पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
शहरात काय मेळ नसतंय. ऊगचच भरलेला भंपकपणा. मोठ्ठीच्या मोठ्ठी बिल्डींग आणि त्यात कोण विचारत नसलेला एक फ्लॅट कुठल्यातर मजल्यावर. सकाळी ऊठून माॅर्निंग वाॅक करून पेपर वाचूपर्यंत दहा वाजतंय. तिथंन गडबडीत शिळं झालेलं माळव्याची भाजी नहीतर पच्चपाणी असलेल्या आमटीची वाटी आणि तेल सोडा टाकून हवा भरलेल्या चपात्या खावून कामावर पळा.  तिथं राबून आलं की परत घरात येवून काम. आणि रडक्या सिरीयल बायकूबरोबर बघून पोराचं अभ्यास घेतल्याची नाटकं. मग दमून भागून झोप.  ती गर्दी, सिग्नलला वाट बघत बसणं, कधीकधी वाटतयं मधल्या मजल्यावर एक फ्लॅट घेवून पिलरंच पाडून टाकावं.  त्यापेक्षा गावात सकाळी ऊठा, गैरमसरांच शेणघाण करा, वैरण आणायचं, आकरी दूधाच चहा प्यायच, नाष्ट्यालाच झुणका भाकरी नहीतर सांजा खायाच. दूपारला रानातंन आलं की गार आंघोळ करायचं. जेवलं की कट्ट्यावर नहीतर आंब्याच्या झाडाखाली जावून झोपायचं. झोपून ऊठलं की परत चहा प्यायला जायचं. संध्याकाळला कुठतर देवळात ते बसून गावाची माप काढायची. कशाला कोण जबाबदार हाय त्यावर चर्चा करायचं. गावातलं मॅटर ऐकत बसायचं. रात्रीला पाणी पाजवायला जायचं. तिथंच रानात झोपायचं.  सकाळी घरातली हूड

सदाभावूची शेती

इमेज
कृषी आणि पणन मंत्री सदाभावू खोत यांच्या मुलाचं काल लग्न झालं. ईस्लामपूरात. मुख्यमंत्री आणि डझनभर लोकं उपस्थित होते. लगीन आगदी जोरात झालं. आंदोलन आसलं की मिडीया भावूचं मोडकं घर दाखवत हुती. सहानभुती गोळा करून देत हुती. सामान्य शेतकरी ह्यंव त्यंव आणि आत्ता सामान्य खात्याचे मंत्री झाल्यावर परिस्थिती कशी बदलते हे दाखवत नही. मग आमी कसं म्हणायचं आछे दीन आले म्हणून ?   गुंठ्यावारीत जमीन असणारी लोकं एवढ्या जोरानं लगीन करतेलं बघून मला भावू रानात काय लावत असंल असा प्रश्न पडलाय.  माझंबी लग्नाचं वय झालंय. फेसबुकवरचेच पाच हजार, चारपाचशे परदेशातली, गावातली, पावणंरावळं कसं हान्डेल करायच कळंना. सदाभावू कडे शिकवणी तर लावु काय ? आजून ठरायचं हाय  दणक्यात करायचं हाय !!! 😊 😊 😊

माझं लगीन हून धा वर्षं झाली.

माझं लगीन हून धा वर्षं झाली. धा वर्षाआगूदर मला डोस्क्याला लै टेनशन यायचं.  माझं शिक्षेण कमी, चवथी. रान बी लै नही आमास्नी. एक एकर हाय. त्यच्यानं मला कोण पोरगी देतील काय असं वाटायचं. मंजे मी एकटाच इचार करत हूतो. संज्या माझा दोस्त. पानपट्टी हाय त्यची. त्यचं लगीन झालं आणि माझ्या डोस्क्यात किडं पडली. त्यला पावण्यातलीच पोरगी केली. संज्या लडतरबाज. काॅलेज शिकला त्यो आणि पानपट्टी काढला. काॅलेजात पोरीस्नी चुन्ना लावत हूता आता पानपट्टीत पानाला चुन्ना लावतोय. त्यची बायकू बघून मला भ्या वाटलं. तिची नही. मला माझं कसं व्हायचं ? मलापण असली गोरट्याली पोरगी बायकू म्हणून पायजेल. संज्या खूष हूता. मी सकाळी एकदा तेवढं त्यला गाठ पडत हूतो. ते बी तंबाखचुन्ना घ्यायला. लगीन झाल्यावर त्यला भारी वाटत असणारंच. त्यला बघिटलं की मला टेंशनच यायच. लग्नाला त्यची मेव्हणी बी आलती. ती हिच्यापरास दोन वर्षानं बारकी हूती. माझं माप बसत हूतं. खरं ती शिकलेली, मला करून घील काय ?  आसं सगळं डोशक्यात यायचं. दिवसभर तेच. म्हणून मी तंबाखचुना दूसर्या पानपट्टीतंन आणलो. लोकास्नी वाटलं माझं आणि संज्याचं वांदं झालंय. कायतर लोकास्नी वाटतंयच.

मी पूरोगामी आहे.

मी पूरोगामी आहे. यमपीयस्सीचा आभ्यास करताना ठरविलो. पूरोगामी व्हायचं. मला आगूदर पूरोगामी मंजे वेगळे वाटायचे. आता वेगळे वाटते. पूरोगामीपण चेक करावे वाटले. घरात म्हणटलो पूरोगामी आहे मी. घरातले म्हणटले हे काय ? कुठली पोश्ट काढलीस ? हाहा पुरोगामी पोश्ट. लहान असताना मी पूरोगामी नव्हतो. आता आहे. कसं ?  लहान आसताना मी कंडा बांधायचो हातात. आता बांधत नही.  शाहू फूले आंबेडकर. मी पुरोगामी. पूरोगामी संगीतातले स्वर परगम. सारेगमपधनीसा. देवळात जात नाही. देव नसतो. म्हणजे ती संकल्पना आहे. तुम्ही म्हणशीला देव नसतो म्हणजे हा देवाचं अस्तित्व मान्य करतो.  मी पोश्ट काढली. मंत्रालय सहाय्यक. घरात कळलं. बारक्या भावानं फटाके लावले. आईनं लक्षुमीला निवद दाखवलं. वडलांनी पेढे आणले. मला आनंदात कळलंच नही. पूरोगामीपण गेले असं वाटलं. नाही. माझा अभ्यास आहे. पुण्यात दोन वर्षं काढली मी. पुण्यात लोक हूशार आहेत. मला पुणे आवडतं. गावातली पोरं आयट्या करून कंपनीत कामाला. ईकडे त्यांचे आईवडील सांगतात आमचं पोरगं पुण्याला. गंमत वाटायची. पोश्ट काढल्यावर पुढे युपीएस्सी द्यायची होती. पण नको म्हणटलं. आता पूरोगामी पद्धतीने लग्न करावं अस
अवगुणांचे हाती । आहे अवघीच फजिती ।।१।। नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ।।२।। विष तांब्या वाटी । भरली लाउ नये होठी ।।३।। तुका म्हणे भाव । शुद्ध बरा  कृषी आणि पणन मंत्री सदाभावू खोत यांच्या मुलाचं काल लग्न झालं. ईस्लामपूरात. मुख्यमंत्री आणि डझनभर लोकं उपस्थित होते. लगीन आगदी जोरात झालं. आंदोलन आसलं की मिडीया भावूचं मोडकं घर दाखवत हुती. सहानभुती गोळा करून देत हुती. सामान्य शेतकरी ह्यंव त्यंव आणि आत्ता सामान्य खात्याचे मंत्री झाल्यावर परिस्थिती कशी बदलते हे दाखवत नही. मग आमी कसं म्हणायचं आछे दीन आले म्हणून ?   गुंठ्यावारीत जमीन असणारी लोकं एवढ्या जोरानं लगीन करतेलं बघून मला भावू रानात काय लावत असंल असा प्रश्न पडलाय.  माझंबी लग्नाचं वय झालंय. फेसबुकवरचेच पाच हजार, चारपाचशे परदेशातली, गावातली, पावणंरावळं कसं हान्डेल करायच कळंना. सदाभावू कडे शिकवणी तर लावु काय ? आजून ठरायचं हाय  दणक्यात करायचं हाय !!! 😊 😊 😊 😊 😊 सोंग वाव ।।४।।

हिलीक्यापटरच बरं. 😊

माझ्याकडं एक हिलीक्यापटर हाय. घिवून तीन वर्षं झाली, सुरवातीला डायवर ठेवलोतो. सहा महिन्यामागं काढून टाकलं. बायकू म्हणटली, विमान घ्या. आत्ता इमान कुठंन घिवु ?  मी म्हणटलं लै बोलू नकोस कशाला झक मारायला इमान पायजे ?  ती म्हणटली आपल्या घरातली तेवढंच मावत्यात चॉपरमधी. माझी आई बाबा मावत नहीत, तुमी एकदाच त्यासनी जोतिबाला निवून आणला. परत कधी माह्यारला गेलं तरीबी बसता काय मामा आणतो फिरवून असं एकदा तर म्हणटला काय ? असं म्हणून बायकू मला कायम ईमोशनल करत असते.  डायवर सॉरी पायलट हुता ते बरं हुतं. आता मलाच हाणावं लागतंय.  डायवर जरा कडूच हुता. जरा कुठं प्याड दिसलं कि उतरवायचा आणि तंबाखू मळ. कुठं शिग्रेट वड असं करायचा. आता मला सांगा सारखं उतरवायचं परत उडवायचं ह्यामुळं आवरेज कमी हुणार कि. आनेक पायलटची घाण सवय म्हणजे त्याच्या बा चं हिलीक्याप्टर असल्यागत एकटाच हेडफोन घालायचं आणि गाणं ऐकायचं. मला हाळूहाळू त्यचा कारभारच पसंत यिना. मग गोड बोलायला चालु केलो, हाळुहाळू कुठलं बटान कशाचं, गेर कसं टाकायच उतरवायच कसं ते शिकलो. खरं त्यला सांगिटलो नही. नहीतर उगच म्हणायचा पोटावर पाय आणला म्हणून.  एकदिवस दुपारला मी आणि
ईचलकरंजीला बाजारला जावून आलो. थोरात चौकात मोठ्ठा बाजार असतंय दर शुक्रवारी. सण २००८ ला मिरज दंगल झाली होती पाठोपाठ ईचलकरंजीतपण दंगल झाली. त्यावरून तिथली संवेदनशीलता ध्यानात येत्या.  तर ह्या थोरात चौकात डझनभर गायी मोकाट हिंडत असतात. बाजारात पण हिंडतात. शिंग मारतात. भाजीपाला नासधूस करतात.  आत्ता महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी लागु झालीय. त्यात ईचलकरंजी सारख्या संवेदनशील भागात अशा मोकाट गायी हिंडत असतात. कुणाची मानसिक स्थिती काय सांगता येत नही. आज ना उद्या जर कुणी स्वसंरक्षणार्थ ह्या गायींवर हात उगारला तर कुणाच्याही भावना दुखावल्या तर परत त्याच पर्यावसन धार्मिक भांडणात व्हायची शक्यता नाकारता येत नही. त्याप्रसंगी अशा गायी ज्या भागात हिंडतात त्या गायींना गोशाळेत दाखल करावं. किंवा त्यांची काहीतरी सोय लावून बंदोबस्त सरकारने करावं. अन्यथा भावना दुखवायला निमित्तच लागतंय लोकांना.
एक मोठ्ठा दगड. नंतर तिचे तुकडे. तेच विखुरले आघातानी. मग प्रिथ्वी तयार झाली. प्रिथ्वी मोठ्ठा दगड असणार मग तुकडे शिळा मुर्त्या.  मग पाणी गुरत्वाकर्षन समुद्र पाण्यात जीवसृषटी वगैरे.  मग माणूस.  दगडाला काय अर्थ ? तस बघितलं तर कशालाच काय अर्थ नाही.  झोपून टाकावं कायमच कुणी परत ऊठ म्हणनार नाही असं.