पहिला मोबाईल

आठवीला असताना माझ्या हातात पहिला मोबाईल आला. नोकिया साठतीस. त्यात यफम लागत हूतं. त्यावेळी टाम्याटू, मिरची हे फेमस हूतं नंतर सिटी ग्रीन आलं. 
आमचं डोस्कं प्रयोगशील हूतं. त्यावेळी इंटरनेटच लै एॅट्रॅक्शन हूतं. म्हणून त्या जीपीआरस साठी धडपडायचो. त्यावेळी डाटा प्लॅन हूत काय नव्हत माहित नही. खरं ते पृथ्वी च्या आयकाॅनवर जावून नेट चालू करत हूतो. ते चालू होत नसलं की निराशा व्हायची. मग कस्टमर केयरला फूकटात काॅल लावायला मिळायचं. MO असं मेसेज पाठवा असं सांगायची. तसं केलं की सेटींग यायची. मग नेट चालू व्हायचं. त्या पृथ्वीवर गेलं की येअरटेलच्या होमपेजला जायाचं. तिथं बिकीनीमधलं चित्र असायची दहा रूपयं पंचवीस रूपयं असं रेट हूती. ते नंतरन कळायचं. आम्ही तेवढं बघून हारकायचो. मुळात नेट चालू केलंय ही मोठ्ठी गोष्ट असायची. संशोधक झाल्यागत वाटायचं.
त्यात आमचा बॅलन्स हाळ व्हायचा. त्यावेळी लै वइट वाटायचं. काय बिनबघताच बॅलन्स गेलाय ह्यचं दुःख व्हायचं.
खिशात पैशे बी नसायचं. मग आणि परत संशोधक जागा व्हायचा. ते व्हावचर असत्यात कनी त्याच्या मधलं नंबरं बदलून कडंची तसंच ठिवून ट्राय करून बघायचं खरं त्यात एकदा बी यश आलं नही. मला लै वाटायचं की त्या व्हावचरंच नंबर आपन हूडकून काढू शकतो असं. खरं ते व्हायचं नही.
मग दूसरा पत्ता असं की कस्टमर केअरला काॅल लावायच आणि भावनिक बोलायचं मॅडम कट केलंय ओ कंपनीनं. बॅलन्स.
मॅडम असली की पाघळायची. सर असला की ताठायचा.
मी लै भावनिक करून टाकायचो एखाद्या मॅडमला आणि ती पण कवातर तीस रूपयच बॅलन्स परत करायची. असं परत केली की म्हणायची आमच्या सरांना मी दिलेल्या सरवीसबद्दल फीडबॅक द्या. म्हणजे त्यंच्याबरोबर बोला. मग मी पण तिच्या सराला सांगायचो की मॅडम भारी सरवीस देत्यात. त्यंच्याकडं प्रामाणिकपणा हाय. बाकी लोकं कसतरं वागवतात कस्टमरला खरं ह्या मॅडम अडचणी जाणून घेतात अशा शुद्ध थापा हाणून सोडत होतो. मग नंतर तिच्याकडं परत तो सर काॅल देतो. परत ती म्हणायची की सर तुमची आभारी हाय. मला बी लै भारी वाटायचं. सगळे अशे कस्टमर केयर वाले झाले तर किती चांगलं हूईल. एकेक सर लोक पण अडचणी समजून घिवून बॅलन्स परत केल्यात खरं मॅडम लोकं जादा. स्त्रीयांच्याबद्दल वाटणार्या आदरात ह्या कस्टमर केअरातल्या मॅडमांनी भर घातली आहे.
शेवटला काय गोड तर जिभ गोड !
न्यानसू कटारेच्या पोस्ट वरन आठवलं.
कोण बोलायला नसलं की म्हणजे इंग्लिश तर कस्टमर केयर हे चांगलं ठिकाण आहे. wink emoticon grin emoticon tongue emoticon smile emoticon kiki emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं