सदाभावूची शेती

कृषी आणि पणन मंत्री सदाभावू खोत यांच्या मुलाचं काल लग्न झालं. ईस्लामपूरात. मुख्यमंत्री आणि डझनभर लोकं उपस्थित होते. लगीन आगदी जोरात झालं. आंदोलन आसलं की मिडीया भावूचं मोडकं घर दाखवत हुती. सहानभुती गोळा करून देत हुती. सामान्य शेतकरी ह्यंव त्यंव आणि आत्ता सामान्य खात्याचे मंत्री झाल्यावर परिस्थिती कशी बदलते हे दाखवत नही. मग आमी कसं म्हणायचं आछे दीन आले म्हणून ? 
गुंठ्यावारीत जमीन असणारी लोकं एवढ्या जोरानं लगीन करतेलं बघून मला भावू रानात काय लावत असंल असा प्रश्न पडलाय. 
माझंबी लग्नाचं वय झालंय. फेसबुकवरचेच पाच हजार, चारपाचशे परदेशातली, गावातली, पावणंरावळं कसं हान्डेल करायच कळंना. सदाभावू कडे शिकवणी तर लावु काय ?
आजून ठरायचं हाय 
दणक्यात करायचं हाय !!!
😊😊😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं