजी करु शकले. 
पुर्वी काँग्रेसच्या काळात सीमेपलिकडून गोळीबार व्हायचा. त्याचा निषेध गावागावात केला जायचा २०१४ पासून तर हल्ले वाढले पठाणकोट असेल कि पुँछ भागात असेल. एक महिना असा सरला नाही कि हल्ल्यात एकही सैनिक शहीद झाला नाही. आता मात्र कँडल मार्च पाकिस्तान चा झेंडा जाळायचा सत्ताधारी पक्षाला शिव्या द्यायचे काम होत नव्हते. 
रोहिथ वेमुला प्रकरणानंतर जेएनयुमध्ये साथी कन्हैयाकुमार आणि सहकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे घालून आत डांबण्यात आलं कन्हैया तसा आडदांड अभ्यासु असल्याने मोदी सरकार ला थेट सवाल करू लागला. सत्तेत आल्यानंतर मोदींना पहिलं टार्गेट कुणी केलं असेल तर ते कन्हैयानेच. 
बिहार निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर देशभर दौरे आखून पंतप्रधान प्रचार प्रसार कामात पक्षाचीच मदत करत होते. पक्षाची म्हणन्यापेक्षा आपलीच प्रतिमा सुधारत होते. एवढं वातावरण विरोधी नव्हतं. 
एका रात्रीत मोदींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चलनातून बाद करून टाकल्या आणि गुलाबी २००० ची नोट आणली. मात्र या आधी रघुराम राजनना पद्धतशीर काढून टाकून उर्जित पटेलाना त्यांनी आणलं. उर्जित पटेल बिचारा माणूस असून त्यांना नोटा मोजता येत नाही हे काही देशाला वेगळं सांगायची गरज नाहीच नाही. 
अभुतपुर्व अशा नोटबंदीनंतर मोदींनी फालतु भावनिक भाषनाला सुरवात केली. मैने घर और परिवार देश के लिए छोडा ! (आम्ही म्हणटलोतो का सोडा म्हणून ?) 
त्यात काहीवेळा ते भावनिक होऊन रडायचेही. (मला इथं मनमोहन सिंहांची आठवण येते इतक्यांदा बदनामी केली पण दाढीतल्या दाढीत ते हसतच होते)
मला पन्नास दिवसांची मुदत द्या ! कसली मुदत ? काय बोलताय ? 
ह्याच काळात ते बोलायचेही गंगा नदीत लोकांनी नोटा सोडल्या. मग ज्या ९९% नोटा जमा झाल्या त्या काय गळ लावून काढल्या काय ? 
भाजपच्या समर्थक लोकांनी अगदी नेहरू गांधीपासून ते राहूल गांधी ते पत्रकार लोकापर्यंत सर्वांना बदनाम केलं. साहजिकच जे कुंपनावरचे लोक असतात ते कुणाचे नसतात. ती लोकं प्रश्न विचारू लागली. फोटोशॉप करू लागली. विविध शब्दांनी घायाळ करु लागली आणि हे होणारच होतं. सत्ता आल्यानंतर निम्मा काळ ओलांडून गेल्यावर जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, मेक ईन इंडिया, मुद्रा योजना ह्या साऱ्या गोष्टींचा बोऱ्या वाजला. 
महाराष्ट्रात तूर खरेदी, डॉक्टरांचा संप, कांदा जाळणे, संघर्ष यात्रा, आसूड यात्रा, आत्मक्लेश यात्रा अशा प्रकारच्या दिंड्या निघल्या पण निगरगट्ट सरकार कशाकडंच लक्ष देत नाही. कर्जमुक्ती साठी शेतकरी संपावर गेला. चंद्रकांत दादांनी तत्वतः, अंशतः, सरसकट असल्या शब्दांनी शेतकऱ्यांना खुळ्यात काढलं. काल कर्जमाफी जाहीर झाल्यावर बोगस कोण हा प्रश्न चंद्रकांत दादांना विचारायला पाहिजे असं वाटु लागलंय. आधार, नवराबायको जोडीनं फॉर्म अॉनलाईन भरणार मग हे कर्जमाफी करणार अशा भंकस गोष्टीला शेतकरी वैतागलाय. ऐन दिवाळसणात राज्याची जीवनवाहीनी असणारी एस.टी बंद पडलीय. सुदाम आवटे सारखा एस.टी कर्मचारी टेलरिंगचा व्यवसाय करुन पोट भरालाय. या काळात खाजगी वाहतुकीचं फावलं दुप्पट तिप्पट भाडं घेऊन ही लोकं प्रवाशांची सेवा करायला लागले. 
आज स्थावर मालमत्ता जमीन खरेदी विक्री व्यवहार पुर्णतः ठप्प झाले असून एक प्रकारची संशयितता ह्या क्षेत्रात आलीय. त्यात डी.एस.के सारखे उद्योगपती भिकेला लागलेत तिथं सामान्य माणसाची काय कथा ? 
कुपोषण, सामाजिक सौहार्द, गोरक्षकांचे हल्ले, बालमृत्यु, यष्टी कर्मचारी लोकांचा संप, डेरा सच्चा सौदा नंतर पंचकुला परिसरात झालेल्या दंगलीच हाताळणं, नाशिक मध्ये झालेले मृत्यू, उत्तर प्रदेशात झालेले मृत्यू, एल्फिन्सटन दुर्घटना, एटीएम ची रांग, अॉनलाईन नोंदणी, कोपर्डी प्रकरण, अवकाळी पावसानंतर न केलेली मदत, लोडशेडींग, शेतमालाचे ठरवून पाडलेले भाव, रोहिथ वेमुला, कन्हैयाकुमार, पारिचारकच घाणेरडं वकत्वय, शेतकरी फ्याशन म्हणून आत्महत्या करतो, साले शेतकरी, गेलेल्या नोकऱ्या, स्त्रियांवर झालेले अत्याचार, ब्लु व्हेल ने बळी गेलेले किशोरवयीन, गरज नसताना बुलेट ट्रेन वर केलेला खर्च, सोशल मिडीयावर केलेला खर्च , जागतिक क्रमवारीत भुक निर्देशांकांनी मारलेली मजल, जुमल्यावरचे जुमले अशा परिस्थितीत जनता हैराण झाली असून त्याचे पडसाद नांदेड महानगरपालिका निवडणूक असो कि गुरूदासपूर निवडणूक असो यामधून उमटत असून येणारा काळ भाजपला मिटवून टाकून ही अस्वस्थता संपवून परत एकदा गतिमान विकासासाठी सरकार बदलण्याची सुरवात झालीय. ह्या काळ्याकुट्ट दिवाळीत ही आशेची बाब म्हणायला काय हरकत ? ही तर भाजपमुक्तीची सुरवात झाली.
ढोंगी आंदोलकांचे चेहरे उघडे पडत असून, जवळपास असलेल्या समस्यांवर बोलण्याऐवजी विरोधकांना अक्कल शिकवणाऱ्या बोडक्या विचारवंतांनीही समस्यांचा विचार करण्याची सद्बूद्धी मिळो. 
 ज्या वेगाने भाजपची घसरण चालु आहे त्याच वेगाने आपल्या जीवनातील समस्या संपु देत.
आपणास व आपल्या कुटुंबीय हितचिंतकांना भाजपमुक्त दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!