पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज्जा आणि आण्णा

वर्षाला रानात शाळू असायचा, आतापण हाय. आज्जा हुतं तवा सांजच्या टायमाला आम्ही फिरायला जायचो. माळा असायचा आम्ही आंटा म्हणायचं त्याला. कन्नड भाषेत एक घाण म्हण हाय. 'आंटा इल्लरे शंटा इल्ल'  म्हणजे  ते रान पिकलं नसायचं. ह्या दिवसात संध्याकाळी एक असलं मस्त वातावरण असायच काय विचारायला नको असं. तवा अजिबात मोबाईल कंप्युटर असलं काय काय नसायचं. आज्जांची दोस्तं लै.  आज्जा फिरत असायचे. पंढरपूर ची वारी करणारा आज्जा गावात एकटं. लोकांच्या उपयोगाला पडायच, हे मला दुसरीत सांगायचीत. काय घंटा कळतंय ? मी उगचच रुबाबात हांहां म्हणायचो.  पुढं पैलीदुसरीत गेल्यावर सकाळी संध्याकाळी आज्जा न्यायला आणायला यायचीत.  केस कटींगला गेलं कि आज्जा टक्कल करायचीत आणि शेंडी ठेवायचीत. संध्याकाळी भजनाला आजरेकरवाड्यात. तिथंच आज्जांचा दोस्त पैलवान तातबा लठ्ठे. त्यांची खासियत हुती लै खुराक लागायचा, मग आम्ही जेवायला बसल्यावर जरा जास्त जेवलो कि आज्जा म्हणायचीत भजी पाव- तात्या लठ्ठ्या. दुसरं दोस्त निशानदार आज्जा त्यांचं टोपन नाव बताशा. बताशा आज्जा  प्रसिद्ध माणूस. कुस्त्यांचं मैदान घ्यायचं पैलवान आणायची तयार करायची कामं