पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाजपमुक्त दिवाळीच्या शुभेच्छा !!

कुठल्याही वाईट गोष्टीचा दोष एकट्याला देता येत नाही. त्याला जबाबदार अनेक घटक असतात. आज २०१७ ला भारतात जी काही वाईट परिस्थिती ओढावलीय. ह्याची सुरवातच २०११ ला आण्णा हजारेंपासून झाली. समुहाचा उन्माद दिसू लागला. उद्दाम भाषणांनी कान तृप्त होणारा समाज दिसू लागला. आणि आपल्या वाईटाला काँग्रेसच कशी जबाबदार हे वातावरण तयार करण्यात तथाकथित विरोधकांनी बाजी मारली. सोशल मिडीया सक्रिय झाला तो याच काळात. आण्णांनी गांधीमार्गावर जाऊन हिंसेच समर्थन करत एकच मारा क्या ? हा निर्लज्ज सवाल केला होता. टोप्या घालणारी गर्दी मोदींकडे फिरली. मोदीच देशाच कल्याण करू शकतात हे बिंबवल गेलं.  याच काळात श्रीमती सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवार, राहुल गांधी आदी आघाडीच्या नेत्यांची अश्लील फोटोशॉप पसरवली गेली. जनतेला पटवून देण्यात आलं कि हे लोक खलनायकच आहेत. आज सोशल मिडीयावरच्या तक्रारींचा ओघ बघता. २०१४ ला जर सायबर पोलीस सक्रिय झाले असते तर कदाचित सायबर पोलिसांसाठी वेगळी भरती गृहमंत्रालयाला काढायला लागली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या अफवा पसरविल्या गेल्या. काँग्रेस राष्ट्रवादी चा समर्थक म्हणजे देशद्रोही ह्या नजरेनं