पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशा ऊकाड्यात कविता केलं पायजे असं वाटत आहे.

कवी कवयत्री लोकांचे कौतूक करावं तेवढ थोडंच हाय. लहान असताना कविता म्हणजे यमक जूळलं की कविता झाली. नंतर कळालं नुस्तं यमक जूळून चालत नही तर त्यला अर्थ पण लागतोय. नंतर एकेक कविता बिनयमकाच्या वाचायला गावल्या. त्या पण बर्या असतात. गझल हा प्रकार आवडतो. त्यात भानगड म्हणजे वृत आणि मात्रा असत्यात. त्या वाचलं की भारी वाटतंय. म्हणजे गालाला लागा, लागालागा, लालागाला असं ते असतं. आपल्याला त्यातलं कायच कळत नही. कवीतेचं अर्थ कवी कवयत्रीला एक लागलेल असतंय आणि आपल्याला निराळंच लागतंय.  त्या कवी लोकास्नी काय वाटत असल अर्थाचं अनर्थ झाल्यावर ?  कुठल्यातर कवी किंवा कवयत्रीच्या लग्नाला जावून नावं घेतलेली ऐकावं असं वाटतंय.  आमच्या पै पावण्यात कोणच कवी नही सगळी शिनेमातल्या गाण्यावर नाचणारीच हायीत.  जे न देखे रवी ते देखे कवी. मला ह्यातलं रवी म्हणजे ताक हलवायच असं वाटत हूतं पण नंतर सूर्य कळलं. अंधारातल्या कविता कोणतर केलं असल काय ?  अंधारातल्या कविता करणारी लोकंच खर्या अर्थानं कवी कवयत्री हूतील.  दूसरीला एक कविता हूती.  छोटाले बहिण भाऊ  उद्याला मोठाले होवू उद्याच्या जगाला  उद्याच्या युगाला नविन आकार देवू !!! मल

पुणे भयंकर हाय.

पुण्यातले लोक कष्टाळू आहेत अशे स्वारगेटला उतरल्यावर वाटले.  पहाटे साडेतीनला टेशन टेशन टेशन असं सारखं विचारत्यात तिथली रिक्षावाली. ट्रॅव्हलसच्या मागं मागं पळतात. आणि भाडं मिळवतात. त्यांच्यात्यांच्यात जोरात बोलत्यात काकूला मामाला उचला. मग ते भाडं मिळवत्यात. मला सूरवातीला ते पुण्याचे वाटले. खरं ते सातारा, कराड, सांगलीचे आहेत.  स्वारगेटच्या स्टँडवर सगळं असताव्यस्त असतंय. झोपाळ डोळ्यानी सगळे बसलेले असतात. भारीभारी इनशर्ट करणारी लोकंपण जागा मिळल तिथं बसतात. कोणच शायनिंग ते मारत नही. सगळी कुठतर जायच्या गडबडीनं सुंदाडलेली लोकं. कोणतर गावाकडंन पुण्याला हाय म्हणून सांगून पुणं दाखवायला आणलेली वैतागून गेलेली पोरगी. नवरा बायकू पेंगत असताना त्यांचं बारकं पोरगं बॅग वडत निवून दूसरीकडं टाकतय. नंतर शाॅट खातोय.  सकाळी असलेली गाडं दूपारी बदलतात, दूपारची संध्याकाळी. तरी स्वारगेटला कायम गर्दी असते.  पुण्यात बारिक बारिक देव लै हायीत. गल्लीला चार गणपति. कधीकधी वाटतंय तेतीस कोटी पुणेवाल्यानी लै मनावर घेतलंय.  ट्राफिक तर कायम तुंबलेलं. रस्ता क्राॅस करून जाणं महामुश्कील.  सोमवारपेठेत एक राजर्षी शाहू उद्यान म्हण

टिकली

लग्न झालेल्या पोरी टिकली लावत्यात. आजीबाई काकूपण लावत्यात. मला पुर्वी मोठं कुंकू किंवा टिकल्या लावणार्या आज्ज्या बघितलं की भारी वाटायचं. त्यावरून त्यांची नवरं कसली असतील असं वाटायचं. एकदा सातवीत असताना कापडाच्या दूकानात गेलतो. त्यावेळला एक काकू तिच्या पोरग्याला घिवून आलती. आणि सारखं हे नको ते दाखवा करत हूती. मी मामाबरोबर गप्प बसलोतो. ती म्हणटली त्या पोरग्याला पप्पाना आत बोलव. पप्पा म्हणजे तिचा नवरा कसला असेल असं डोक्यात आलं. तोपर्यंत ते आत आले. बिचारा गरीब हूता. टिकलीच्या निम्यानं बी बिचार्याचं वजन नव्हतं.  अनेकदा मी मोबाईल रिचार्ज करायला गेलतो. तशाच एक काकू आल्या आणि दहाचं व्हावचर घेवून गेल्या.  एक मॅडम होत्या इंग्लीशला त्या नामाटं वडल्यागत टिकली लावायच्या. मला त्यंची भ्या वाटायची. खरं नंतर चांगल्या बोलल्या. मग मी त्यांना सांगितलो तुमची टिकली बघून भ्या वाटते. त्या हसल्या, आणि नंतर कवातर घरच्याना सांगितलं. मग मम्मीनं तुला कशाला लागतंय सगळं म्हणून दोन हाणलं. मग मी हे जाहीर शोध बंद केलो.  तरीपण कवातर टिकली किंवा गंध बघितलं की तिचा नवरा कसलं हाय ते बघू वाटायचंच.  ते चंद्रकोरटाईप टिकली एक

गडी रंगात आलता.

रेल्वेमधे रात्र झाली की मधली शीट एॅडजेस्ट करून सगळे झोपत्यात, खालच्या शिटाला तेवढंच खिडक्या असत्यात. तिथं मित्र झोपलाता. म्हणून दूसर्या बगलच्या मधल्या शीटवर झोपलो. तर तिथं पुढच्या स्टेशनला लोकं आली. मग थेट वरच्या शीटवर मी गेलो. वर जावून टफ आणि मजबूत पंखं यापलिकडं काय नव्हतं. मला वईट वाटलं. खाली आणि मधे पण मित्र झोपली हूती त्यांना ऊठवायला नको वाटलं. मग ऊगचच त्या पंख्याकडं आणि जाळीकडं छताकडं बघून किती कमी जग हाय असलं नको ते विचार यायला लागलं. मग म्हणटलं नाण्याला दूसरी बाजू असत् या वर वईट असलं तर खाली चांगलं असेल. खाली एक नजर टाकलो तर मधल्या शिटावरला मित्र खालच्या शिटवरच्याचा मोबाईल घिवून त्यात फेसबूक उघडूण पोरीबरोबर च्याटींग करालता. चार्जर बारिक असल्यानं हात कडला धरलाता. त्यामूळं मला वर स्पष्टपणं सगळं दिसायला लागलं. गडी रंगात आलता. मला असं बघून लै मज्जा यायलती आणि हासू आवरना झालतं. शाल तोंडात कोंबून कंट्रोल केलो. ती : me jate हा : kuth janar ? ती : pagal ह्यला इथं कागल असं दिसलं असावं. हा : ky krnar jvun ? ती : Mental हा : zal ky ? अगायाया आसलं हसायला लागलो. त्यात त्यला गावलो. त्यनं मग

tirupti

कितवीला काय आठवत नही खरं एक 'सिद्धार्थ बुद्ध झाला !' ह्या नावाचा धडा हूता मराठीला, त्यात असं होतं की राजवाड्यातंन पहिल्यांदा बाहेर पडल्यावर त्याला सगळी प्रजा दिसते आणि तो दुःखी होतो.  गेलं तीनचार दिवस तिरूमला मध्ये (बालाजी) इथं आहे. आज यायलोय रात्री.  तिरूपती खाली आणि डोंगरावर तिरूमला आहे. तर त्या तिरूमलामध्ये देवस्थान असूनही कुठं दुःखी आणि म्हातारी लोकं दिसली नाहीत. मला झपाट्याला पंढरपूरच आठवलं. पंढरपूरात काय परिस्थीती असत्या, तिथली स्वच्छता इथली स्वच्छता तूलना करायची झाली त र जमिन आसमानाचा फरक पडल. बरेच पाॅईंट बघितले. पण स्वच्छता सगळीकडे काटाकिर्रर. मला वैयक्तीक देव वगैरे गोष्टीवर विश्वास नाही, आज ज्या लेण्या किंवा कलाकुसर वगैरे आहे ती ठिकाणं देवांची आहेत, तरीपण बालाजी हे बरं आहे, अतिओंगळवानं आणि जबरदस्त घोषणाबाजी ते काय नही. कोणतर गोविंदा म्हणटलं की गोविंदा गोविंदा इतकाच रिप्लाय. त्यापलिकडं दूमदूमनं नाही. डोंगरावर असल्यानं घाटातंन यष्टी जाते चिक्कार झाडं हायीत, रोड सगळे जबरदस्त, पोटातलं पाणी हालत नही. इकडचे आंध्रातले लोक लुंगी उर्फ धोती घालतात. आपन जर धोती घातलं की काय फरक

काका काकू वडापाव

रेल्वेत हाय.  पलिकडं एक काका काकू बसलेत. दोघेही जाड हायीत. मघाशी ते जेवले. नंतर बारिकमधे भांडले. ती भांडणं जेवणावरंनं झाली. म्हणजे काकू कमी जेवलीत. काका म्हणटले काय गं ही नाटकं ?  मग काकू म्हणटली मला कमी भूक होती म्हणून कमी जेवले. मग दोघं एकमेकाकडं बघून हसले.  नंतर काकू म्हणटली वडापाव घेवूया ?  काका चक्रमगत करालंय. जोरात म्हणटला वडापाव ? मग काकू खिडकीतंन बहिर बघत बसली. काकापण. एकटा वडापाववाला येवून गेला. नंतर दोघंपण बहिरची नजर हटवत वडापाववाल्याकडं बघत राह्यले. ते दोघेही वडापाव सारखे दिसतात. मला लै हासू यायलय.

ट्रकडायवर

इमेज
सगळं सोडून एक लेल्यांड ट्रक घिवून लांबचं भाडं करत हिंडावं असं वाटतंय. March 9 at 11:08am  · ट्रकड्रायव्हर रात्री झोपत नसतात. March 10 at 1:48am   ट्रकडायवरला घर नसते. ट्रकमध्ये एक स्टोव्ह असतो. चारपाच देवांचे फोटो, सूवासिक उतकाड्या असतात. नदी आली की हँडलला हात लावून पाया पडतात. सिग्नलला तंबाखू मळतात.  ट्रकडायवर कुणाशीच भांडत नसतो. ट्रकडायवरच्या पाकिटात बायकूचा फोटो असतो. ट्रकडायवरचे बापाबरोबर पटत नसते. ट्रकडायवरची बायकू संध्याकाळी मिस्काॅल देते. हा फोन करून बायकोला विचारतो पोरं कशी आहेत. प्रत्येक ट्रकडायवरला आपले अजून ट्रक असावे वाटते. ट्रकला एक बारडी कायम लोंबकळत असते. तिच्यावर डाग पडलेलं असतात. ट्रकचा नाद करायचा नसतो. म्हणजेच ट्रकडायवर नादखूळा असतो. March 10 at 2:04am ट्रकडायवर कधीतर महिन्यादोनमहिन्यातंन घरी येतो. येताना तो कुठकुठं गेलेला असतो तिथंन बायकोपोरांसाठी आईबाबासाठी कायतर घेवून येतो. पोरास्नी खायला आणि खेळणी घेवून येतो. बायकोला साडी बांगड्या आणतो.  ट्रक घरला घिवून आला कि डायवरंच पोरगं गल्लीतल्या सगळ्या पोरास्नी गोळा करतंय आणि डायवरला फिरवून आणायला

पहिला मोबाईल

आठवीला असताना माझ्या हातात पहिला मोबाईल आला. नोकिया साठतीस. त्यात यफम लागत हूतं. त्यावेळी टाम्याटू, मिरची हे फेमस हूतं नंतर सिटी ग्रीन आलं.  आमचं डोस्कं प्रयोगशील हूतं. त्यावेळी इंटरनेटच लै एॅट्रॅक्शन हूतं. म्हणून त्या जीपीआरस साठी धडपडायचो. त्यावेळी डाटा प्लॅन हूत काय नव्हत माहित नही. खरं ते पृथ्वी च्या आयकाॅनवर जावून नेट चालू करत हूतो. ते चालू होत नसलं की निराशा व्हायची. मग कस्टमर केयरला फूकटात काॅल लावायला मिळायचं. MO असं मेसेज पाठवा असं सांगायची. तसं केलं की सेटींग यायची.  मग नेट चालू व्हायचं. त्या पृथ्वीवर गेलं की येअरटेलच्या होमपेजला जायाचं. तिथं बिकीनीमधलं चित्र असायची दहा रूपयं पंचवीस रूपयं असं रेट हूती. ते नंतरन कळायचं. आम्ही तेवढं बघून हारकायचो. मुळात नेट चालू केलंय ही मोठ्ठी गोष्ट असायची. संशोधक झाल्यागत वाटायचं. त्यात आमचा बॅलन्स हाळ व्हायचा. त्यावेळी लै वइट वाटायचं. काय बिनबघताच बॅलन्स गेलाय ह्यचं दुःख व्हायचं. खिशात पैशे बी नसायचं. मग आणि परत संशोधक जागा व्हायचा. ते व्हावचर असत्यात कनी त्याच्या मधलं नंबरं बदलून कडंची तसंच ठिवून ट्राय करून बघायचं खरं त्यात एकदा बी यश आलं

म्वोदीनं दोन वर्षं झाली पयला हाप्ता बी दिला नही.

बंड्या रंकाळ्यावर फिरायला गेलता. निराश हूता. तिकडं एक गोरट्यालं जोडपं ह्यला दिसलं. कोल्हापूरात यवढी गोरट्याली कुठंनं काय आली म्हणून आश्चेर्यचकीत झाला. ह्यचं इंग्लीश मापटंभरं नव्हतं चिपटभर हूतं. तेवढ्यावर गावातल्या लायब्रररीत टाईम्स आफ इंडिया इकानामिक टाईम वाचून फुढारकी करत हूता.  कोण नहीत ते बघून भेळ खात खात त्या गोरट्याल्या जोडप्या जवळ गेला. पहिला इचार केला इंग्लीश झाडायचं आणि जोडपं पुण्याचं निघायचं.  मागं एकदा असंच झालतं. हे फाॅरेनर हायीत म्हणून व्हेअर आर यु फाॅर्म ? असं  विचारला तर ती म्हणटलीत आम्हाला शुद्ध मराठी येते हं. म्हणून पचका हू नये म्हणून पयल्याझूट मराठीत बोलला. कुठलं म्हणायचं तुमी ? मग त्यातला बापंय म्हणटला, 'sorry. english ? हे सुखावलं. म्हणटलं व्हेअर आर यु फाॅर्म ? ती म्हणटली अमेरिकेतंन आलोय. मग हे आणि ते दोघं इंग्लीश बोलाय लागली. ह्ये म्हणटलं, इलेक्शन ते सोडून हिकडं कुठं बोंबलत आलायसा ? त्यातली बई म्हणटली 'वी जस्ट लव इंडिया' वी वाॅन्ट इंडियाज सिटीझनशीप. हे म्हणटलं वाॅव ! मग ह्यला भारी वाटलं, आपल्या देशाबद्दल किती आदर ! ह्या गड्यानं सगळं कोल्हापूर फिरवून दाख

माझं Aनावावरच्या एका मुलीवर प्रेम हाय.

माझं Aनावावरच्या एका मुलीवर प्रेम हाय. मला वाटते तिचे पण माझ्यावर असेल. तिने मला एकदा इक्लेयर्स दिलते. मग मी तिला फाईव्ह स्टार दिलो. मग तिनं मला काळं खारिक दिलं मग तिला मी डेरी मिल्क कॅडबरी दिलो. मी तिच्या लेक्चर रूम पासनं गेलो की ती बाहेर लगेच यायची मग मी ती व्हरांड्यात ऊशिरभर बोलत राहायचो. एकदा आम्हाला एकांत मिळाला हूता. पण एकट्या इद्र्या मित्राला तवाच आठवन आली आणि दार धडकून आत आला आणि बसाबसा म्हणटला. अशा रितीने त्याने एकांताची वाट लावली. इतर पोरीप्रमाणे हि सुद्धा बडबडी आहे, पण मोजूनमापून बोलते, आवाज गोड आहे. जिभ दातात धरून बोलल्यागत बोलते. ती म्हणटलीती आपन काॅफी प्यायला जावू. ते कधीच अजूनपर्यंत झाले नाही.  तिच्याकडं मोबाईल नाही. म्हणून तिचे मला पाप वाटते. माझं एक मोबाईल वापरात नसलेलं दिलो तर नको म्हणटली. मग ते माझ्या भावानं उचलंल. परवा फ्रीडम दोनशेएक्कावन मोबाईल बुक करताना तिची आठवन आली होती, मग मी दोन मोबाईल बुक केलो, म्हणजे ते अॅक्सीडन्टली झाले.  तिच्या मैत्रीणीकडे मोबाईल आहे. मला तिची आठवण आली कि मी मैत्रीणीला फोन करतो मग ती तिच्याकडे देते. मग आम्ही बोलतो. अंदाजे पंचवीस मिनीट बो

उनातला गारवा

एप्रिलचा महिना होता. मी तिची वाट बघत बसलोतो आंब्याच्या झाडाखाली, झाडाला आंबं ढिगानं हूती, खरं माझ्या हाताला ते येत नव्हतं. दगडं मारलं की आज्जी कावायची. शिरमा आज्जी मिशरी घिवून घासत बसायची असं वाटायचं खरं तिची दातं कायमचं काळीकुट्ट दिसायची. मग एकदा प्रज्ञा ला मी विचारलो ही म्हातारी तोंड धुत्या काय नही ?  मग प्रज्ञा म्हणटली शिरमी ज्याचुली लावते. शिरमाला ही शिरमी म्हणटली की मला सहावीत शिकवलेलं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आठवायचं. शिरमा मी म्हणटलो मी पुल्लिंगी आणि ती शिरमी म्हणटली की स्त्रीलिंगी. म्हणजे पूरषानी पुलिंगी आणि मुलीनी स्त्रीलिंगीमधे बोलावं असं वाटायचं. ही मामाच्या गावातली झाडं मला लै आवडायची. नव्वीची उनाळसुट्टी पंधराचं दिवस होती. मी लगेच मामाबरोबर कोकणात आलतो. प्रज्ञा येऊन दोन दिवस झालतीत. काल संध्याकाळी बुद्धीबळ खेळत होतो आम्ही दोघं. ती दोनदा जिंकली. एक प्यादं वजीर केली. शाळेत जिल्ह्यापातळीवर जावून आलती. मला कॅसलीन म्हणजे काय ते माहितंच नव्हतं. ती कायतर नवीन शिकवायला लागली की मॅडमच व्हायची. अरे तुका कळतंच नाही. असं कायतर समजून सांगायची. कोकणातल्या पोरी सगळ्या फेंदर्याच वाटायच्य