पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाजार

इमेज

जनावरं चांगलीच असत्यात.

जनावरं चांगलीच असत्यात. कधीकधी वाटायचं नुसतंच जनावरं असली की बरं पडल. म्हणजे ए टू झेड जनावरं शिक्युरीटी देणारी लावायची म्हणजे कोणच तुमच्यापर्यंत आक्रमन करू शकनार नही असं. वाघ, बिबट्या, शिंव, कोल्ही, कावळी, आस्वल, पारवाळ, आग्यामव्ह, कुत्री,हात्ती घोडं रेडं म्हसरं गैरं, पैसा किडा, बेडक्या, चिचूंद्री, रानडूक्कर, गेंडा, साप, विंचू, पाली, सरडं, साळिंदर, घूस, मुंगूस असलं सगळं पाळायचं. म्हणजे पिल्लू असताना सगळ्यासनी घरात आणायचं. जीव लावायचं माया करायचं आणि एकदा वळखपाळख झाली कि सगळी  आपलं ऐकत्यात. पैसा किडं कंपाऊंड गेटजवळ ठेवायची, कोणतर आलं की एकतर वुळवूळत आपल्यापर्यंत येतय, मग दारात कुत्री असत्यात ती सोडायची. डॅल्मेशिन, राॅटवेलर, ग्रेटडेन, डाबरमॅन, मूधोळ असली एकदम भुकायला चालू केली तर काय हूईल ? पाचसहा साळंदर डोश्क्यावरंन हिंडाली तर ? मग आग्यामव्ह उटवायचं. बेडक्या नूसती डराव डराव करून शत्रूसैन्याची ढीली करत्यात. मग म्हशी एका कडला आणि रेडं एका कडेला ऊशीर बांधून ठिवून सोडली की शत्रूसैन्य शिंगानं घायाळ हूईल. असं एवढं असल्यावर गावातंन वाघ नहीतर शिंवावर बसून हिंडायच. हे आत्ता शक्य नही आपल्या देशा

प्रत्येक माणूस एकदातर लेखक असतोयच.

पयला लेखकांबद्दल अनेक विचार डोक्यात यायचे. लहान असताना वाटायचं लिवणारे सगळे लोक लेखक वाटायचे. बँकेत गेलो की वाटायचं तिथले सायेब मोठ्याच्या मोठ्या वहीत कायतर लिवायचे. त्यापेक्षा जोरात शिक्का मारायची. पण शिक्का मारतेलं दिसत नव्हतं. काॅट काॅट आवाज यायचीत. तरी नंतर पाचवीला ऊंची वाढल्यावर ते आकडं लिवत्यात असं दिसायचं. गणिताची पूस्तंक हीच बँकेतली सायेब लोकं लिवत असतील असं वाटायचं. हायस्कूलला आल्यावर शितोळे सर हूते ते शिकवत नव्हते खरं तिथ टाईपरायटर हूता त्यावर ते सारखं सारखं कायतर ल िहत बसायचे. तिथंच लायब्ररी होती. हायस्कूलला लॅबोरेट्री पण हूती. मोठ्ठीच्या मोठी. मला लायब्ररी आणि लॅबोरेट्रीतला फरकंच कळायच नही. कशालापण कायपण म्हणटलं की चालायच पोरांच्यात. नंतर काॅलेजला एकदा एल.आर (लेडीज रूम) बद्दल कन्फ्यूजन झालतं. तर लॅब मधले चव्हाणसर पण कायतर लिवायचे. पण ते अहवाल, पत्र असलंच कायतर लिवायचे. ते कधीच काय पूस्तक वगैरे लिवले नहीत. जोडधंदा म्हणून कारकून लोकांनी पुस्तक लिवत असतील आणि नंतर ते लेखक पदावर बढती मिळत असेल असंपण वाटायचं. खरं नंतर नंतर सगळं कळलं. मी लेखक लेखिका पेप्रात लिवणार्या लोकास्नी भे

मी करतोय तूझाच इंतजार

तू ये एकदा अशी आजच्या पावसासारखी वाट बघत असतात या पावसाची सगळे मीपण बघतोय तुझी वाट बघतोय मिरजेकडेला वीजा चमकल्या की सगळे सुखावतात येणार पाऊस म्हणतात मलाही कुठेतर चमकल्यासारखं वाटतंय तु येशील असं ऊशिरभर वाटतंय हा पाऊस काय वाहून जाणारा नाही झिरपून जाणारा नाही तो रूजतोय फक्त ह्या मातीचा वास हवासा वाटतो हिरवीगारं स्वप्नं आपसूक पडतात आज पाऊस पडलाय अंदाज बरोबर बसलाय तू पण ये एकदा बरस कोसळलीस तर कोसळ तूटू देत तारा हू दे अंधार !!! मी करतोय तूझाच इंतजार

अश्रु आणि पाऊस

डोकं मेन काम करतंय. डोक्यावरची केसं ही झाडं वाटत्यात. झाडात दोन मुख्य प्रकार flowering plants आणि non flowering plants म्हणजेच सपुष्प आणि अपूष्प. सूरवातीला वाटायचं की अपूष्प झाडं हायीत केस. म्हणूनंच काय पोरी बायका केसात गजरा फूल घालत्यात. त्यावेळी वाटलं सपूष्प हायीत केसं. केस गवतासारखं असतात, किंवा स्पाईक केलं की देवदारच्या झाडागत ऊंचच ऊंच. कधी वेलीसारखं पसरलेलं. तर कधी झाडात झाड गूंतलेल (वेनी). नंतरनं विश्वास बसला ही झाडंच. ते ह्यामूळं.  डोक्यात आपल्या पाणी मूरतंय. झाडं हायी त म्हणजे सच्छिद्र डोकं असतंय आपलं. त्यात आपन केसांची प्रचंड काळजी घेतोय. रोज डोक्यावरून अंघोळ, शांपू, कंडीशनर ने केसं धूतो. त्यावर रोग येतोयचं उवा (वा) वाढत असत्यात आपल्या केसांच्या जीवावर. जसं ऊसावर लोकरी मावा पडतोय. ह्या किडीला ऊपाय म्हणून आपन आपन अँटीडँडरफ (अँटी आपल्याला अलिकडं खूप आवडतंय) लावतो किंवा स्प्रे करतो. ते काही केसांना सहन होतंय काहीना नाही. मग डोक्यात तांबेरा पडल्यागत, मॅगनेशीम कमी पडल्यावर ऊसं कुठं कुठं फटफटीत दिसत्यात तसं केसं पण दिसू लागत्यात. मग एक उपसून काढलं की दहा तयार अशी भानगड. केसं झाडंच

साखरमाळ

पाडव्याच्या सकाळपारी बाजारला गवारी घेवून आलोय. पोतंभर कवळी गवारी ठोक घातल्या. गठळभर निबार गवारी बसून हातकाट्यावर विकलोय. पलिकडे एक आळसुंबडी काकू सूजल्या डोळ्यानं बसल्या, तिच्याकडे काकडी, वांगी मिरची, शेवगा, वाळूक हाय.  मला बसालतो तेवढ्यातंच ऊठूठ ऊठूठ करायला लागली, मी म्हणटलं काय ? एवढी मिरची वतून दे मग तीच पोतं खासकन ऊचलल तर दमानं दमानं असं जोरात वरडली. तिच्याकडंचा सगळा माल दोन तीन नंबरचा हाय. म्हणजे टाम्याटू लालरविंद्र हायीत. पुढच्या बाजूला एक फ्रेश तोंडाची बाई हाय तिच्याकडं चे टाम्याटू बरे हायीत. एकटी पोरगी स्कुटी घिवून आली. माझ्याकडं अर्धा किलो घेतली, गाडी चालू हूईना. कोथमीर विकणार्या काकाला बोलवली. काका तेजीत हाय गिराईक दम खाईना, मला म्हणटला बघ जरा, आणि तिच्याकडं गेला. ते स्टार्टर मारल, किक मारल यरवाळी घाम आला काकाला. तरीबी चालू झालं नही. म मला शुक शुक करून बोलवली. गेलो, किल्ली बघितलो तर ते चालू नव्हतं फिरवलो, स्टार्टर मारल्यावर गाडी चालू. ही जिभ चावली आणि जोरात हसून दाताची साखरमाळ दाखवली. थँक्स हं म्हणटली. मी बी वेलकम म्हणटलो. काका रागानं बघून हसला. दर बरा मिळला. पाडवा हाय आज.  s
रस्तं भारीच असत्यात. नंतर फाटं फूटत्यात. सावली देणारं एक झाड असतंय.  ......................................... ............. टाईलच्या फरच्या असल्या की पायतान पण उचलून हातात घ्यायला लागतंय.  ......................................................... चिरमूरं फूटाणं खाल्लं की तहान लागत्या. त्यावेळी पाणी जास्त प्यायचं नसतंय. ......................................................... सकाळी एक टमटम बर्फाच्या लाद्या घिवून चालंलत, त्यातंन पाणी पडालतं. मागं एक सायकलवाला दोन घागर्या घिवून पाणी आणायला चाललाता. पायंडल मारून त्यला घाम आलता. ........................................................... सरदार गब्बरसिंग पिच्चर बघितलो आज. बरा हाय. काजू अग्रवाल आगायाया लै काटा दिसल्या. ........................................................... अमेरिकेच्या दोनचार पोरी बर्नीसायबांच्या प्रचारकार्यात गेल्यावर भेटल्या. सकाळपास्नं बोलालतो. तिकडंची एक बोंब म्हणजे हवामान. बर्फ पडालय. मी म्हणटलं हिकडं लै ऊन पडलंय. ती म्हणटली जवळ बीच हाय काय नही ? मी सबंध मूंबई कोकणफाटा तिला सांगिटलो. जा स्विमिंगला म्हणटली. स्विमीं
डोकं मेन काम करतंय. डोक्यावरची केसं ही झाडं वाटत्यात. झाडात दोन मुख्य प्रकार flowering plants आणि non flowering plants म्हणजेच सपुष्प आणि अपूष्प. सूरवातीला वाटायचं की अपूष्प झाडं हायीत केस. म्हणूनंच काय पोरी बायका केसात गजरा फूल घालत्यात. त्यावेळी वाटलं सपूष्प हायीत केसं. केस गवतासारखं असतात, किंवा स्पाईक केलं की देवदारच्या झाडागत ऊंचच ऊंच. कधी वेलीसारखं पसरलेलं. तर कधी झाडात झाड गूंतलेल (वेनी). नंतरनं विश्वास बसला ही झाडंच. ते ह्यामूळं.  डोक्यात आपल्या पाणी मूरतंय. झाडं हायीत म्हणजे सच्छिद्र डोकं असतंय आपलं. त्यात आपन केसांची प्रचंड काळजी घेतोय. रोज डोक्यावरून अंघोळ, शांपू, कंडीशनर ने केसं धूतो. त्यावर रोग येतोयचं उवा (वा) वाढत असत्यात आपल्या केसांच्या जीवावर. जसं ऊसावर लोकरी मावा पडतोय. ह्या किडीला ऊपाय म्हणून आपन आपन अँटीडँडरफ (अँटी आपल्याला अलिकडं खूप आवडतंय) लावतो किंवा स्प्रे करतो. ते काही केसांना सहन होतंय काहीना नाही. मग डोक्यात तांबेरा पडल्यागत, मॅगनेशीम कमी पडल्यावर ऊसं कुठं कुठं फटफटीत दिसत्यात तसं केसं पण दिसू लागत्यात. मग एक उपसून काढलं की दहा तयार अशी भानगड.  केसं झाडंच