दिवाळी अंक बायको

सकाळी मी आणि माझी बायकु पेपर वाचतो. म्हणजे एकदम नही.आधी मी किंवा नंतर मी असं. बायकु पेपर वाचत्या. पुरवणी पण वाचत्या. कधीकधी त्यातल्या पाककृती रेसिपी वाचून मला दुकान ला पाठवत्या. नंतर खायला करून देत्या. बरं वाटतंय. मी पण समाधानी हुतो. 
आम्ही दोघं राशिभविष्य पण रोज वाचतो. साप्ताहिक राशिभविष्य पण दोघं वाचतो. 
मग एकदा माझ्या राशीत विवाह योग लवकरच असं आलं. मझं हिच्यासोबत लग्न झालंय. तरीपण हिला वाटतं मी अनेक करीन. म्हणून मला ही हाफिसला जाऊ देत नही. हाफिसातले चांगले हायीत समजून घेतात. मी परवा रुपेशला ईचारलो तुम्ही पेपर घेता काय ? मग त्यो नही म्हणटला.
त्यला वाचावं वाटत नही. एकेकदा पेपर बरोबर शांपु फ्री मिळतो. 
हे त्यला महीत नही.
बायकु परवा म्हणटली एकाडेक दिवस शांपु फ्री दिला पाहिजे. 
नंतर विचारली पेपर खपावं म्हणून ते मालक लोकं शांपु देत्यात काय ओ ?
मी पण व्हय म्हणटलं. तिला सांगालो तर लै विचारत्या. 
मग ती म्हणटली तुम्ही रोज शांपू फ्रि असणारा पेपर टाकायला लावा. 
अग रोज कोण देतील असं तिला समजवायची पण काय सोय नसत्या. म्हणटलं बघू. मला ह्यो पेपर आवडतो कारण बातमी खरी असते. फोटो पण क्लियर येतात. मला दुसरं पेपर आवडत नही असं नही. पण हेच वाचायला आवडतं. मी बायकोला तसं सांगिटलं. ती म्हणटली खरं हाय तुमचं ह्या पेप्रातलं भविष्य खरं येतंय गुण येतंय. 
मी पण हसलो. 
पेपरात हिला खून अपघात आत्महत्या असलं वाचायला आवडतंय. वाचत्या आणि पुष्पा ला संध्याकाळी सांगत बसत्या. म्हणून मी त्या बातम्या वाचत नही. मी ही पुष्पाला सांगत्या तवाच ऐकतो. 
बायको खुनाच्या सातम्याची वर्णन चांगलं करत्या. ऐकायला मज्जा येते.
परवा सांगालती, पोटात चारवेळा भोसकून खून केला. नंतर पुष्पा म्हणटली एकदा माणूस भोकसल्यावर परत तीनदा का भोकसलं असल वैनी ? 
अगं रागाच्या भरात आरोपी असल कि त्यामुळे रागाच्या भरात आणि तीनदा भोकसलं असंल. 
बायकू हुशार हाय. आरोपी म्हणत्या. अशी चर्चा एकदमच गोबी मंच्युरीअनवर येत्या. मग पुष्पा आणि ही दोघी हसतात. 
परवा मला विचारली पेपरात तुम्ही काय वाचता ? 
मी म्हणटलो अग्रलेख आणि संपादकीय पान. 
ती म्हणटली मला ते आवडत नही, पण पिच्चरला स्टार देत्यात ते आवडतंय. त्यामुळच पिच्चर कळतो. 
अधीमधी निधन वार्ताचं पान आणत्या मला दाखवत्या म्हणत्या बघा वाचा हे. ह्यांच्यामागे दोन बायका पाच मुले तीन सुना दोन नातवंडे असा परिवार आहे.
मग म्हणटलो ह्यात काय ? 
ती म्हणटली सदर इसमास दोन बायका हायीत. 
मग त्यात काय झालं ? 
ओ तसं नही अशी माणसं सारखसारखं मरत नहीत दोन बायका असणारी. गेल्या एप्रिल मधे एक फोटो आलता त्यानंतर आता आला म्हणून दाखवलो. 
बायकु आणि मी शब्द कोडे सोडवतो. मी ऊभं शब्द सांगायच ती आडवं असं. मग नंतर रिपीट रिपीट होवून बायकुचे शब्द भांडार वाढले. ती आता एकटी सोडवू शकत्या. 
ऊभा शब्द 25 सुर्य =भास्कर
आडवा शब्द 25 एक भारतीय मानाचा किताब =भारतरत्न.
आता आम्ही दोघे सुडोकु सोडवतो. मला जमतं तिला पण जमायला लागलं. 
काल तिने चार दिवाळी अंक आणले. त्यापैकी दोन अंकातलं राशिभविष्य चांगलं हाय. 
बाकि दोन्ही मध्ये शनिच्या प्रभावामुळे हे वर्ष त्रासदायक आहे. असं लिवलंय. 
बायकु म्हणटली सकाळी सकाळी येताना शब्दकोडे असलेले दिवाळी अंक मिळालं तर घेऊन या. 
अलिकडे अतिपेपर वाचनामुळे आम्ही दोघं शुद्ध बोलतोय. आता एखादा अंक बघायला लागणार शब्द कोडी असलेला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं