पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रांतीसिंह नाना पाटील

इमेज
चौथीची उन्हाळी सुट्टी होती. घराशेजारच्या सुरगोंड मास्तरना सुट्टी असायची. मग ते कोल्हापूर हून गावाकडं यायचे. त्यांच्या घरात ढीगभर पुस्तकं, त्यात गोष्टीची, इसापनिती, चंपक, पेपरमधले अंकूर बालमित्र हे सगळं वाचायला लै आवडायच, म्हणून मी तिथं सदानकदा पडाक सकाळचा नाष्टा पण तिथंच व्हायचा आणि कधीकधी रात्रीच जेवणपण.  त्या सुट्टीत मास्तर परत कोल्हापूरला जाताना एक पुस्तक देवून गेले. जे मी त्यांना अजूनही परत देत नही. पुस्तकाचं नाव क्रांतिसिंह नाना पाटील. नाव वाचून तर भारीच वाटलं म्हणटलं क्रांतिशिंव आणि पाटलाचा नाना हे जवळच वाटलं. पुस्तक ईतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांनी संपादित केलेलं आणि अरुंधती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं. नाना पाटीलला कुठल्या महान ठिकाणी जन्म मिळाला नव्हता. आमच्या सारख्या लहानशा शेतकरी कुटुंबात जन्मलेलं नाना, घरी वारकरी संप्रदायातले आईवडील. साधंसुध कुटुंब काहीही पार्श्वभूमी नसताना नाना तलाठी पदापर्यंत पोचले. ब्रिटीश सरकार जनतेचं शोषन करत होतं. जिकडंतिकडं पोलीस हुते. हे सगळं बघून नानांच मन अस्वस्थ झालं तलाठ्याच्या नोकरीला राजीनामा दिला आणि घेतली ऊडी गांधीबाबाच्या चळवळीत !

देशभक्तांची तटस्थता

गेल्या काही वर्षात राजकारण झपाट्याने बदलत चाललंय. यात सोशल मिडीया, ईलेक्ट्रानिक मिडीया किंवा प्रिंट मिडीया ह्याचा वेग वाढतोय आणि नमुनेदाररित्या आपल्या पुढे बातम्या झळकतात. आता काही लिंकपाहिलं तर लक्षात येतं. अबब राखीने हे काय केलं ? त्यामुळे उत्सुकता चाळवून लक्ष खेचण्यात माध्यमं यशस्वी ठरतात. मुळात राखीनं काय केलं हे स्पष्ट न सांगता ते दडवून ठेवायच. आत वेबसाइटवर बातमी तर सामान्य असते. पण राखी नं काय केलं हे बघण्याची उत्सुकता राहवत नसणारे तिथं धडकतात. हाती काय तर राखीनं  अमुकतमुक पक्षात प्रवेश केला. ह्यात अबब करण्याईतकं काय असावं ? अतिरंजीतता हा एक समाजमनाचा भाग होवून बसलाय हे पद्धतशीरपणे काही चाणक्यानीं आधीच ओळखलतं. त्यातूनच एका मुंडक्याच्या बदल्यात शंभर मुंडकी किंवा चुनावी जुमले किंवा पाकिस्तान मध्ये फटाके ई भाषनं राजकारणाची बदलती दिशा ओळखून आलीत. त्यात ते पुरते फसले गेले.  आज परत विविध टप्प्यात गेले अडीच वर्षे गोंधळच गोंधळ चालू आहे. अखलाक, रोहित वेमुला, कन्हैयाला देशद्रोही घोषित करनं, व्हाटसप संवादावर नजर ठेवणे, पॉर्न वेबसाइटवर बंदी आणने, गोहत्याबंदी इत्यादी घडामोडींनी सरकार