मोजणीदार

मोजणीदार माझा दोस्त हाय.मी एकदा त्यच्याबरोबर रान मोजायला गेलतो. नकाशा वगैरे काढणे. टेप धरणे असली कामं त्योच करालता मी फक्त मापं लिवून घ्यालतो. तिथल्या लोकास्नी वाटलं मीच सायेब हाय आणि त्यो कामाला ठेवलेला. मग मलाच सरबत नाष्टा चहा जेवण सगळी हारकून द्यायलती मित्र हसालता. मी पण तावानं सुचना करालतो हां टेप ताणून धरा. चॉकपीट नीट मारा दगडाला चुन्ना मारा. 
सगळं झाल्यावर प्रवचन चालु केलो शिवभवती भांडत बसू नका. काय असल ते रानात पिकवा. एका दुसर्या सरीनं काय फरक पडतंय असं.
मित्र वैतागलं. 
नंतर जाताना म्हणटला तु सगळ्यासनी शानं करून माझी वाट लावणार. 
मी त्यच्या समाधानासाठी म्हणटलो, तुला मी पंतप्रधान झालो कि काश्मीर मोजायला पाठवतो. 
मग त्यो लै हारकून म्हणटला आगुदर ब्यळगाव मोजतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं